Sheila Singh Success Story : चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी पुन्हा एकदा इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्रॉफी जिंकून चर्चेत आला आहे. या बातम्यांमध्ये एक बातमी अशीही आली होती की, धोनी आयपीएलसह क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेणार आहे. तसे धोनीने या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही, पण त्याने तसे केले तरी त्याच्या कमाईवर फारसा परिणाम होणार नाही. धोनी इतका मोठा ब्रँड बनला आहे की, त्याच्याकडे पैसे स्वतःच येतच असतात. आता आपण धोनीबद्दल कमी आणि त्याच्या एका कंपनीच्या सीईओबद्दल अधिक माहिती सांगणार आहोत. कारण माहीबरोबर त्या व्यक्तीचे खास नाते आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सासू कंपनी सांभाळते

शीला सिंह या एमएस धोनीच्या प्रोडक्शन हाऊस ‘धोनी एंटरटेन्मेंट लिमिटेड’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आहेत. ही कंपनी करोडोंचा व्यवसाय करते. विशेष म्हणजे शीला सिंह या साक्षी सिंहची आई म्हणजेच धोनीची सासू आहे. एवढेच नाही तर या कंपनीत आणखी एक सीईओ असून, धोनीची पत्नी साक्षी ही जबाबदारी सांभाळत आहे. खरं तर जेव्हा आपल्या व्यवसायाच्या साम्राज्याचा विस्तार करण्याचा विचार आला, तेव्हा धोनीने कुटुंबातील सदस्यांवर अधिक विश्वास दाखवला आणि आपल्या सासूवर एक मोठी जबाबदारी सोपवली. ती २०२० पासून कंपनीची प्रमुख आहे.

हेही वाचाः २१ व्या वर्षी ४५ लाखांच्या पॅकेजची नोकरी, राजस्थानची तान्या सिंह जपानच्या जगप्रसिद्ध आयटी कंपनीत कशी पोहोचली?

कंपनी नवीन उंचीवर

शीला सिंह पहिल्यांदाच एखाद्या कंपनीचे नेतृत्व करत आहेत, असे म्हणायला हरकत नाही, पण तिने आपल्या मुलीबरोबर ‘धोनी एंटरटेन्मेंट लिमिटेड’ला नव्या उंचीवर नेले आहे. एका रिपोर्टनुसार, आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात शीला सिंह यांचे पती आर के सिंह हे एमएस धोनीचे वडील पान सिंह धोनी यांच्याबरोबर कनोई ग्रुपच्या ‘बिनागुरी टी कंपनी’मध्ये काम करायचे. त्यावेळी शीला सिंह गृहिणी होत्या आणि त्यांनी घर आणि मुलांची काळजी घेतली.

हेही वाचाः विश्लेषण : अतिश्रीमंत व्यक्ती २०२३ मध्ये भारत सोडून जाण्याचा अंदाज; अब्जाधीश देशातून स्थलांतर का करतात?

साक्षी सर्वात मोठी शेअरहोल्डर

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शीला सिंह आणि साक्षी धोनीच्या नेतृत्वाखाली धोनी एंटरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेडची एकूण संपत्ती ८०० कोटींहून अधिक झाली आहे. साक्षी धोनी सध्या एमएस धोनीच्या प्रोडक्शन हाऊसची सर्वात मोठी शेअरहोल्डर आहे. धोनी एंटरटेन्मेंट ही टीम इंडियाचा माजी कर्णधार धोनीने स्थापन केलेल्या अनेक कंपन्या आणि व्यावसायिक उपक्रमांपैकी एक आहे. त्यामुळे त्यांची संपत्ती १०३० कोटींवर पोहोचली आहे. धोनी अनेक कंपन्यांच्या जाहिराती करतो. याशिवाय त्याने अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे, ज्यामुळे तो दरवर्षी भरपूर कमाई करतो.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ms dhoni mother in law runs a company worth 800 crores who exactly is sakshi mother sheila singh vrd
Show comments