देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपल्या ग्राहकांसाठी ई-रुपी सुविधा सुरू केली आहे. आता ई-रुपीद्वारे UPI पेमेंट करता येणार आहे. या सुविधेला सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC) म्हणतात. ग्राहकांच्या मदतीसाठी एसबीआयने ई-रुपी बाय एसबीआय अॅप लाँच केले आहे. या अॅपद्वारे ग्राहक आता UPI QR कोड स्कॅन करून सहजपणे UPI पेमेंट करू शकतात. SBI बँकेने गेल्या वर्षी डिसेंबर २०२२ मध्ये रिटेल डिजिटल ई-रुपी लाँच केले होते. ई-रुपी या सुविधेद्वारे डिजिटल पेमेंटला चालना मिळाली आहे, असा बँकेचा विश्वास आहे. भारतात डिजिटल क्रांती आणणे हे बँकेचे उद्दिष्ट आहे.

या बँकांमध्येही ई-रुपीद्वारे UPI करता येते

आता SBI, बँक ऑफ बडोदा (BOB), युनियन बँक ऑफ इंडिया, HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, येस बँक आणि IDFC फर्स्ट बँक यांसारख्या अनेक बँकांमध्ये तुम्ही डिजिटल रुपयाद्वारे UPI पेमेंट करू शकता. अशा परिस्थितीत अनेकांना प्रश्न पडतो की, डिजिटल रुपयाद्वारे UPI पेमेंट कसे करतात.

हेही वाचाः SRK चा ‘जवान’ रिलीज होण्याच्या पार्श्वभूमीवर PVR INOX चा शेअर वाढला, उद्योगविश्वाचे चित्रपटाच्या प्रदर्शनाकडे लक्ष

ई-रुपीद्वारे UPI पेमेंट कसे करावे?

ग्राहक त्यांच्या ई-वॉलेटमध्ये ई-रुपया जोडतात आणि नंतर त्या ई-रुपयाद्वारे UPI पेमेंट करू शकतात. अशा परिस्थितीत ग्राहकाला रोख ठेवण्याची गरज भासणार नाही. विशेष म्हणजे व्यापारी CBDC आणि UPI दोन्हीमध्ये पेमेंट करू शकतात. याशिवाय अनेक बँकांनी ग्राहकांना डेबिट कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढण्याची सुविधाही दिली आहे. यामध्ये ग्राहक UPI द्वारे एटीएममधून सहज पैसे काढू शकतात.

हेही वाचाः टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स हल्दिराममधील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत, दोन्ही कंपन्यांमध्ये चर्चा सुरू

SBI देशातील सर्वात मोठी व्यावसायिक बँक

SBI ही देशातील सर्वात मोठी व्यावसायिक बँक आहे. ही बँक सर्वात मोठी कर्ज देणारी देखील आहे. चालू आर्थिक वर्ष 2023 पर्यंत बँकेच्या ठेवी 45.31 लाख कोटी रुपये होत्या.

Story img Loader