Credit Card Payments; Maximise Benefits of Interest Free Period: डिजिटल पेमेंटच्या युगात क्रेडिट कार्ड हे एक महत्त्वाचे आर्थिक साधन म्हणून उदयास आले आहे. क्रेडिट कार्डचे आर्थिक व्यवस्थापन सुलभ करण्याबरोबरच व्यवहार प्रक्रिया सुलभ करण्यात आलीय. विशेष म्हणजे यात वापरकर्त्याला सुरक्षा, रिवॉर्ड पॉइंट्ससह सर्व फायदे देखील मिळतात. खरं तर हे सर्व असूनही बहुतेक लोक क्रेडिट कार्डाच्या काही खास वैशिष्ट्यांकडे दुर्लक्ष करतात. या महत्त्वाच्या वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे व्याजमुक्त कालावधी आहे, ज्याकडे लोक सहसा लक्ष देत नाहीत. जर तुम्हाला कर्जाच्या फंदात न पडता क्रेडिट कार्डचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही क्रेडिट कार्डच्या व्याजमुक्त कालावधी वैशिष्ट्याचा वापर करू शकता. यासंदर्भातील वृत्ता फायनान्शिअल एक्स्प्रेसने दिले आहे.

क्रेडिट कार्डचा व्याजमुक्त कालावधी काय आहे?

व्याजमुक्त कालावधीला वाढीव कालावधी असेही म्हटले जाते. हा असा कालावधी आहे, ज्यामध्ये क्रेडिट कार्ड वापरकर्त्याला पेमेंटसाठी २० ते ५० दिवसांचा व्याजमुक्त कालावधी मिळतो. यासाठी एक बिलिंग तारीख आणि दुसरी पेमेंट देय तारीख आहे. या कालावधीत कार्डधारक कोणत्याही व्याजाशिवाय वस्तू खरेदी करू शकतात. व्याजाच्या वाढीव कालावधीदरम्यान कार्डधारकाला कोणत्याही व्याज आकाराशिवाय संपूर्ण थकबाकीची परतफेड करण्याची संधी असते. क्रेडिट कार्ड जारीकर्त्याच्या धोरणानुसार आणि विशिष्ट बिलिंग चक्रानुसार व्याजमुक्त कालावधीदेखील भिन्न असू शकतो.

budh uday 2024
आता नुसता पैसा; डिसेंबरपासून बुधाच्या प्रभावाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींच्या धनसंपत्तीत होणार वाढ
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
Fast Charging Ruin Your Phone Battery
Fast Charging Hurt Your Phone Battery: फास्ट चार्जिंगमुळे होऊ शकते तुमच्या फोनचे नुकसान? ‘या’ पाच समस्यांबद्दल आजच जाणून घ्या
Ketu Gochar 2024
Ketu Gochar 2024 : केतु ग्रहाने केला सूर्याच्या नक्षत्रात प्रवेश, ‘या’ तीन राशींना मिळणार अचानक पैसाच पैसा!
During the blockade gold and silver worth six crores were seized Pune news
नाकाबंदीत पावणेसहा कोटींचे सोने, चांदी जप्त; ओैंध परिसरात कारवाई
I don’t believe in work-life balance Narayana Murthy stands firm on 70-hour workweek
“माझा वर्क-लाइफ बॅलन्सवर विश्वास नाही”; आठवड्यातील ७० तास काम करण्याच्या मतावर नारायण मूर्ती अजूनही ठाम
17th November Latest Petrol Diesel Price
Petrol Diesel Price In Maharashtra : कुठे स्वस्त तर कुठे महाग, तुमच्या शहरांतील १ लिटर पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घ्या

हेही वाचाः ६.५ कोटी EPFO सदस्यांसाठी खुशखबर! लवकरच पीएफ खात्यावर जमा होणार ८.१५ टक्के व्याजदर

व्याजमुक्त कालावधी का वापरावा?

व्याज बचत

वाढीव कालावधीचा लाभ घेण्याचे मुख्य कारण म्हणजे व्याज खर्च टाळणे. वाढीव कालावधीत संपूर्ण थकबाकी भरून क्रेडिट कार्डधारक त्यांच्या खरेदीवर कोणतेही व्याज देण्याचे टाळतात, त्यामुळे पैसे वाचवण्यासाठी क्रेडिट कार्ड वापरतात.

तुम्हाला तुमच्या क्रेडिट कार्डची उर्वरित रक्कम ‘ग्रेस पीरियड’ किंवा ‘व्याजमुक्त कालावधी’मध्ये भरण्यास सांगितली जाते. असे केल्याने केवळ व्याजाची बचत होत नाही तर तुमचा क्रेडिट स्कोअरही सुधारतो, असंही बँक बाजार डॉटकॉमचे सीईओ आदिल शेट्टी म्हणालेत. अधिक काळ व्याजमुक्त खर्चाचा आनंद घेण्यासाठी तुमच्या प्रमुख खर्चांची धोरणात्मक योजना आखा आणि त्यांना तुमच्या बिलिंग सायकलसह संरेखित करा. जास्तीत जास्त लाभ मिळवण्यासाठी किमान पेमेंट टाळा आणि वेळेवर थकबाकी भरा. जर तुम्ही क्रेडिट कार्ड जबाबदारीने वापरत असाल तर तुम्ही त्याचा अधिकाधिक फायदा घेऊ शकता आणि उज्ज्वल आर्थिक भविष्य घडवू शकता, असंही आदिल शेट्टी म्हणतात.

हेही वाचाः Money Mantra : म्युच्युअल फंड SIP मध्ये तुमचे नशीब चमकण्याची शक्यता, अशी करा गुंतवणूक अन् मजबूत फायदा मिळवा

आर्थिक लवचिकता

क्रेडिट कार्ड वापरकर्त्यासाठी वाढीव कालावधी हा आर्थिक दिलासा देणारा काळ असतो. कार्डधारक तात्काळ परतफेडीची चिंता न करता आवश्यक खरेदी करू शकतात, परंतु त्यासाठी त्यांना वाढीव कालावधीत शिल्लक रक्कम भरावी लागणार आहे.

चांगला क्रेडिट स्कोर

वाढीव कालावधी वापरल्याने क्रेडिट स्कोरवर सकारात्मक परिणाम होतो. वेळेवर पेमेंट करणे आणि क्रेडिट कार्डचा सुज्ञपणे वापर केल्याने चांगला क्रेडिट इतिहास तयार करण्यात मदत होते. चांगला क्रेडिट स्कोअर वापरकर्त्याला कार्ड जारी करणाऱ्या कंपन्यांच्या नजरेत ठेवतो.

रोख प्रवाह व्यवस्थापन

पगारदार व्यक्तींसाठी वाढीव कालावधी त्यांच्या मासिक वेतन चक्राशी एकरूप असतो. असे वापरकर्ते क्रेडिट कार्डाचा खर्च पगाराच्या क्रेडिटच्या बरोबरीने ठेवून त्यांचा रोख प्रवाह प्रभावीपणे व्यवस्थापित करू शकतात.