कौस्तुभ जोशी

· फंड घराणे – इव्हेस्को इंडिया म्युच्युअल फंड

Tejaswini Bhavan in Akola built with contributions from mahila bachat gat and Sadhan Kendra
अकोला : बचत गटातील महिलांच्या योगदानातून ‘तेजस्विनी’ महाराष्ट्रातील एकमेव पथदर्शी उपक्रम
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Sanjay Malhotra loksatta article
अन्वयार्थ : कपातपर्वाचा पायरव?
public sector banks npa marathi news
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे ‘एनपीए’ ३.१६ लाख कोटींवर
equity funds investment declined
इक्विटी फंडांतील ओघ ओसरला! नोव्हेंबरमध्ये १४ टक्क्यांनी घटून ३५,९४३ कोटींवर
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?
mishtann food limited
मिष्टान्न! (पूर्वार्ध)
high expectations from third quarter
तिसऱ्या तिमाहीकडून अपेक्षांचे ओझे !

· फंडाचा प्रकार – इक्विटी फंड

· एन. ए. व्ही. (१३ फेब्रुवारी २०२४ रोजी) ग्रोथ पर्याय – ५७.१५ रुपये प्रति युनिट

· फंड मालमत्ता (३१ जानेवारी २०२४ रोजी ) – ९२५ कोटी रुपये.

· फंड मॅनेजर्स – अमित निगम, हितेश जैन.

फंडाची स्थिरता ( ३१ जानेवारी २०२४ )

· पोर्टफोलिओ टर्नओव्हर ७२ %

· स्टॅंडर्ड डिव्हिएशन १४.०१ %

· बीटा रेशो ०.९३ %

पोर्टफोलिओ टर्नओव्हर म्हणजे एखाद्या फंड मॅनेजरने फंड योजनेमध्ये शेअरची सतत खरेदी विक्री खरेदी सुरू ठेवणे. जेवढे जास्त खरेदी विक्री व्यवहार घडतील तेवढाच फंडाचा खर्च वाढतो. पोर्टफोलिओ टर्नओव्हर जास्त असणे फारसे चांगले मानले जात नाही.

स्टॅंडर्ड डिव्हिएशन म्हणजेच एखाद्या फंडाचा परतावा गेल्या तीन वर्षात किती स्थिर राहिला आहे त्याचे निर्दशक आहे. म्हणजेच दोन फंडाची तुलना करता ज्या फंडाचा हा आकडा कमी आहे तो फंड साधारणतः पुढील काळात दुसऱ्या फंडा पेक्षा तसेच परतावे देण्याची शक्यता आहे उदाहरण घेऊया फंड X आणि फंड Y यांनी १२% परतावा मागच्या पाच वर्षात दिला आहे. जर स्टॅंडर्ड डिव्हिएशन चा फंड X चा आकडा Y पेक्षा कमी असेल तर फंड X पुढील काळात तसाच सर्वसाधारण परतावा देऊ शकतो तर, फंड Y मधून मिळणारा परतावा बदलू शकतो.

हेही वाचा… Money Mantra : लक्ष्मीची पावले : कासव आणि आपली गुंतवणूक…

बीटा म्हणजेच गेल्या तीन वर्षात फंडाने दिलेल्या परताव्यावरून भविष्यात तो फंड किती वर किंवा खाली जाईल याचा अंदाज लावणे, जेवढी बीटा व्हॅल्यू कमी असेल तेवढाच फंड भरवशाचा.

शार्प रेश्यो म्हणजे अधिक रिटर्न्स मिळवण्यासाठी फंडाने किती जोखीम घेतली आहे, अधिकाधिक रिटर्न मिळवण्यासाठी फंड मॅनेजरने घेतलेली जोखीम अधिक असेल तर त्याचे प्रतिबिंब यामध्ये उमटते.

तुमच्यासाठी हा फंड महत्त्वाचा का ?

फंड मॅनेजर शेअर्स निवडताना पुढील मुद्द्यांचा विचार करतात.

· बाजारातील एकूण व्यवसायापैकी किती टक्के व्यवसाय कंपनीकडे आहे.

· सलग पाच वर्षे विक्री आणि नफा यातील वाढ कायम आहे किंवा नाही.

· कंपनीचा कर्ज व्यवस्थापनाचा अनुभव कसा आहे.

· कंपनीकडे पुरेशा ऑर्डर्स आहेत किंवा नाही.

· कंपनीचा व्यवसाय कोणत्या सरकारी धोरणावर थेट अवलंबून तर नाही ना ?

हेही वाचा… Money Mantra : करावे कर समाधान : नवीन घरातील गुंतवणुकीची सवलत फक्त दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्यासाठी

· प्रॉफिट मार्जिन कायम आहे ना ?

मिडकॅप आणि स्मॉल कॅपचा विचार करता तुलनात्मक दृष्टीने लार्ज कॅप कंपन्यांमध्ये कायमच व्यावसायिक स्थिरता असते. जेव्हा एखाद्या कारणामुळे मार्केटमध्ये मंदी येते किंवा बाजार कोसळतात अशा वेळी लार्ज कॅप कंपन्यांचे शेअर्स कमी पडतात व झालेली पडझड लवकर भरून येते.

रिस्को मिटरचा विचार करायचा झाल्यास ‘Very High’ म्हणजेच सर्वाधिक जोखीम असलेल्या श्रेणीमध्ये हा फंड मोडतो.

१३ फेब्रुवारी २०२४ रोजी फंडाचा परतावा (CAGR पद्धतीने)

· एक वर्ष – ३३.५९ %

· दोन वर्षे – १२. ९१ %

· तीन वर्षे – १६. १० %

· पाच वर्षे – १६. ११ %

· दहा वर्षे – १५. ५९ %

· फंड सुरु झाल्यापासून – १२.७८ %

हेही वाचा… Money Mantra: ईटीएफ म्हणजे काय आणि त्यात गुंतवणूक कशी करावी?

फंडाने गुंतवणूक कुठे केली आहे ?

३१ जानेवारी २०२४ अखेरीस उपलब्ध आकडेवारीनुसार या फंड योजनेच्या पोर्टफोलिओमध्ये ४९ शेअर्स आहेत.

आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, एचडीएफसी बँक, रिलायन्स, टाटा मोटर्स, ॲक्सिस बँक, इंडसइंड बँक, चोलामंडलम इन्वेस्टमेंट अँड फायनान्स, युनायटेड स्पिरिट्स हे टॉप 10 शेअर्स पोर्टफोलिओमध्ये आहेत.

एकूण पोर्टफोलिओतील २०% शेअर्स खाजगी बँकांचे असून त्यानंतर कॉम्प्युटर सॉफ्टवेअर १० %, पेट्रोलियम, वाहन उद्योग प्रत्येकी ५ %, फार्मा ३.५ % असे गुंतवणूक व्यवस्थापन केले गेले आहे.

गेल्या महिन्याभराच्या काळात एल टी आय माईंड ट्री आणि नेसले या कंपन्यांमधील गुंतवणूक फंडाने विकली आहे. तर ब्रिटानिया, टाटा कन्सल्टन्सी, सन फार्मा या नवीन शेअर्सचा पोर्टफोलिओ मध्ये समावेश केला गेला आहे.

‘एस.आय.पी.’तील दीर्घकालीन परतावे

तुम्ही या फंडात दरमहा एक हजार रुपयांची गुंतवणूक केली असती तर

· एक वर्षापासून एसआयपी केली असती तर ३७.९५ %

· दोन वर्षे २४. ५५ %

· तीन वर्षे १८. ६ %

· पाच वर्षे १८. ६७ %

· सलग दहा वर्ष १४. ३६ %

असा स्थिर परतावा मिळालेला दिसतो.

नुकत्याच एका निर्णयाद्वारे फंड घराण्यांनी जाहिरात करताना दहा वर्षाच्या सरासरी रिटर्नचा (CAGR) समावेश त्यात करावा अशी मार्गदर्शक सूचना करण्यात आली. त्यानुसार निवडक फंडांचे विश्लेषण या लेखमालिकेतून केले जात आहे. फंड योजनेत गुंतवणूक करावी असा सल्ला देणे हा या लेखमालिकेचा उद्देश नाही. या फंडात गुंतवणूक करताना सर्व जोखीम विषयक माहिती वाचून आपल्या जबाबदारीवरच गुंतवणूक करावी.

Story img Loader