प्रियदर्शिनी मुळ्ये

स्नेहाला मुळातच ‘ सोन्याची आवड ‘! अर्थातच सोन्यात गुंतवणूक करणे तिला महत्त्वाचे वाटे. काही महिन्यांपूर्वीच तिला तिच्या एका मैत्रिणीने , ‘ Sovereign Gold Bond’ बद्दल सांगितले होते. या प्रकाराविषयी तिला कुतूहल होते. ४ दिवसांपूर्वी तिला याच Sovereign Gold Bond’ च्या नवीन येणाऱ्या Series विषयी कळले होते. आता तिने याची संपूर्ण माहिती नीट समजून घ्यायचे ठरवलं. दिनांक १८ डिसेंबर २०२३ पासून Sovereign Gold Bond – Series III गुंतवणुकीसाठी खुली होत आहे. या अनुषंगाने तुम्हीसुद्धा या गुंतवणुकीच्या प्रकाराची नीट माहिती करून घ्या आणि मगच गुंतवणुकीचा विचार करा.

Sensex gains , stock market rise , Sensex ,
मार्केट-वेध : शेअर बाजारात सेन्सेक्सची २२५ अंशांची कमाई; मात्र सत्रारंभीच्या मुसंडीला, दिवसअखेर पुन्हा गळती!
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
rupee recovered 8 paise from its historic low against the us dollar to settle at 86.62
नीचांकी पातळीवरून रुपया ८ पैशांनी सावरला
Gold Silver News
Gold Silver Price Today : मकर संक्रांतीच्या दिवशी सोने खरेदी करताय? जाणून घ्या, तुमच्या शहरातील आजचा सोने चांदीचा भाव
Rupee sinks to record low, settles 66 paise down
रुपयाची दोन वर्षांतील सर्वांत मोठी गटांगळी
gold silver rate today, Gold Silver Price 11 january 2025
Gold Silver Rate Today : सोन्या-चांदीच्या दरातील वाढ सुरूच, आज २२, २४ कॅरेट सोन्याचा दर काय? जाणून घ्या
Big concern over rupee falling to 86 against dollar
डॉलरमागे ८६ च्या गर्तेत गेलेल्या रुपयातून मोठी चिंता;  परकीय चलन गंगाजळीला अब्जावधी डॉलरचा फटका
Surya enter in makar rashi
चार दिवसानंतर सूर्य देणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशींना मिळणार नवी नोकरी आणि संपत्तीचे सुख

Sovereign Gold Bond म्हणजे काय?

सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा हा एक पर्याय आहे. भारत सरकार प्रणित असलेला हा गुंतवणूक पर्याय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया गुंतवणुकीसाठी वितरण करते. हा बाँड ठराविक कालावधी नंतर काही दिवस गुंतवणुकी साठी खुला होतो. या कालावधीत, त्या त्या ‘ दर्शनी किंमत मूल्यानुसार’, एक आर्थिक वर्षात कमीत कमी १ ग्रॅम ते जास्तीत जास्त ४ किलोग्रामपर्यंत सोन्यात गुंतवणूक केली जाऊ शकते. या बाँडचा ‘ गुंतवणूक कालावधी ‘ हा ८ वर्षे इतका आहे. या कालावधीत, गुंतवणूक केल्यापासून, ५व्या वर्षानंतर तुम्ही तुमची गुंतवणूक काढून घेऊ शकता. नियोजित आठ वर्षांचा कालावधी संपला की त्या वेळच्या सोन्याच्या बाजारभावाप्रमाणे तुम्हाला तुमचे गुंतवणूक मूल्य मिळते. या बाँडमधील गुंतवणुकीवर , 2.50% इतका Rate of interest मिळतो. हा दर सहामाही दिला जातो आणि तो गुंतवणूकदाराच्या, कर पात्रतेनुसार करपात्र ठरतो.

हेही वाचा… गुंतवणुकीतील श्रेयस आणि प्रेयस

या बाँडची दर्श किंमत मूल्य (Issue Price) कशी ठरवतात?

प्रत्येक series चे दर्शनी किंमत मूल्य वेगवेगळे असते. ज्या कालावधीत ती series गुंतवणुकी साठी खुली होणार असते, त्याच्या आधीच्या आठवड्यातील शेवटच्या तीन working days मधल्या, बाजारातील Gold Closing Price विचारात घेतात. त्या तीनही closing price ची सरासरी काढली जाते. ही सरासरी किंमत म्हणजेच त्या series ची ‘ Issue Price ‘ ठरते. वर नमूद केलेली सरासरी किंमत ही 999 शुद्धतेच्या सोन्याची असते. गुंतवणूकदार याच शुद्धतेच्या सोन्यामध्ये गुंतवणूक करतात.

Sovereign Gold Bond मध्ये कोण गुंतवणूक करू शकतं?

या बॉण्ड्स मध्ये निवासी भारतीय व्यक्ती, HUF, Trust, Universities, Charitable Institutions या गुंतवणूक करू शकतात.

हेही वाचा… Money Mantra: फंड विश्लेषण- आयसीआयसीआय प्रुडेन्शियल ब्लूचिप फंड

या बाँड मध्ये गुंतवणूक कशी करावी?

Primary आणि Secondary market मध्ये तुम्ही या बॉण्ड्स मध्ये गुंतवणूक करू शकता. गुंतवणुकीची नवीन series, Primary market मध्ये उपलब्ध होते. Commercial bank, नेमून दिलेली पोस्ट office कार्यालये, स्टॉक होल्डींग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या कार्यालयात तुम्ही यात गुंतवणूक करू शकता. तुमच्या डिमॅट अकाऊंट द्वारे सुद्धा तुम्ही यात गुंतवणूक करू शकता. Secondary Market मध्ये आधीच्या बाँड series उपलब्ध असतात. यातही तुम्ही तुमच्या डिमॅट अकाउंट द्वारा गुंतवणूक करू शकता.

गुंतवणूकदारांनी गुंतवणुकी पूर्वी काय लक्षात घ्यावे?

१. तुमचे गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठरवा

सोन्यामध्ये आणि त्यातही या बाँड मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी, तुम्ही या गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठरवा.

२. गुंतवणूक कालावधी निश्चित करा

एकदा का तुमचे ध्येय निश्चित झाले की तुमचा गुंतवणूक कालावधी निश्चित होईल. या बाँडचा कालावधी हा आठ वर्षांचा आहे. त्यामुळे हे लक्षात घेऊन मग गुंतवणूक करा.

३. निगडित जोखीम विचारात घ्या

हा बाँड सरकार प्रणित असल्याने सुरक्षित आहे. परंतु याचा परतावा( capital gains) हे पूर्णपणे सोन्याच्या बाजारभावात होणाऱ्या चढउतारावर अवलंबून असतात. याबद्दल सजग राहा.

४. Diversification चा विचार करा

हेही वाचा… Money Mantra: प्रश्न तुमचे, उत्तरं तज्ज्ञांची

जर सोन्यामध्ये तुम्ही इतर प्रकारे गुंतवणूक केली असेल तर ‘ diversification ‘ म्हणून तुम्हाला या बाँड मध्ये गुंतवणूक करता येईल.

नवीन खुल्या होणाऱ्या Sovereign Gold Bond – Series III विषयी महत्त्वाचे : Sovereign Gold Bond – Series III, येत्या १८डिसेंबर २०२३ ते २४ डिसेंबर २०२४ या कालावधीत गुंतवणुकीसाठी खुली होणार आहे. याची Issue Price, Rs 6,199 इतकी आहे. वर नमूद केल्याप्रमाणे, आपण या बाँडमध्ये विचारपूर्वक गुंतवणूक करू शकता.

Story img Loader