जगभरामध्ये गुंतवणुकीचे विविध प्रकार आहेत आणि त्या प्रकारांमध्ये सर्वात प्राचीन, सर्वात विश्वासार्ह आणि तात्काळ रोख उपलब्ध करून देणारा प्रकार म्हणजेच सोन्यामधील गुंतवणूक. या गुंतवणूक प्रकाराविषयी सर्वात आधी जागृत असणारी संस्कृती ही भारतीय संस्कृती आहे. अनादी काळापासून आपण धनसंचय कुठल्या प्रकारामध्ये करायचा तर तो केवळ सोन्यामध्ये अशी आपली परंपरा राहिली आहे. या परंपरेमुळेच जगभरामध्ये सर्वाधिक सोनं कुणाकडे असेल तर ते भारतीयांकडे आहे. यामुळेच दरवर्षी भारतामध्ये जवळपास ८०० ते ९०० टन सोन्याची खरेदी केली जाते ज्याची किंमत तीन लाख कोटी रुपये आहे.

सोने देशात आल्यानंतर फार मोठ्या प्रमाणावर ते तिजोरी बंद केले जाते. त्याचा व्यापाराच्या दृष्टीने उपयोग होत नाही. एवढी मोठी रक्कम तिजोरी बंद झाल्यामुळे भारताच्या उलाढालीमध्ये तेवढी तूट कायम राहते. कारण ही रक्कम तिजोरी बंद झाल्यामुळे दैनंदिन वापरामध्ये येत नाही आणि तिचा देशाच्या अर्थव्यवस्थेला कुठल्याही प्रकारचा फायदा होत नाही. या उलट झालाच तर तो तोटा होतो.

Ketu Gochar 2024
Ketu Gochar 2024 : केतु ग्रहाने केला सूर्याच्या नक्षत्रात प्रवेश, ‘या’ तीन राशींना मिळणार अचानक पैसाच पैसा!
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
gold etfs witness record rs 1961 cr inflow in october
‘गोल्ड ईटीएफ’ना चमक; ऑक्टोबरमध्ये विक्रमी १,९६१ कोटींची गुंतवणूक
Jeevan pramaan online process
Money Mantra: हयातीचा दाखला ऑनलाईन मिळवण्यासाठी जीवन प्रमाण सुविधा काय आहे?
readers comments on Loksatta editorial,
लोकमानस : अर्थव्यवस्थेत वाढ, मग रुपयाची घसरण का?
Stock market investment bait, fraud, Pune,
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने २६ लाखांची फसवणूक
Gold prices at lows Big fall after Diwali
सुवर्णवार्ता… सोन्याचे दर निच्चांकीवर… दिवाळीनंतर मोठी घसरण…

आणखी वाचा-Money Mantra : ‘टीसीएस’ उतरणार कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व्यवसायात !

उपाय ‘डिजिटल गोल्ड’चा

आज तुमच्याकडे पडून असणारे सोने जर तुम्ही डिजिटल सोन्यामध्ये परावर्तित केले, तर तुम्हाला विविध फायदे होऊ शकतात. सगळ्यात महत्त्वाचा फायदा तुम्हाला हवे तेवढे म्हणजे केवळ पन्नास रुपयांचं सुद्धा सोने तुम्ही डिजिटली खरेदी करू शकता. त्यामुळे काय अगदी महिन्याला हजार- पाचशे रुपयांचे सोने सुद्धा आपण खरेदी करू शकतो. ते डिजिटल स्वरूपात असल्याकारणाने प्रत्यक्षात सोने हाताळण्याची गरज पडणार नाही. डिजिटल हे तुमच्या डिमॅटमध्ये किंवा वॉलेटमध्ये जमा राहील, त्याचे मूल्य जरूर वाढेल शिवाय काही प्रकारांमध्ये त्यावर व्याज सुद्धा मिळू शकेल. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हे सोन सांभाळण्याची गरज पडणार नाही, चोरी होणार नाही, किंवा हरवणार नाही. शिवाय जेव्हा हवे तेव्हा या डिजिटल सोन्याला विकून तात्काळ रक्कम उपलब्ध होऊ शकेल. त्याचबरोबर वैयक्तिक पातळीवर कुठल्याही प्रकारची झळ बसणार नाही. हे झालं वैयक्तिक किंवा कौटुंबिक पद्धतीवर, जर आपण देश पातळीवरचा विचार केला आणि सर्वच भारतीयांनी त्यांच्याकडे असणारे सोने डिजिटल स्वरूपामध्ये परावर्तित केले. तर फार मोठी क्रांती या देशात होऊ शकते आणि भारत पुन्हा एकदा ‘सोने की चिडिया’ होऊ शकतो.

आपला देश आता जगातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात अव्वल देश आहे. आपण असे गृहीत धरूया की, एका कुटुंबामध्ये केवळ सहा लोक आहेत तरीसुद्धा संपूर्ण देशामध्ये २३ कोटी कुटुंब राहतात. या सर्व कुटुंबामध्ये सरासरी केवळ २०० ग्रॅम सोनं आहे असे गृहीत धरले तरी देश पातळीवर आपल्याकडे २५ हजार टन पेक्षा जास्त सोने कोणत्याही वापराविना पडलेले आहे, याची किंमत ४०० लाख कोटींपेक्षा जास्त आहे.

आणखी वाचा-Money Mantra: रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणात अर्थव्यवस्था वेगाने वाढण्याचे संकेत!

नोटबंदीचा काळ आठवा,नोटबंदीच्या आधी व्याजाचे दर अकरा टक्के होते. नोटबंदी झाल्यानंतर व्याजाचे दर आठ टक्क्यांपर्यंत खाली आले, यामागचे खरे कारण म्हणजे नोटबंदीच्या कालावधीमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये १४ लाख कोटी रुपयांच्या नोटा जमा झाल्या. दीड लाख कोटी रुपये अर्थव्यवस्थेमध्ये आल्यामुळे आणि लिक्विडिटी वाढल्यामुळे व्याजाचे दर कमी झाले (व्याजाचे दर कमी होण्यास हे ही एक महत्वाचे कारण आहे). विचार करा केवळ दीड लाख कोटी रुपये तीन टक्क्याने कमी करू शकतात. आपल्याकडे कोणत्याही वापराविना पडून असलेले ४०० लाख कोटी रुपये तिजोरी बंद आहेत, हे बाहेर आले तर व्याजाचे दर शून्य होऊ शकतात.

अमित हा एक तरुण मित्र आहे. जो एका वस्तूचे उत्पादन करतो आणि त्या वस्तूची जागतिक पातळीवर एक मोठी ऑर्डर त्याला मिळणार आहे. या कामासाठी त्याला एक कोटी रुपयांची गरज आहे. अमित व्यावसायिकदृष्ट्या फार चांगला आहे आणि बँक ही त्याला एक कोटी रुपयांचे कर्ज द्यायला तयार आहे. तरीसुद्धा हे कर्ज अमितला कमीत कमी दहा टक्के वार्षिक व्याजारावरती मिळेल. आता असे समजूयात आपल्याकडे अजून एक अमित आहे आणि हा अमित युरोपियन देशांमध्ये किंवा अमेरिकेमध्ये तोच व्यवसाय करतोय जो आपला भारतातीय अमित करतो. त्या अमितला सुद्धा त्याची बँक एक कोटीचे कर्ज द्यायला तयार आहे. पण त्याला मात्र व्याजाचे दर केवळ दोन टक्केच लागणार आहे. आता या ठिकाणी मी तुम्हाला बाकी काही सांगायची गरज नाही आहे. आपल्या समाजाने मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी करून अर्थव्यवस्थेमधील तरलता नष्ट केली. व्याजाचे दर वाढले तर युरोपियन देशांमध्ये किंवा इतर देशांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी न झाल्यामुळे त्यांच्याकडे रोख रकमेची तरलता फार मोठ्या प्रमाणावर राहते. त्यामुळे त्यांच्याकडे व्याजदरही कमी होतात.

आणखी वाचा- Money Mantra : ऑटोचा टॉप गियर बाजारालाही लागू पडेल का?

या सर्व लेखाचा मथितार्थ एवढाच आहे की, तुमचे सोन्यावरती प्रेम असले तरीसुद्धा जेवढे वापरायचे आहे तेवढे सोडून इतर सोने तुम्ही डिजिटल स्वरूपामध्ये घ्याल तर, प्रत्यक्ष सोने भारतात आणण्याचे प्रमाण कमी होईल. भारताच्या बाहेर जाणारी रक्कम मोठ्या प्रमाणावर कमी झाल्यामुळे आपल्या देशातील रोख तरलता वाढेल, व्याजाचे दर कमी होतील. उद्योजकता वाढेल, रोजगार वाढेल, आपल्याकडे तिजोरीबंद असलेले सोने बाहेर येईल. त्यामुळे अतिरिक्त सोने आपण दागिन्यांच्या स्वरूपामध्ये परदेशांमध्ये विक्रीसाठी पाठवून रोख उपलब्धता वाढवू शकतो. सुजलाम् सुफलाम् परिस्थिती पुन्हा येईल आणि भारत पुन्हा एकदा सोने की चिडिया होईल!

mahendra@vgold.co.in