देशातील सर्व करदात्यांना पॅन कार्ड अनिवार्य आहे. ज्याप्रमाणे पॅन कार्डमध्ये १० अंकांचा एक क्रमांक असतो, त्याचप्रमाणे परमनंट रिटायरमेंट अकाऊंट नंबर कार्ड (PRAN Card) मध्ये १२ अंकांचा अनन्य क्रमांक असतो. PAN आणि PRAN सारखेच दिसतात, परंतु त्यांचे उद्देश पूर्णपणे वेगवेगळे आहेत. प्राप्तिकर विभागाकडून पॅन कार्ड जारी केले जाते. ते सर्व करसंबंधित उद्देशांसाठी आवश्यक आहे, तर राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी PRAN अतिशय महत्त्वाचे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पॅन कार्ड म्हणजे काय?

प्राप्तिकर विभागाकडून पॅन कार्ड जारी केले जाते. हा १० अंकी अल्फान्यूमेरिक क्रमांक आहे. पॅन कार्ड सर्व करदात्यांना आवश्यक आहे, कारण हे कार्ड कर संबंधित व्यवहार आणि माहिती रेकॉर्ड करण्यासाठी व्यवस्थापित करते. याशिवाय आयटीआर भरण्यासाठी पॅन कार्डही अनिवार्य आहे.

PRAN कार्ड म्हणजे काय?

PRAN हा नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL) द्वारे जारी केलेला १२ अंकी क्रमांक आहे. नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) अंतर्गत सर्व सदस्यांसाठी हे अनिवार्य आहे. PRAN NPS गुंतवणुकीशी संबंधित सर्व व्यवहारांचा मागोवा घेण्यास आणि पेन्शन लाभांचा दावा करण्यात मदत करते.

PAN आणि PRAN मध्ये काय फरक आहे?

PRAN

  • एखाद्या व्यक्तीकडे PRAN अंतर्गत दोन प्रकारची NPS खाती असू शकतात, ज्यात Tier-I आणि Tier-II समाविष्ट आहे.
  • PRAN जे सर्व विद्यमान आणि नवीन NPS सदस्यांसाठी एक ओळख म्हणून कार्य करते, त्यांना त्यांच्या पेन्शन निधीचा मागोवा ठेवण्यासही मदत करते.
  • PRAN हा एक प्रकारचा युनिक आयडी आहे, जो NPS गुंतवणूकदारांना प्रदान केला जातो.
  • NSDL पोर्टलवर PRAN साठी अर्ज करावा लागेल, ज्यासाठी तुम्हाला फोटो आणि KYC कागदपत्रे हवी आहेत.
  • PRAN रेकॉर्ड सेंट्रल रेकॉर्डकीपिंग एजन्सी (CRA) द्वारे राखले जातात.
  • ग्राहकाकडे फक्त एक PRAN खाते असू शकते.

PAN CARD

  • प्राप्तिकराशी संबंधित सर्व व्यवहार तसेच गुंतवणुकीसाठी पॅन कार्ड वापरले जाते. कर्ज संबंधित आर्थिक व्यवहार करणाऱ्या व्यक्ती आणि व्यावसायिक संस्थांद्वारे याचा वापर केला जातो.
  • हे वैध केवायसी दस्तऐवज म्हणून काम करतात.
  • एनएसडीएल पोर्टल किंवा ई-फायलिंग पोर्टलवर पॅनसाठी अर्ज केला जाऊ शकतो.
  • अर्ज करण्यासाठी करदात्याला आयडी पुरावा, पत्ता पुरावा, छायाचित्र आणि जन्मतारीख पुरावा आवश्यक आहे.
  • प्राप्तिकर विभागाकडून पॅन रेकॉर्ड ठेवला जातो.
  • सध्याच्या कर कायद्यानुसार एकापेक्षा जास्त पॅन ठेवण्याची परवानगी नाही.
मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Money mantra what is the exact difference between pan and pran card who can use it find out vrd
Show comments