दैनंदिन व्यवहारातील किरकोळ पेमेंट करण्यसाठी भीम/गुगलपे/फोनपे यासारखे मोबाईल अॅप वापरणे आता सर्वसामन्यांच्या अंगवळणी पडले आहे. मात्र काही व्यवसायिक मोठी पेमेंट करण्यासाठी भीम/गुगलपे/फोनपे सुविधेचा वापर करणे शक्य होत नाही. अशा वेळी एनईएफटी/आरटीजीएस/आयएमपीएस हे तीन पर्याय आपल्याला उपलब्ध आहेत. तथापि नेमका कोणता पर्याय कोणत्यावेळी वापरणे योग्य असते याबाबत आजही लोकांच्या मनात संभ्रम आहे. खालील टेबलमध्ये या तिन्ही पर्यायांची तुलना केलेली आहे, यावरून पेमेंट करताना कोणता पर्याय आपल्याला सोयीचा असेल याची कल्पना येईल.
वरील टेबलवरून आपल्या असे लक्षात येईल की तातडीने पेमेंट करावयाचे असेल तर आरटीजीएस हा योग्य पर्याय आहे, मात्र पेमेंट किमान रु.२ लाख किंवा त्याहून अधिक असले पाहिजे तर तातडीच्या पेमेंटसाठी आयएमपीएस हासुद्धा चांगला पर्याय आहे, मात्र यात केवळ रु. २ लाखांपर्यंतच पेमेंट करता येते व हे पेमेंट मोबईल बँकिंग अथवा नेट बँकिंग पद्धतीनेच करता येते. बँकेत जाऊन करता येत नाही. थोडक्यात जे मोबईल बँकिंग अथवा नेट बँकिंग वापरत नाहीत त्यांना हा पर्याय वापरता येणार नाही. ज्यांना रु. २ लाखांच्या आत पेमेंट करावयाचे आहे व तासाभरात लाभार्थीच्या खात्यात रक्कम जमा झाली तरी चालणार आहे, अशा वेळी एनईएफटी हा पर्याय योग्य असेल. एनईएफटी/आरटीजीएस हे दोन्ही पर्याय ऑनलाईन (मोबईल बँकिंग अथवा नेट बँकिंग) ने करता येतात तसेच ऑफ लाईन म्हणजे प्रत्यक्ष बँकेत जाऊनसुद्धा करता येतात.
आपले कर्जाचे हप्ते, क्रेडीट कार्ड बील एनईएफटीने करू शकता. एनईएफटी/आरटीजीएस/आयएमपीएस यातील एनईएफटी/आरटीजीएस आरबीआयच्या नियंत्रणाखाली असून आयएमपीएस हे एनपीसीआय (नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनच्या नियंत्रणाखाली असते. विशेष म्हणजे भीम/गुगलपे/फोनपे यासारखे युपीआय पेमेंट हे आयएमपीएस प्लॅटफॉर्म वापरूनच होत असते.