गेल्या दोन वर्षात भारतीय हवाई वाहतूक बाजारपेठेतील घटना उत्साह वाढवणाऱ्या आहेत. एकेकाळी भारतात विमान प्रवास करणे म्हणजे चैनीची बाब समजली जात असे. आता विमान प्रवास अगदी गरिबांच्या नसला तरी मध्यमवर्गीय माणसाच्या नक्कीच आवाक्यात आलेली गोष्ट आहे. विमान वाहतूक हा व्यवसाय जोमदारपणे चालण्यासाठी फक्त विमानांची गरज असते, हा गैरसमज आहे. कोणताही व्यवसाय यशस्वी होण्यासाठी एक व्यवसायाचे स्वरूप विकसित व्हावे लागते, त्यासाठी इकोसिस्टीम तयार करावी लागते, तशी इकोसिस्टीम तयार व्हावी यासाठी सरकारने प्रयत्न करायचे असतात. याची सुरुवात भारतात होताना दिसते आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
एअर इंडिया ही भारतातील आकाराने सर्वात मोठी विमान कंपनी होती. भारत सरकारच्या मालकीची असलेली एअर इंडिया आता टाटा ग्रुपने विकत घेतल्यावर भारतातील विमान वाहतूक क्षेत्र पूर्णपणे खाजगी क्षेत्राकडे गेले आहे. म्हणजेच सरकारने यातून ‘एक्झिट’ घेतली आहे. एअर इंडिया, एअर एशिया, विस्तारा एअरलाइन्स, स्पाइस जेट, आकाशा एअर आणि इंडिगो या भारतीय कंपन्या भारतातील विमान वाहतूक व्यवसायात आहेत. ‘गो एअर’ या कंपनीचे विमान खाली बसल्यानंतर एक कंपनी कमी झालेली असली तरी विमान वाहतूक व्यवसायाचे भविष्य उज्वल आहे यात शंकाच नाही. इंडिगो या विमान कंपनीने २०१९ मध्ये ३०० विमानांची ऑर्डर दिली होती. त्यातच एअर इंडियाकडून भलीमोठी विमानांची ऑर्डर दिली गेल्यानंतर भारतातील विमान प्रवासाबद्दल बाजाराचे मत बदलायला सुरुवात झाली.
हेही वाचा… Money Mantra: सेवानिवृत्तीनंतरचे नियोजन कसे कराल?
टाटा उद्योग समूहाच्या ‘एअर इंडिया’ने यावर्षी फेब्रुवारीमध्ये युरोपियन कंपनी एअरबस आणि अमेरिकन कंपनी बोईंग शी दोघांना मिळून ४७० विमानांची ऑर्डर दिली. भारतातील विमान प्रवास करणाऱ्यांची संख्या दमदारपणे वाढताना दिसून येत आहे. जानेवारी ते मार्च २०२३ या तिमाहीच्या आकडेवारीनुसार मागच्या वर्षीपेक्षा तीन महिन्याच्या या कालावधीत प्रवासी संख्या वाढून तीन कोटींवर पोहोचली आहे. एप्रिल आणि मे या सुट्ट्यांच्या कालावधीत विमान प्रवास महाग असला तरीही प्रवासी संख्येत अजिबात घट झालेली नाही, याची आकडेवारी पुढच्या महिन्यात येईलच. विमान वाहतुकीत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ‘पॅसेंजर लोड फॅक्टर’ म्हणजेच एखाद्या विमान कंपनीकडे किती सीट्स उपलब्ध आहेत आणि त्यातल्या किती भरलेल्या आहेत. थोडक्यात म्हणजे विमानं किती रिकामी आहेत किंवा गर्दीने हाउसफुल झालेली आहेत. मार्च अखेरीस सर्वच एअरलाइन कंपन्यांचा पॅसेंजर लोड फॅक्टर ८५% पेक्षा जास्त राहिला आहे. स्पाइस जेट, विस्तारा एअर यांचा लोड फॅक्टर वाढवून ९०% पलीकडे पोहोचला आहे.
हेही वाचा… Money Mantra: रोखीचे रकमेच्या व्यवहारावर मर्यादा काय? (भाग दुसरा)
भारतातील विमान वाहतूक मेट्रो शहरांपुरती विमानतळावर अवलंबून असायची. आगामी काळात अधिक मोठी प्रवासी वाहतूक नियंत्रित करायची क्षमता असलेले अत्याधुनिक विमानतळ भारतामध्ये आकारास येत आहेत. उत्तर प्रदेशातील नोएडा येथील जेवार एअरपोर्ट, महाराष्ट्रात नवी मुंबई जवळ आंतरराष्ट्रीय विमानतळ, राजस्थानातील भिवाडी विमानतळ, हिमाचल प्रदेशात मंडी विमानतळ, चेन्नई जवळील नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ यामुळे विमान वाहतुकीमध्ये वाढ होणार हे निश्चित आहे. महाराष्ट्रातील नागपूर येथे कार्गोहब आणि विमानतळ एकत्रितपणे विकसित करण्यात येत आहे. अशा प्रोजेक्टमध्ये प्रचंड गुंतवणूक करावी लागते. जागा संपादन करणे, पर्यावरण विषयक परवानगी मिळवणे आणि प्रत्यक्ष काम पूर्ण करणे यासाठी लागणारा वेळही मोठा असतो. येत्या पाच ते सात वर्षात यातील बहुसंख्य प्रोजेक्ट पूर्ण होत असतील तर त्यामुळे भारतीय हवाई वाहतूक व्यवसाय नव्या उंचीवर जाऊन पोहोचणार हे निश्चितच. एकुणात विमान कंपन्या जोडराद उड्डाणासाठी सज्ज असून गुंतवणूकदारांनी त्यांचा विचार बाजारपेठेच्या पातळीवर करण्यास हरकत नाही !