SSY vs MSSC: पोस्ट ऑफिस देशातील प्रत्येक विभागासाठी त्यांच्या गरजेनुसार योजना उपलब्ध करून देत असते. देशाच्या अर्ध्या लोकसंख्येला स्वावलंबी बनवण्यासाठी पोस्ट ऑफिस अनेक योजना सुरू करते. २०२३च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महिलांच्या गरजेनुसार महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना सुरू केली होती. नावाप्रमाणेच ही योजना महिलांच्या गरजेनुसार तयार करण्यात आली आहे. या योजनेत दोन वर्षांत गुंतवणूक करून तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. याशिवाय तुम्ही तुमच्या १० वर्षांपर्यंतच्या मुलीसाठी सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करून मजबूत परतावा मिळवू शकता. दोन्ही योजना महिलांच्या गरजेनुसार तयार केल्या गेल्या आहेत आणि त्यामध्ये गुंतवणूक करून तुम्हाला मजबूत परतावा मिळू शकतो. दोन्ही योजनांच्या तपशीलांबद्दल जाणून घेऊ यात.
महिला बचत प्रमाणपत्र योजना
कोणत्याही वयोगटातील महिला या योजनेत गुंतवणूक करू शकतात आणि त्यात जास्तीत जास्त गुंतवणूक रक्कम २ लाख रुपये आहे. या योजनेत २ वर्षांसाठी पैसे गुंतवून तुम्ही ७.५० टक्के निश्चित व्याजदराचा लाभ घेऊ शकता. या योजनेअंतर्गत प्राप्तिकर कलम ८० सी अंतर्गत जमा केलेल्या रकमेवर १.५० लाख रुपयांची सूट उपलब्ध आहे. तुम्ही डिसेंबर २०२३ मध्ये या योजनेअंतर्गत २ लाख रुपये गुंतवल्यास तुम्हाला मॅच्युरिटीवर २,३२,०४४ लाख रुपये मिळतील.
हेही वाचाः भाजपाच्या विजयानंतर शेअर बाजारात तेजी, १५ मिनिटांत बाजारात ४ लाख कोटींची कमाई
सुकन्या समृद्धी योजना
केंद्रातील मोदी सरकारने २०१४ मध्ये सुकन्या समृद्धी योजना सुरू केली होती. विशेषतः महिलांच्या गरजा लक्षात घेऊन ही योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही १० वर्षांपर्यंतच्या मुलीसाठी सुकन्या समृद्धी खाते उघडू शकता आणि प्रति वर्ष २५० ते १.५० लाख रुपये गुंतवून मोठा परतावा मिळवू शकता. मुलीच्या नावाने चालवल्या जाणाऱ्या या योजनेंतर्गत मुलगी १८ वर्षे पूर्ण केल्यानंतर जमा रकमेच्या ५० टक्के रक्कम काढू शकते. वयाच्या २१ व्या वर्षी संपूर्ण रक्कम काढता येते. या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या मुलीच्या शिक्षण आणि लग्नाच्या खर्चाच्या तणावातून मुक्त व्हाल. या योजनेअंतर्गत सरकार सध्या जमा केलेल्या रकमेवर ८ टक्के व्याजदराचा लाभ देत आहे.
हेही वाचाः BYJU’s च्या १००० कर्मचाऱ्यांचे नोव्हेंबरचे पगार रखडले, कंपनीनं दिलं ‘हे’ कारण
MSSC vs SSY
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र आणि सुकन्या समृद्धी योजना या दोन्ही योजना महिलांच्या गरजा लक्षात घेऊन सुरू केल्या आहेत, परंतु लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे MSSC ही अल्पकालीन बचत योजना आहे. तर SSY ही दीर्घकालीन बचत योजना आहे. सुकन्या खात्यात गुंतवणूक केल्याने तुम्ही तुमच्या मुलीच्या शिक्षण आणि लग्नाच्या खर्चाच्या तणावातून मुक्त व्हाल. अल्पावधीत जास्त परतावा मिळवण्यासाठी तुम्ही MSSC खात्यात गुंतवणूक करू शकता.