Why buying a house is better than renting: अनेकांना स्वतःचं घर खरेदी करण्याची इच्छा असते, परंतु आर्थिक गणितं बसत नसल्यानं बऱ्याचदा ते भाड्याच्या घरात राहणं पसंत करतात. परंतु घर खरेदी करणे हा एक चांगला पर्याय आहे की भाड्याने राहणे? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात नक्कीच येतोच. खोली किंवा घर भाड्याने घेण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्याची लवचिकता असते, परंतु अशी अनेक कारणे आहेत, ज्यामध्ये घर खरेदी करणे दीर्घकाळासाठी चांगले सिद्ध होऊ शकते. काही लोक असा युक्तिवाद करतात की, घर खरेदी करणे खूप महाग आहे, तर भाड्याने घेणे सोपे आहे. त्यामुळे दीर्घकाळात जास्त आर्थिक भारही घ्यावा लागत नाही. दुसरीकडे काही लोकांचा असा विश्वास आहे की, तुमचे स्वतःचे घर विकत घेतल्याने तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित होते. याशिवाय तुमचे घर ही एक गुंतवणूक आहे आणि यामध्ये इतर फायद्यांव्यतिरिक्त आर्थिक फायद्यांचाही समावेश आहे. घर खरेदी करणे फायदेशीर व्यवहार का आहे हे आता जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

किंमत
केवळ घरात राहण्यासाठीच नव्हे, तर दीर्घ मुदतीसाठीही ही गुंतवणूक फायदेशीर आहे. भारतातील रिअल इस्टेटच्या किमती ऐतिहासिकदृष्ट्या सकारात्मक आहेत. आज तुम्ही ज्या किमतीत घर खरेदी कराल ती किंमत दुसऱ्या दिवशी जास्तीने वाढणार आहे.

हेही वाचाः पृथ्वीवरील सर्वात श्रीमंत व्यक्ती माहितीय? एलॉन मस्क त्याच्यासमोर काहीच नाही!

स्थिर घराची किंमत
भाडेकरूंना अनेकदा बाजारातील चढउतारांच्या अधीन राहून भाड्याच्या वाढत्या किमतींचा सामना करावा लागतो. दुसरीकडे घरमालकाने एकदा भरलेली किंमत अंतिम असते. हे स्थैर्य महागाईविरुद्ध चांगले आर्थिक नियोजन आणि सुरक्षितता देखील प्रदान करते.

तुम्ही तुमच्या घराचे मालक होणार
घराची मालकी सुरक्षितता आणि स्थिरतेची भावना देते, जी भाड्याने राहणाऱ्या घरात मिळत नाही. घराच्या मालकाचे त्याच्या राहण्याच्या जागेवर नियंत्रण असते. याशिवाय सामाजिक दृष्टिकोनातून घर खरेदी केल्याने अभिमानाची आणि कर्तृत्वाची भावना निर्माण होते. तुम्ही जिथे राहता तिथे तुम्ही स्वतः निर्णय घेऊ शकता.

हेही वाचाः विश्लेषण: सरकारकडून EPFO च्या ​​व्याजदरात वाढ; आतापर्यंत वाढ का रोखली होती?

घरमालकाची चिंता मिटणार
घर खरेदी केल्यानंतर तुम्हाला घरमालकाशी व्यवहार करावा लागणार नाही. याचा अर्थ आपण काहीही चुकीचे केले नसले तरीही घर रिकामे करण्याची चिंता यासह सर्व चिंतांपासून मुक्तता होणार आहे. याशिवाय तुम्ही तुमच्या इच्छेनुसार घराची देखभाल करू शकाल आणि तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमचे घर पूर्णपणे दुरुस्त करून घेऊ शकता. भाड्याने राहत असताना हे नक्कीच शक्य नाही.

कर लाभ आणि भाड्याचे उत्पन्न
जेव्हा तुम्ही घर खरेदी करण्यासाठी गृहकर्ज घेता, तेव्हा तुम्हाला कर लाभ मिळतो. प्राप्तिकर कायद्याच्या कलम २४(बी) आणि ८० सी अंतर्गत अनुक्रमे गृहकर्जावरील व्याज आणि मुद्दल परतफेडीवरील कपात कर ओझे लक्षणीयरीत्या कमी करू शकते आणि बचत होऊ शकते. घराचे मालक असल्याने तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते भाड्याने देऊ शकता. तुमच्याकडे अनेक मालमत्ता असल्यास भाड्याने घर देऊन तुम्हाला उत्पन्नाचा अतिरिक्त स्त्रोत मिळतो.

भावी पिढ्यांसाठी संरक्षण
जेव्हा तुम्ही घर खरेदी करता तेव्हा त्याचा आनंद तुम्हालाच मिळत नाही, तर तुमच्या भावी पिढ्याही आपले जीवन आनंदाने आणि शांततेने घालवतात. यामुळे कुटुंबात सुरक्षिततेची भावना निर्माण होते.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Money mantra what is the difference between your dream home and a rented house understand these 5 things vrd