सुधाकर कुलकर्णी

शेअर बाजारात खरेदी-विक्री करण्यासाठी डी-मॅट (डी-मटेरियलायझेशन) खाते आवश्यक असते. डी-मॅट असल्याशिवाय शेअर बाजारात गुंतवणूक करता येत नाही. बँकेतील सेव्हिंग खात्याप्रमाणे शेअर बाजारात डी-मॅट खाते काम करते म्हणजेच डी-मॅटमध्ये आपण घेतलेले शेअर्स इलेक्ट्रॉनिक स्वरूपात जमा होतात आणि आपण विकलेले शेअर खात्यातून जाऊन त्याची नोंद (डेबिट) होते. यात पैसे जमा अथवा वजा होत नाहीत त्यासाठी ट्रेडिंग खाते असते.

Sensex and Nifty continue to increase for third consecutive day
मार्केट वेध : शेअर बाजाराची सलग तिसऱ्या दिवशी आगेूकूच; अदानींच्या शेअर्समध्ये उत्साही भरते कशाने?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Sensex gains , stock market rise , Sensex ,
मार्केट-वेध : शेअर बाजारात सेन्सेक्सची २२५ अंशांची कमाई; मात्र सत्रारंभीच्या मुसंडीला, दिवसअखेर पुन्हा गळती!
rupee recovered 8 paise from its historic low against the us dollar to settle at 86.62
नीचांकी पातळीवरून रुपया ८ पैशांनी सावरला
Stock market hits 650-point high with Sensex
मार्केट-वेध : सेन्सेक्स सावरला; पण बाजारातील तेजीचे पतंग काटले जाणार की, मोठी भरारी घेणार?
adani group stocks gains
Adani Group Shares: काल शेअर बाजार कोसळल्यानंतर आज अदाणी समूहाच्या शेअर्समध्ये उसळी; कारण काय?
Stock market today BSE Sensex crashes over 1000 points
मुंबई शेअर बाजार हजार अंशांनी कोसळला; डॉलरच्या तुलनेत भारतीय चलन विक्रमी नीचांकावर
Jumped Deposit Scam
बॅलेन्स चेक करताना बँक खातंच रिकामं; काय आहे नवीन ‘Jumped Deposit Scam’?

‘डी-मॅट’ खाते फक्त शेअर्सची खरेदी-विक्री करण्यासाठी वापरले जाते. तर शेअर विकल्यानंतर पैसे दोन दिवसानंतर ट्रेडिंग खात्यात जमा केले जातात. भारतात सध्या एनएसडीएल (नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड) आणि सीडीएसएल (सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस) या दोन संस्था ‘डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स’मार्फत (डीपी) देऊ करतात. सार्वजनिक क्षेत्रातील बँका (स्टेट बॅंक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बॅंक), काही व्यावसायिक (खाजगी क्षेत्रातील) बँका (कोटक महिंद्रा बँक), सहकारी बँका (कॉसमॉस बॅँक) आणि सर्व प्रमुख ब्रोकर (शेअरखान, मोतीलाल ओसावाल) ‘एनएसडीएल’ आणि ‘सीडीएसएल’चे ‘डीपी’ असून, त्यांच्यामार्फत आपण ही सुविधा घेऊ शकतो. यासाठी आपल्या सोयीनुसार बँक अथवा ब्रोकरकडे डी-मॅट खाते उघडावे लागते.

डीमॅटसाठी काय गोष्टी आवश्यक?

डीमॅटखाते सुरू करण्यासाठी फोटो, आधार कार्ड, आणि पॅन कार्डची सेल्फ अटेस्टेड झेरॉक्स प्रत आवश्यक आहेत. सर्व कागदपत्रे जोडून ‘डीपी’चा फॉर्म भरून द्यावा लागतो. तसेच या खात्याशी आपले बँक खाते संलग्न (लिंक) करावे लागते. यासाठी जे खाते लिंक करावयाचे असेल त्याचा सर्व तपशील (खाते क्र., बँकेचे नाव व पत्ता, आयएफएससी कोड, एमआयसीआर कोड) देऊन त्यासोबत त्या खात्याचा कॅन्सल चेक जोडावा लागतो. ही सर्व पूर्तता केल्यावर साधारणपणे एक आठवड्यात आपले डी-मॅट खाते उघडले जाते. त्यानंतर आपल्या पत्त्यावर खात्याचा तपशील व डिलिव्हरी इन्स्ट्रक्शन स्लिप (डीआय स्लीप) बुक कुरिअरने पाठविले जाते. ज्याप्रमाणे आपल्या बँक खात्यातून पेमेंट करण्यासाठी चेकचा वापर करावा लागतो, त्याप्रमाणेच आपल्या डी-मॅट खात्यातील शेअर्स ट्रान्स्फर करण्यासाठी ‘डीआय स्लिप’चा वापर करावा लागतो. (हे काम ऑनलाईनदेखील करता येते.)

हेही वाचा… Money Mantra : क्रेडिट कार्डाचे बिल ठरतेय डोकेदुखी? ‘या’ पद्धतीनं पटकन भरा अन् CIBIL स्कोर सुधारा

डी-मॅट खाते एकाच्या, तसेच संयुक्त नावाने उघडता येते. या खात्यावर ‘आयदर ऑर सर्व्हायव्हर’ किंवा ‘एनीवन ऑर सर्व्हायव्हर’ ही सुविधा वापरता येते; मात्र असे खाते एकाच्या सहीने चालविता येत नाही. संयुक्त खात्यावरील सर्व खातेदारांना या खात्यावर व्यवहार करताना सह्या कराव्या लागतात. आपण खरेदी अथवा विकलेल्या शेअर्सची नोंद या खात्यावर जमा नावे पद्धतीने होत असते तसेच महिन्याअखेर खात्यावर ई-मेलद्वारे स्टेटमेंट पाठवण्यात येते.

ई-मेलद्वारे मिळणाऱ्या स्टेटमेंटमध्ये काय असते?

या स्टेटमेंटमध्ये विशिष्ट तारखेला आपल्या नावावर असलेल्या सर्व शेअर्सचा तपशील (कंपनीचे नाव, शेअर्सची संख्या, कंपनीचा आयएसआयएन नंबर आणि कंपनीचा सिम्बॉल) आपल्याला त्यातून समजतो. शिवाय या तारखेला प्रत्येक शेअरची बाजारभावाने होणारी किंमत व सर्व शेअर्स मिळून एकत्रित किंमत दिली जाते. ही सुविधा वापरण्यासाठी साधारणपणे ३५० ते ४५० रुपये इतकी वार्षिक फी संबंधित ‘डीपी’कडून आकारली जाते. हल्ली काही डीपी दोन ते तीन हजार रुपये इतकी वन टाइम फी आकारत आहेत.

हेही वाचा… Money Mantra : सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवलेल्या रकमेच्या दुप्पट व्याज मिळणार, एकूण परतावा २०० टक्के, गणित समजून घ्या

प्रायमरी मार्केटमध्ये पब्लिक इश्यूसाठी अर्ज करताना हा डी-मॅट खाते नंबर द्यावा लागतो. आपल्याला शेअर्स देवू केले गेल्यास असे शेअर्स आपल्या डी-मॅट खात्यात परस्पर जमा केले जातात. आपण सेकंडरी मार्केटमध्ये खरेदी अथवा विक्री करणार असाल, तर ब्रोकरमार्फत घेतले अथवा विकलेले शेअर्स डी-मॅट खात्यात जमा नावे होतात. ब्रोकरकडेच डी-मॅट खाते असणे जास्त सोयीस्कर ठरू शकते. कारण आपण ऑनलाइन व्यवहार करणार नसाल, तर दर वेळेला डीआय स्लिप बँकेकडे पाठवली जाते. त्याऐवजी ब्रोकरकडेच डी-मॅट खाते असेल, तर ते जास्त सोयीचे होते.

आता डी-मॅट खात्यावर आपण म्युचुअल फंड, डिबेंचर्स, कॅपिटल गेन बॉण्ड यांसारखे व्यवहारही करू शकता. नजीकच्या काळात पोस्टल सर्टिफिकेट्स, पीपीएफ यांसारखी गुंतवणूकसुद्धा डी-मॅट खात्यातून करता येऊ शकेल. विशेष म्हणजे शेअर बाजारातील सर्व व्यवहार आता ‘डीपी’मार्फतच होत असल्याने आपल्याला शेअर बाजारात गुंतवणूक करायची असेल, तर हे खाते उघडणे क्रमप्राप्त आहे.

Story img Loader