तुमच्या पगारातून कापलेले पीएफ (Provident Fund) पैसे केवळ तुमच्या निवृत्तीसाठीच उपयोगी पडत नाहीत, तर तुमच्या आयुष्यातील कोणत्याही आर्थिक संकटात ते तुमचा आधार बनतात. तुम्ही तुमच्या EPF (Employees’ Provident Fund) मधून विविध कारणांसाठी पैसे काढू शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काढलेले पैसे पुन्हा ईपीएफमध्ये जमा करता येत नाहीत

विशेष म्हणजे जेव्हा तुम्ही EPF अ‍ॅडव्हान्स काढून घ्याल, तेव्हा आवश्यक तेवढेच घ्या, कारण तुम्ही EPF मधून काढलेले पैसे पुन्हा जमा करू शकणार नाही. ईपीएफओच्या नियमांनुसार, तुम्ही ईपीएफचे पैसे आगाऊ म्हणजे वेळेपूर्वी काढू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या नियोक्ताकडे फॉर्म ३१ सबमिट करावा लागेल. तुमचा अर्ज स्वीकारला गेल्यास पैसे थेट तुमच्या बँक खात्यात ट्रान्सफर केले जातात.

हेही वाचाः महाराष्ट्रातील मद्य प्रेमींसाठी वाईट बातमी; ‘या’ तारखेपासून दारू महागणार

तुम्ही PF मधून कोणत्या उद्देशाने पैसे काढू शकता?

वैद्यकीय आणीबाणी, शिक्षण, लग्न, जमीन खरेदी, घर बांधणे किंवा बेरोजगार असल्यास तुम्ही तुमचे पीएफ पैसे काढू शकता. लग्नासाठी पैसे काढण्यासाठी ईपीएफ सदस्यत्वाची सात वर्षे पूर्ण झाल्यानंतरच तुम्ही ईपीएफ आगाऊचा लाभ घेऊ शकता.

हेही वाचाः अदाणी आता ‘ही’ कंपनी विकत घेण्याच्या तयारीत, सिमेंटनंतर आता वीज क्षेत्रात खळबळ उडवणार

कोणाच्या लग्नासाठी तुम्ही पैसे काढू शकता?

तुम्ही तुमच्या स्वतःच्या लग्नासाठी किंवा तुमच्या मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नासाठी किंवा तुमच्या भावाच्या किंवा बहिणीच्या लग्नासाठी EPF मधून लग्नाची आगाऊ रक्कम काढू शकता.

किती पैसे काढता येतील?

पीएफमध्ये दोन प्रकारचे पैसे असतात, एक म्हणजे तुमच्या पगारातून कापलेले पैसे म्हणजे तुमचे योगदान आणि तीच रक्कम कंपनीद्वारे जमा केली जाते, ज्याला कंपनीचे योगदान म्हणतात. तुम्ही तुमच्या पीएफमधील ५० टक्के योगदान लग्नासाठी काढू शकता. याला जोडून व्याजही दिले जाते. तुम्ही लग्न आणि शिक्षणासाठी तीनपेक्षा जास्त वेळा पैसे काढू शकत नाही.

पीएफ काढण्याची ऑनलाइन पद्धत

  • सर्व प्रथम EPFO ​​सदस्याने त्यांच्या UAN आणि पासवर्डसह UAN सदस्य पोर्टलवर लॉग इन करावे.
  • आता वरच्या मेनू बारमधून ऑनलाइन सेवा टॅबवर क्लिक करा आणि ड्रॉप डाउन मेनूमधून दावा (फॉर्म ३१, १९ आणि १० C) निवडा.
  • यानंतर तुमची माहिती स्क्रीनवर दिसेल. तुमच्या बँक खात्याचे शेवटचे ४ अंक टाका आणि Verify वर क्लिक करा.
  • आता हमीपत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी YES वर क्लिक करा आणि पुढे जा.
  • आता Proceed for Online Claim पर्याय निवडा.
  • तुमचा पीएफ निधी ऑनलाइन काढण्यासाठी पीएफ अ‍ॅडव्हान्स (फॉर्म ३१) निवडा.
  • यानंतर फॉर्मचा एक नवीन भाग उघडेल, ज्यामध्ये तुम्हाला ज्या उद्देशासाठी आवश्यक आहे ते भरावे लागेल आणि आवश्यक रक्कम आणि कर्मचार्‍याचा पत्ता निवडावा लागेल. लक्षात ठेवा की पैसे काढण्याचे सर्व उद्देश लाल रंगात नमूद केले जातील.
  • आता पडताळणीवर क्लिक करा आणि तुमचा अर्ज सबमिट करा.
  • तुम्ही ज्या उद्देशासाठी फॉर्म भरला आहे त्यानुसार तुम्हाला स्कॅन केलेले दस्तऐवज सबमिट करावे लागतील.
  • तुमच्या कंपनीला तुमची पैसे काढण्याची विनंती स्वीकारावी लागेल, त्यानंतर तुमच्या EPF खात्यातून पैसे काढले जातील आणि पैसे काढण्याचा फॉर्म भरताना तुम्ही एंटर केलेल्या बँक खात्याच्या तपशीलात जमा केले जातील.
  • ईपीएफओमध्ये नोंदणीकृत तुमच्या मोबाइल नंबरवर एसएमएस पाठवला जाईल. दाव्यावर प्रक्रिया झाल्यानंतर रक्कम तुमच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाणार आहे. हे पैसे साधारणपणे १५-२० दिवसांत येतात.
मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Money mantra what are the rules for withdrawing pf money for marriage how to withdraw epf advance vrd
Show comments