आधार हे आजच्या काळात सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज झाले आहे. आधार कार्ड हे फक्त ओळखपत्र नसून इतर अनेक कारणांसाठी वापरले जाते. नवीन सिम घेणे असो किंवा नवीन बँक खाते उघडणे असो, आधार कार्डचा वापर सर्वत्र केला जातो.

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) तुमच्या आधार क्रमांकाची सुरक्षा वाढवण्यासाठी आणि UIDAI वेबसाइट किंवा mAadhaar अॅपद्वारे तुमचा आधार क्रमांक लॉक करण्यासाठी सुरक्षा देते. आज आम्ही तुम्हाला असेच काही मार्ग सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे आधार कार्ड सुरक्षित ठेवू शकता.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

अशा प्रकारे तुम्ही आधार कार्ड सुरक्षित ठेवू शकता

तुम्हाला तुमचा आधार (UID) अनलॉक करायचा असल्यास तुम्ही नवीन VID (Virtual ID)वापरून UIDAI वेबसाइट किंवा mAadhaar अॅपच्या माध्यमातून ते करू शकता. तुमचा आधार (UID) अनलॉक झाल्यावर तुम्ही UID, UID टोकन आणि VID (Virtual ID) वापरून पडताळणी करू शकता. याव्यतिरिक्त व्यक्ती त्यांच्या बँकांद्वारे व्यवहार अलर्टदेखील सेट करू शकतात.

हेही वाचाः GIP मॉल २ हजार कोटींना विकला जाणार, पान मसाला उत्पादक कंपनी खरेदी करण्याच्या तयारीत

आधार लॉक कसा करायचा?

तुमचा UID लॉक करण्यासाठी तुमच्याकडे १६ अंकी VID (Virtual ID) क्रमांक असणे आवश्यक आहे, जे लॉकिंग प्रक्रियेसाठी आवश्यक आहे. तुमच्याकडे व्हीआयडी नसल्यास तुम्ही एसएमएस सेवेद्वारे किंवा UIDAI वेबसाइटद्वारे एक VID जनरेट करू शकता.

हेही वाचाः LinkedIn ने यंदा दुसऱ्यांदा केली नोकर कपातीची घोषणा, ६६८ कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार

या स्टेप्स फॉलो करून तुमचा आधार लॉक करा

SMS सेवा वापरून तुमचा आधार लॉक करण्यासाठी १९४७ वर SMS पाठवा: GVID [तुमच्या UID चे शेवटचे ४ किंवा ८ अंक].
UIDAI वेबसाइटला भेट द्या (https://resident.uidai.gov.in/aadhaar-lockunlock).
“माय आधार” टॅब अंतर्गत “आधार लॉक आणि अनलॉक सेवा” निवडा.
“UID लॉक” रेडिओ बटणवर क्लिक करा.
तुमच्या नव्या माहितीवर आधारित तुमचा UID क्रमांक, पूर्ण नाव आणि पिन कोड भरा.
सुरक्षा कोड टाका.
“ओटीपी पाठवा” वर क्लिक करा किंवा “टीओटीपी” निवडा आणि “सबमिट” वर क्लिक करा.
तुमचा UID यशस्वीरीत्या लॉक केला जाणार आहे.

Story img Loader