Linked FD : फिक्स्ड डिपॉझिट (FD) प्रत्येक भारतीयाला प्रिय आहे, ज्याला त्याच्या कष्टाने कमावलेल्या पैशांची बचत करायची आहे. BankBazaar नुसार, FD खाते हे एक आर्थिक साधन आहे, जे बचत खात्यापेक्षा जास्त व्याजदर देते. गुंतवणूकदार काही दिवसांपासून ते १० वर्षांच्या कालावधीसाठी त्यांच्या ठेवी ठेवू शकतात आणि सरासरी बचत खात्यापेक्षा जास्त परतावा मिळवू शकतात. जर तुम्हाला FD ठेवींतूनच फायदा मिळवायचा असल्यास येथे आणखी एक पर्याय आहे, जो तुम्हाला बचत खाते आणि FD दोन्हीचे फायदे देणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचाः एकेकाळी ४७ अब्ज डॉलर्सचे मूल्यांकन होते, आता जगातील सर्वात मोठी कंपनी दिवाळखोरीत

लिंक्ड फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे काय?

नावाप्रमाणेच लिंक्ड केलेली FD तुमचे बचत खाते तुमच्या FD ठेवींशी जोडते. यात ऑटो स्वीप-इन आणि स्वीप-आऊट वैशिष्ट्य आहेत, जेथे विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त रक्कम स्वयंचलितपणे FD मध्ये रूपांतरित केली जाते. FD चा कालावधी साधारणतः एक वर्षाचा असतो आणि FD वरील व्याजदर ऑटो स्वीपच्या दिवसापासून सुरू होतो.

हेही वाचाः मोदी सरकार आता आपली औषध कंपनी विकण्याच्या तयारीत, कंडोम बनवणारी कंपनी मालक होण्याची शक्यता

हे कसे कार्य करते?

लिंक्ड एफडी मूलत: ग्राहकांना बचत खात्यांमध्ये असलेले त्यांचे पैसे एफडी ठेवींमध्ये रुपांतरित करण्याची सुविधा देतात, ज्यामुळे त्यांना तरलतेशी तडजोड न करता उच्च व्याजदर मिळू शकतात. उदाहरणार्थ, तुमच्या बचत खात्यात १,००,००० रुपये असल्यास त्यावर वार्षिक सरासरी ३-४ टक्के व्याज मिळू शकते. तुम्हाला कधीही गरज असेल तेव्हा तुम्ही त्यात प्रवेश करू शकता. जर तुम्ही ती FD मध्ये लॉक केली असेल, तर तुम्हाला जास्त व्याजदर मिळेल. FD ची मुदतपूर्ती होईपर्यंत पैसे उपलब्ध होणार नाहीत. पण लिंक्ड एफडीमध्ये असे होत नाही. तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही पैसे काढू शकता. अनेक बँका या प्रकारचे लिंकिंग विनामूल्य प्रदान करतात. इतरांना संबंधित शुल्क असू शकते. याशिवाय बचत खात्यात जास्तीत जास्त किती रक्कम ठेवता येईल हे निश्चित असते आणि स्वाइप आऊटची रक्कम बँक ठरवते. हे तुमच्या गरजांशी जुळत नसल्यास तुम्ही इतर पर्याय पाहू शकता.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Money mantra what is the difference between linked fd and general fixed deposit where to get more returns find out vrd
Show comments