सेवानिवृत्तीनंतर अनेकांना वाटतं की उर्वरित आयुष्य आरामात घालवावं. त्यांना पैसा, घरखर्च इत्यादींसाठी इतर कोणावर अवलंबून राहावे लागू नये. यासाठी निवृत्तीनंतर तुम्हाला पेन्शन म्हणून दरमहा सुमारे १ लाख रुपये मिळू शकतात. हे मिळवण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल की, तुम्हाला निवृत्तीनंतरच्या खर्चासाठी किती पैसे हवे आहेत किंवा तुम्हाला दरमहा किती पेन्शन हवी आहे. खरं तर एवढी पेन्शन मिळवण्यासाठी तुम्हाला किती गुंतवणूक करावी लागेल. याशिवाय तुम्हाला हेदेखील माहीत असले पाहिजे की तुम्ही पैसे कुठे गुंतवाल? असाही अनेकांना प्रश्न पडतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

NPS मध्ये गुंतवणूक करून १ लाखांपर्यंत पेन्शन मिळवता येते

राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) केंद्र सरकारने सुरू केली. या योजनेंतर्गत तुम्ही तुमच्या नोकरीदरम्यानच तुमच्या निवृत्तीची व्यवस्था करू शकता. NPS योजनेत गुंतवणूक करून तुम्ही तुमचे भविष्य सुधारू शकता आणि सुरक्षित करू शकता. यासाठी तुम्हाला ६० टक्के इक्विटी आणि ४० टक्के डेटमध्ये गुंतवणूक करावी लागेल. तसेच गुंतवणूकदाराला सरासरी १० टक्के परतावा मिळतो आणि निवृत्तीनंतर १ लाख रुपये पेन्शन मिळविण्यासाठी तुम्हाला पुढील ३० वर्षांसाठी दरमहा १५,००० रुपये गुंतवावे लागतील.

हेही वाचाः १०० रुपये घेऊन मुंबईत आले अन् आज शाहरुख खानचे शेजारी झाले, ही स्टार नव्हे तर सामान्य माणसाची आहे कहाणी

SIP मध्ये गुंतवणुकीला सुरुवात करा

तुम्हाला निवृत्तीनंतर दरमहा एक लाख रुपयांपर्यंतची पेन्शन हवी असल्यास त्यासाठी तुम्हाला सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) मध्ये गुंतवणूक करावी लागेल. आपण वयाच्या ३०व्या वर्षी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर पुढील ३० वर्षांसाठी गुंतवणूक करत राहिल्यास निवृत्तीनंतर चांगला फायदा मिळतो, तसेच आपण आपल्या वृद्धापकाळासाठी एक चांगला फंड जोडू शकता. या वेळी तुम्ही दर महिन्याला सुमारे ५६,६६० रुपये गुंतवल्यास तुमचा एकूण निधी २ कोटी रुपये होतो. या निधीवर १२ टक्के उत्पन्न दिले जाते. याचा अर्थ निवृत्तीच्या वेळी तुम्हाला दरमहा एक लाख रुपये पेन्शन मिळणार आहे.

हेही वाचाः Multibagger Stocks: ‘या’ शेअर्समध्ये गेल्या तीन वर्षात ७०० टक्के वाढ, एकाच महिन्यात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट, आता पुढे ट्रेंड काय?

महागाई लक्षात घेऊन गुंतवणूक करा

तज्ज्ञांच्या मते, जर गुंतवणूकदारांनी हायब्रिड किंवा कंझर्व्हेटिव्ह हायब्रीड (Systematic Withdrawal Plan) फंडामध्ये गुंतवणूक केली तर ते तुम्हाला महागाईपासून वाचवण्याचे काम करू शकतात. म्हणजेच ते तुम्हाला वर्षाला सुमारे ७ ते ८ टक्के परतावा देऊ शकतात. या योजनेत गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांनी महागाईही लक्षात ठेवली पाहिजे. या गुंतवणुकीत निवृत्तीनंतर १ लाख रुपये पेन्शन मिळवण्यासाठी पुढील ३० वर्षांचे नियोजन आवश्यक आहे, त्यानंतर तुम्हाला ६ टक्के महागाई गृहीत धरावी लागेल आणि हे लक्षात घेता SWP मध्ये तुमचा एकूण निधी २.७६ कोटी रुपये असावा.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Money mantra one lakh rupees per month pension will be given in nps government scheme know how vrd