Term Insurance Plan For Diabetic Person: साधारणपणे एखाद्या व्यक्तीला कोणताही आजार असल्यास जीवन विमा योजना किंवा मुदत विमा योजना मिळणे कठीण असते. पण आजच्या बदलत्या काळात रक्तातील साखर म्हणजेच मधुमेहासारखे आजार सामान्य झाले आहेत. कोट्यवधी लोकांना याचा त्रास होत आहे आणि त्याचे बळी तरुण, लहान मुले ते वृद्ध लोकही पडत आहेत. अशा परिस्थितीत टर्म इन्शुरन्स पॉलिसी मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप प्रभावी ठरू शकते. विशेषतः असे लोक त्यांच्या कुटुंबीयांनाही सहजपणे सुरक्षिततेची हमी देऊ शकतात. सध्या काही कंपन्या आहेत, ज्या मधुमेही रुग्णांना मुदत विमा संरक्षण देतात.

हेही वाचाः प्रियंका, कतरिना अन् करिना नव्हे, तर ‘या’ अभिनेत्रीने भरला सर्वाधिक टॅक्स, निव्वळ संपत्ती ५०० कोटी रुपये

विमा संरक्षण कसे मिळवायचे?

जीवन विमा कंपनी बजाज अलियान्झ लाइफ इन्शुरन्सने मधुमेह रुग्णांसाठी विशेष मुदत विमा पॉलिसी सुरू केली आहे. या अंतर्गत Bajaj Allianz Life Diabetic Term Plan Sub 8 HbA1c पॉलिसी लाँच करण्यात आली आहे.

हेही वाचाः सुधा व नारायण मूर्ती तिरुपतीच्या दर्शनाला, सोन्याचा शंख अन् कासव दान, ‘या’ वस्तूंचं महत्त्व काय?

टाइप २ मधुमेहाचे रुग्ण पॉलिसी घेऊ शकतात.
ज्यांची HbA1c पातळी ८ किंवा त्याहून अधिक आहे.
किमान वय ३० वर्षे आणि कमाल वय ६० वर्षे असावे.
किमान परिपक्वता वय ३५ वर्षे आहे आणि कमाल परिपक्वता वय ७५ वर्षे आहे.
किमान २५ लाखांचे विमा संरक्षण घ्यावे लागेल. कमाल मर्यादा नाही.

किती प्रीमियम भरावा लागेल?

प्रीमियम मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर भरला जाऊ शकतो. या अंतर्गत वय आणि विमा संरक्षण रकमेच्या आधारावर प्रीमियमची रक्कम निश्चित केली जाते. परंतु जर अशी व्यक्ती धूम्रपान करत नसेल आणि त्याचे वय ३० वर्षे असू शकेल आणि तो २० वर्षांसाठी ५० लाख रुपयांचा टर्म प्लॅन घेतो, त्यानंतर त्याला १३,५३३ रुपये वार्षिक प्रीमियम भरावा लागेल.

Story img Loader