फायनान्शिअल एक्सप्रेसमधील वाचकांच्या प्रश्नोत्तराच्या विभागात तुमचे स्वागत आहे. आज दर्शन पवार लिहितात की, त्यांनी २०१९ मध्ये एकूण ४० लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले होते, त्यातील थकबाकीची रक्कम आता २५ लाख रुपये आहे. दर्शन १० हजार रुपये मासिक SIP देखील करीत आहे आणि त्याच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) खात्यात १४ लाख रुपये आहेत. दर्शनला हे जाणून घ्यायचे आहे की, त्याने त्याच्या गृहकर्जाची रक्कम भरावी की SIP रक्कम वाढवावी. गृहकर्जाची परतफेड करण्यासाठी ईपीएफ खात्यातून पैसे काढणे फायदेशीर ठरेल का? याचा सल्लाही त्याला हवा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्यावर FundsIndiaचे VP आणि संशोधन प्रमुख अरुण कुमार यांनी दर्शनच्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. म्युच्युअल फंड SIP गुंतवणुकीतून तुमचा अपेक्षित परतावा तुमच्या गृहकर्जाच्या व्याजदरापेक्षा ४ टक्के जास्त असेल तर तुम्ही SIP वाढवू शकता. अन्यथा कर्जाची वेळेआधी परतफेड करणे सोयीचे ठरेल.

हेही वाचाः नजारा टेकला कामत असोसिएट्सने दिले १०० कोटी रुपये, शेअर्समध्ये १० टक्क्यांनी उसळी

४ टक्केचा बफर म्हणजे गृहकर्जाच्या दरांमध्ये वाढ होण्याची शक्यता असते आणि गुंतवणुकीच्या अपेक्षेपेक्षा कमी परतावा मिळणार असतो. उदाहरणार्थ, जर तुम्ही इक्विटी SIP मधून १२ टक्के परतावा आणि ९.५ टक्के गृहकर्जाचा व्याजदर विचारात घेत असालतर SIP वाढवण्याऐवजी तुमच्या गृहकर्जाची वेळेआधी परतफेड करणे फायदेशीर ठरेल. तसेच तुमच्या गृहकर्जाचा दर EPF दरापेक्षा जास्त असल्यास तुम्ही EPF रक्कम वापरून गृहकर्जाची परतफेड करू शकता. दुसरीकडे या प्रश्नाचे उत्तर देताना PlanYourWorld ट्रेनिंग अकादमीचे संचालक विप्लव मजुमदार यांनी सुचवले की, गृहकर्ज बंद करण्यापेक्षा दीर्घकाळात अतिरिक्त पैसे घेऊन SIP वाढवणे अधिक फायदेशीर ठरणार आहे.

हेही वाचाः IT कंपन्या २६ नव्या शहरांमध्ये विस्तारणार; महाराष्ट्रातील २ शहरांचा समावेश

“जर तुम्ही कर्जाच्या रकमेवर ९ टक्के आणि म्युच्युअल फंडाच्या नियमित योजनांमध्ये १२ टक्के आणि थेट योजनांमध्ये १३.५ टक्के रक्कम भरत असाल तर तुम्हाला कर्जाच्या रकमेवर परतावा मिळणे ही मुख्य कल्पना आहे. वाचकांनी हे लक्षात घ्यावे की, या प्लॅटफॉर्मचा हेतू गुंतवणुकीसाठी कोणत्याही विशिष्ट फंडाची किंवा इतर कोणत्याही मालमत्तेची शिफारस करण्याचा नाही. हे व्यावसायिक आर्थिक सल्लागाराचे काम आहे. या विभागाद्वारे फायनान्शिअल एक्सप्रेस मनीचे उद्दिष्ट वाचकांना आर्थिक नियोजन, प्राप्तिकर, सेवानिवृत्ती, कर्ज इत्यादींबद्दल वैयक्तिक वित्त तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीद्वारे केवळ सखोल मार्गदर्शन देणे आहे.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Money mantra my epf account balance is rs 14 lakhs should it be withdrawn to repay the home loan vrd