30 Years Old Mutual Funds in India : सध्याच्या घडीला म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे भारतात खूप लोकप्रिय झाले आहे. म्युच्युअल फंड उद्योगाच्या व्यवस्थापनाखालील संपत्ती वर्षानुवर्षे वाढत आहेत. आज ती वाढून सुमारे ४३.२० लाख कोटींच्या घरात पोहोचली आहे. सध्या भारतातील म्युच्युअल फंड उद्योगाने बराच टप्पा गाठला आहे. पहिली म्युच्युअल फंड योजना १९८६ मध्ये म्हणजे सुमारे ३७ वर्षांपूर्वी सुरू झाली. १९९३ च्या अखेरीस किमान ८ म्युच्युअल फंड योजना सुरू केल्या होत्या, त्यापैकी ७ योजनांना ३० वर्षे पूर्ण झाली आहेत आणि १ योजनेला आता होणार आहेत. आम्ही तुम्हाला देशातील सर्वाधिक परतावा देणाऱ्या ५ इक्विटी योजनांची माहिती दिली आहे, ज्या ३० वर्षे जुन्या आहेत.

या सर्व ५ योजनांची विशेष गोष्ट म्हणजे त्या सर्व इक्विटी श्रेणीतील आहेत आणि त्या लाँच झाल्यापासून आतापर्यंत त्यांचा परतावा जबरदस्त राहिला आहे. यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना दीर्घकालीन चक्रवाढीचा लाभ मिळाला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी आपला पैसा बराच काळ यांमध्ये ठेवला होता, त्यांची संपत्ती प्रचंड वाढली आहे. यामध्ये ३० ते ३७ वर्षांच्या कालावधीत १५% ते १९% वार्षिक परतावा मिळाला आहे.

government banks earned net profit
सरकारी बँकांना सहामाहीत ८६ हजार कोटींचा निव्वळ नफा
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Panvel Virar House expensive , House expensive Panvel,
पाच वर्षात पनवेल, विरारची घरे महागली; दोन्ही ठिकाणच्या किमतीत ५८ टक्क्यांनी वाढ
public sector banks npa marathi news
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे ‘एनपीए’ ३.१६ लाख कोटींवर
jan dhan account marathi news
अकरा कोटी निष्क्रिय जनधन खात्यांमध्ये १४,७५० कोटी पडून
equity funds investment declined
इक्विटी फंडांतील ओघ ओसरला! नोव्हेंबरमध्ये १४ टक्क्यांनी घटून ३५,९४३ कोटींवर
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?
high expectations from third quarter
तिसऱ्या तिमाहीकडून अपेक्षांचे ओझे !

एसबीआय मॅग्नम इक्विटी ईएसजी फंड

SBI मॅग्नम इक्विटी ईएसजी फंड १ जानेवारी १९९१ रोजी इक्विटी थीमॅटिक ईएसजी श्रेणीमध्ये सुरू करण्यात आला. ही योजना लाँच होऊन जवळपास ३२ वर्षे झाली आहेत आणि ती लाँच झाल्यापासून दरवर्षी १४.५ टक्के परतावा देत आहे. टीसीएस, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी, अॅक्सिस बँक यांसारखे शेअर्स त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये आहेत.

लाँच तारीख : १ जानेवारी १९९१
लाँच झाल्यापासून परतावा : १४.७४% वार्षिक
किमान गुंतवणूक: १००० रुपये
किमान SIP:१००० मासिक
खर्चाचे प्रमाण: २.०२% (३१ मे २०२३ पर्यंत)
एकूण संपत्ती: ४७४७ कोटी (३१ मे २०२३ पर्यंत)

हेही वाचाः Money Mantra : पॅन-आधार अद्याप लिंक केले नाही, मग करदात्यांना भरावा लागणार ६००० रुपयांचा दंड, जाणून घ्या कसा?

टाटा लार्ज आणि मिडकॅप फंड

टाटा लार्ज आणि मिडकॅप फंड ३१ मार्च १९९३ रोजी लार्ज आणि मिडकॅप श्रेणीमध्ये सुरू करण्यात आला. या फंडाने जवळपास ३० वर्षे पूर्ण केली आहेत आणि लॉन्च झाल्यापासून दरवर्षी सुमारे १३ टक्के दराने परतावा दिला आहे. आयसीआयसीआय बँक, वरुण बेव्हरेजेस, आरआयएल, एचडीएफसी बँक, एसबीआय यांसारखे टॉप स्टॉक या फंडाच्या पोर्टफोलिओमध्ये आहेत.

लाँच तारीख: ३१ मार्च १९९३
लाँच झाल्यापासून परतावा: १२.८०% वार्षिक
किमान गुंतवणूक: ५००० रुपये
किमान SIP:१००० रुपये मासिक
खर्चाचे प्रमाण: १.९०% (३१ मे २०२३ पर्यंत)
एकूण संपत्ती: ४३४८ कोटी (३१ मे २०२३ पर्यंत)

हेही वाचाः Money Mantra : EPFO च्या खातेदारांना मिळतो ७ लाखांचा विमा अगदी मोफत, जाणून घ्या कसा घ्यावा लाभ?

SBI लार्ज आणि मिडकॅप

SBI लार्ज अँड मिडकॅप २८ फेब्रुवारी १९९३ रोजी लार्ज अँड मिडकॅप श्रेणीमध्ये लाँच करण्यात आले. या फंडाने ३० वर्षे पूर्ण केली आहेत आणि लॉन्च झाल्यापासून दरवर्षी सुमारे १४.५०% दराने परतावा दिला आहे. त्याच्या पोर्टफोलिओमध्ये आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, आयटीसी, एसबीआय यांसारख्या शेअर्सचा समावेश आहे.

लाँच तारीख: २८ फेब्रुवारी १९९३
लाँच झाल्यापासून परतावा: १४.६६% वार्षिक
किमान गुंतवणूक: ५००० रुपये
किमान SIP:५०० रुपये मासिक
खर्चाचे प्रमाण: १.८७% (३१ मे २०२३ पर्यंत)
एकूण संपत्ती: ११,४३१ कोटी (३१ मे २०२३ पर्यंत)

फ्रँकलिन इंडिया ब्लूचिप फंड

फ्रँकलिन इंडिया ब्लूचिप फंड लार्जकॅप प्रकारात १ डिसेंबर १९९३ रोजी लाँच करण्यात आला. हा फंड डिसेंबरमध्ये ३० वर्षे पूर्ण करेल आणि लॉन्च झाल्यापासून दरवर्षी सुमारे १९ टक्के परतावा दिला आहे. त्याच्या पोर्टफोलिओमध्ये आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, रिलायन्स, इन्फोसिस, एचडीएफसी यांसारख्या दिग्गज शेअर्सचा समावेश आहे.

लाँच तारीख: १ डिसेंबर १९९३
लाँच झाल्यापासून परतावा: १९% वार्षिक
किमान गुंतवणूक: ५०००
किमान SIP:५०० रुपये मासिक
खर्चाचे प्रमाण: १.८२% (३१ मे २०२३ पर्यंत)
एकूण संपत्ती: ६,५२१ कोटी (३१ मे २०२३ पर्यंत)

SBI लाँग टर्म इक्विटी फंड

SBI लाँग टर्म इक्विटी फंड नावाचा टॅक्स सेव्हर फंड ३१ मार्च १९९३ रोजी ELSS श्रेणीमध्ये सुरू करण्यात आला. ३० वर्षे पूर्ण केलेल्या या फंडाने लॉन्च झाल्यापासून १६ टक्क्यांपेक्षा जास्त वार्षिक परतावा दिला आहे. त्याच्या पोर्टफोलिओमध्ये ICICI बँक, L&T, Cummins India, Reliance, Bharti Airtel यांसारख्या दिग्गज कंपन्यांचा समावेश आहे.

लाँच तारीख: ३१ मार्च १९९३
लाँच झाल्यापासून परतावा: १६.१९% वार्षिक
किमान गुंतवणूक: ५०० रुपये
किमान SIP: ५०० रुपये मासिक
खर्चाचे प्रमाण: १.८१% (३१ मे २०२३ पर्यंत)
एकूण संपत्ती: १३,५३८ कोटी (३१ मे २०२३ पर्यंत)

सर्वात जुनी योजना: UTI मास्टरशेअर फंडाची स्थिती

UTI मास्टर शेअर फंड ही देशातील पहिली इक्विटी म्युच्युअल फंड योजना आहे, जी १८ ऑक्टोबर १९८६ रोजी इक्विटी लार्जकॅप श्रेणीमध्ये सुरू करण्यात आली होती. ही योजना जवळपास ३७ वर्षे जुनी आहे. पण लाँच झाल्यापासून त्याचा परतावा १७ टक्क्यांहून अधिक आहे. त्याच्या पोर्टफोलिओमध्ये ICICI बँक, HDFC, Infosys, Bharti Airtel, Axis Bank यांसारख्या दिग्गज शेअर्सचा समावेश आहे.

लाँच तारीख: १८ ऑक्टोबर १९८६
लाँच झाल्यापासून परतावा: १७.०९% वार्षिक
किमान गुंतवणूक: १०० रुपये
किमान SIP:५०० रुपये मासिक
खर्चाचे प्रमाण: १.७३% (३१ मे २०२३ पर्यंत)
एकूण संपत्ती: १०,९०० कोटी (३१ मे २०२३ पर्यंत)

Story img Loader