EPF Tax Rules: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी याला प्रॉव्हिडेंट फंड किंवा PF म्हणून देखील ओळखले जाते. निवृत्तीनंतरही उत्पन्न सुरू ठेवण्यासाठी ही सर्वात लोकप्रिय योजना आहे. कर्मचारी दरमहा त्यांच्या पगाराच्या १२ टक्के रक्कम या फंडात जमा करतात. कर्मचार्‍यांबरोबर कंपनीचाही वाटा १२ टक्के असतो. या निधीत जमा होणाऱ्या रकमेवर सरकारकडून व्याजही दिले जाते. प्राप्तिकर विभाग बँक खात्यातून मिळालेल्या उत्पन्नावर जसे व्याज, घरभाडे इत्यादींवर कर वसूल करतो. त्याचप्रमाणे पीएफ खात्यात जमा केलेल्या रकमेवरही कर आकारला जातो. ईपीएफ खात्यातून मिळणाऱ्या कमाईवर वेगवेगळ्या परिस्थितीत कर आकारला जातो. आज पीएफमधून पैसे काढण्यावर कधी कर आकारला जातो? हे जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ईपीएफ खात्याचे नियम

ईपीएफ नियमांनुसार, जेव्हा जेव्हा कर्मचारी पीएफ फंडातून पैसे काढतो, तेव्हा त्याला काही अटी पूर्ण कराव्या लागतात. पीएफ फंडातील संपूर्ण रक्कम निवृत्तीनंतरच काढता येते. ईपीएफओने यासाठी ५५ वर्षे वयोमर्यादा निश्चित केली आहे. कोणताही कर्मचारी निवृत्तीपूर्वी पीएफ फंडातून केवळ ९० टक्के रक्कम काढू शकतो.

हेही वाचाः पंतप्रधान जनधन योजनेमध्ये खातेदारांची संख्या वाढणे आवश्यक; केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराडांचे आवाहन

जर एखाद्या व्यक्तीची नोकरी गेली असेल तर तो पीएफ फंडातून पहिल्या वेळी ७५ टक्के आणि दुसऱ्यांदा संपूर्ण रक्कम काढू शकतो. सर्व कर्मचाऱ्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, पीएफ फंडातून पैसे काढण्यापूर्वी त्यांना काही कागदपत्रे सादर करावी लागतील. याबरोबरच काही अटींसह पीएफ फंडातून पैसे काढता येतात.

हेही वाचाः कमी कर भरल्याच्या प्रकरणात GST प्राधिकरणाने LIC ला ठोठावला ३६८४४ रुपयांचा दंड

EPF मधून पैसे काढल्यावर कर कधी लावला जातो?

ईपीएफ खात्यावर कर कधी आकारला जातो याबद्दल विचारले असता ईपीएफ खात्यावर कोणताही कर नसल्याचं सांगितले जाते. प्राप्तिकर कायदा ८० सी अंतर्गत कर कपातीचा दावा केला जाऊ शकतो. कर्मचार्‍यांच्या योगदानावर किंवा इतर कोणत्याही स्रोतातून मिळालेले व्याज करपात्र असेल तर त्यावर कर आकारला जातो. याशिवाय कंपनीने केलेले योगदान आणि त्यावर मिळणारे व्याजही पूर्णपणे करपात्र आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्याने कंपनीत ५ वर्षे काम करण्यापूर्वी पीएफ फंडातून पैसे काढले तर टीडीएस कापला जातो. तसेच जर तो एखाद्या कंपनीत ५ वर्षे काम करतो आणि त्यानंतर पीएफ फंडातून पैसे काढतो, तर त्यावर कोणत्याही प्रकारचा कर कापला जात नाही.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Money mantra withdrawing money from pf account do you have to pay tax or not what does the rule of epfo say vrd
Show comments