SCSS vs Senior Citizen FD Scheme : देशात ज्येष्ठ नागरिकांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. खरं तर त्यांना जोखीममुक्त गुंतवणूक करायला आवडते. साधारणपणे बहुतेक बँका ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ग्राहकांना मुदत ठेव योजनांवर सामान्य ग्राहकांपेक्षा जास्त व्याज देतात. याशिवाय पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजनेद्वारे ग्राहकांना ठेवींवर मजबूत परतावादेखील मिळतो. अशा परिस्थितीत जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक बचत योजना आणि कोणत्याही एका महत्त्वाच्या बँकेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला दोन्हीवर उपलब्ध व्याजदरांबद्दल माहिती देणार आहोत.
ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर ‘एवढे’ व्याज मिळते
पोस्ट ऑफिस बचत योजना ही ज्येष्ठ नागरिक बचत योजनेंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना जमा केलेल्या रकमेवर ८.२० टक्के व्याजदराचा लाभ देते. या योजनेत तुम्ही १ हजार ते ३० लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. सरकार या योजनेचा व्याजदर तिमाही आधारावर ठरवते आणि खात्यात जमा करते. या योजनेत तुम्ही एकूण ५ वर्षांसाठी पैसे गुंतवू शकता. यामध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला प्राप्तिकर कलम ८० सीअंतर्गत १.५ लाख रुपयांची सूट मिळते.
हेही वाचाः Money Mantra : SBI चे ग्राहक असाल तर आता ATM कार्डशिवाय पैसे काढता येणार, जाणून घ्या पद्धत
SBI FD योजना
स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना ७ दिवस ते १० वर्षांच्या FD वर ३.५० टक्के ते ७.५० टक्के व्याजदर देते. त्याच वेळी बँक अमृत कलश योजना (४०० दिवसांची एफडी योजना) अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक ७.६० टक्के व्याज देते.
बँक ऑफ बडोदा एफडी योजना
सार्वजनिक क्षेत्रातील मोठी बँक म्हणजेच बँक ऑफ बडोदा ७ दिवसांपासून ते १० वर्षांपर्यंतच्या FD वर ज्येष्ठ नागरिकांना ३.५० टक्के ते ७.५० टक्के व्याजदर देत आहे. तर बँक २ ते ३ वर्षांसाठी FD योजनेवर जास्तीत जास्त ७.७५ टक्के व्याजदर देत आहे.
हेही वाचाः नारायण मूर्तींच्या ‘त्या’ वक्तव्यावर अश्नीर ग्रोव्हर नाराज, म्हणाले…
एचडीएफसी बँक एफडी योजना
HDFC बँक ही खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक ७ दिवसांपासून ते १० वर्षांच्या कालावधीसाठी FD साठी ज्येष्ठ नागरिकांना ३.५० टक्के ते ७.७५ टक्के व्याजदर देते. कमाल व्याजाचा लाभ म्हणजे ७.७५ टक्के व्याज फक्त ५ ते १० वर्षांसाठी FD योजनांवर उपलब्ध आहे.
आयसीआयसीआय बँक एफडी योजना
ICICI बँक सामान्य ग्राहकांच्या तुलनेत ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना ०.५० टक्के अतिरिक्त व्याजदराचा लाभ देते. सामान्य ग्राहकांना ७ दिवसांपासून ते १० वर्षांपर्यंतच्या FD योजनांवर ३.५० टक्के ते ७.५० टक्के व्याजदर मिळत आहेत. तर १५ महिने ते २ वर्षांपर्यंतच्या FD योजनांवर जास्तीत जास्त व्याजदराचा लाभ मिळतो.