वसंत माधव कुळकर्णी

म्युच्युअल फंड अभ्यासक या नात्याने समभाग, रोखे आणि हायब्रीड म्युच्युअल फंडाच्या विविध फंड गटांतील निवडक तीन फंड निवडण्यासाठी विविध शैलींमध्ये आणि विविध फंड गटांतील हजारो फंडांच्या एका वर्षाच्या चलत परताव्यानुसार (वन ईयर रोलिंग रिटर्न) आणि जोखीम समायोजित परताव्याच्या कामगिरीनुसार यादी बनवून फंडांची शिफारस केली जाते. आवश्यकतेनुसार निधी व्यवस्थापकांशी चर्चा केली जाते. सरलेली तिमाही तुलनेने कमी अस्थिर तिमाही होती, असे जानेवारी-मार्च या तिमाही आढाव्यात आढळून आले. साहजिकच मागील वर्षांतील ऑक्टोबर-डिसेंबर आणि जानेवारी-मार्च या तिमाहीतील अस्थिरतेत मोठा फरक आढळला. ऑक्टोबर-डिसेंबरच्या तुलनेत जानेवारी-मार्च तिमाहीत अस्थिरता कमी होत असलेली दिसून आली. भांडवली बाजार नियामक सेबीच्या डझनभर वर्गवारी वापरण्यापेक्षा मालमत्ता वर्गानुसार अधिक मालमत्ता असलेल्या आठ गट निवडून त्या गटातील फंडांची क्रमवारी निश्चित केली.

inflation rate declined
किरकोळ महागाई दराची उसंत, नोव्हेंबरमध्ये ५.४८ टक्क्यांवर घसरण
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
ajit pawar
उद्या मंत्रिमंडळ विस्तार? अजित पवार यांचा दावा; दोन दिवसांच्या चर्चेत सूत्र निश्चित
indian stock market nifty sensex
अमेरिकी महागाई दराच्या प्रतीक्षेत निर्देशांकात नगण्य वाढ
mumbai, Coldest December, minimum temperature
मुंबई : नऊ वर्षांतील थंड डिसेंबर
price of potatoes increased up to rs 10 per kg due to supply restrictions from west bengal
उत्तरेत ऐन थंडीत बटाटा तापला; पश्चिम बंगालने राज्याबाहेर बटाटा, कांदा विक्री, वाहतुकीस घातली बंदी
mercury in nashik drops 9 4 degrees celsius
नाशिकमध्ये थंडीचे पुनरागमन; पारा ९.४ अंशावर
Cold weather Thane district, Thane district temperature,
ठाणे जिल्हा पुन्हा गारठला, जिल्ह्यातील तापमान सरासरी १२ अंश सेल्सिअस

ऑक्टोबर-डिसेंबर २०२२ मधील तेजीनंतर, जानेवारी-मार्च २०२३ च्या पहिल्या तिमाहीत पुन्हा एकदा मंदीच्या तडाख्यात सापडला. अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँकेच्या पतनानंतर आणि क्रेडिट सुईसच्या खरेदीमुळे जागतिक बँकिंग संकटाची भीती कमी झाली तरी जागतिक स्तरावर विविध देशांच्या बाजारात मोठी घसरण अनुभवास आली. जानेवारी-मार्च तिमाहीत निफ्टी ५० टीआआय निर्देशांक जवळपास ४ टक्क्यांनी घसरला तर सेन्सेक्स २.८ टक्क्यांनी घसरला. तिमाही फंड आढाव्यात क्वचितच एखादा फंड वगळला जातो. कर्त्यांच्या यादीतून एखादा फंड वगळण्याचे ठरवल्यास, त्या फंडाला वगळण्याआधी सुधारणेसाठी पुरेसा वेळ दिला जातो. त्यानंतर तो फंड ‘राखून ठेवा’ (होल्ड) प्रकारात वर्ग केला जातो. या प्रकारात विद्यमान गुंतवणूक राखून ठेवू शकता आणि फंडातून बाहेर पडण्याचे कोणतेही कारण नाही.

आणखी वाचा- मार्ग सुबत्तेचा – पोर्टफोलिओ विविधीकरण म्हणजे नक्की काय?

दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की, पुनरावलोकनात वगळलेल्या फंडांचा मागोवा घेणे थांबवत नाही. अनेकदा असे वगळलेल्या फंडांनी काही कालावधीनंतर पुनरागमन केल्याचे दिसून येते. बऱ्याच प्रसंगी नमूद केल्याप्रमाणे, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये खूप जास्त ‘राखून ठेवावे’ या प्रकारात असतील तर वाचकांनी या प्रकारच्या फंडांचा एकत्रित विचार केला पाहिजे. तुमच्या पोर्टफोलिओत खूप फंड असतील तर एकाच फंड गटातील ‘होल्ड’ प्रकारातील फंड वगळणे (एसआयपी थांबविणे) योग्य ठरते. गेल्या ५-७ वर्षांमध्ये, अनेक फंडांनी कामगिरीत घसरण अनुभवली. ज्यामध्ये सातत्य दाखवण्याऐवजी अचानक अल्प कालावधीसाठी (एखाद्या तिमाहीत) कामगिरीत सुधारणा (बाउन्स बॅक) दिसून आली. तुमची मोठी गुंतवणूक सक्रिय व्यवस्थापित फंडात असेल तर पोर्टफोलिओचे कमी व्यवस्थापन केले पाहिजे आणि पोर्टफोलिओत निष्क्रिय व्यवस्थापित फंड असतील तर पोर्टफोलिओचे सक्रिय व्यवस्थापन केले पाहिजे. एक अभ्यासक म्हणून दीर्घकालीन एसआयपी करण्याच्या तत्त्वज्ञानावर ठाम विश्वास आहे. फंडांचे मंथन करण्यावर अजिबात विश्वास न ठेवल्याने काहीही प्राप्त होत नाही तरीही पोर्टफ़ोलिओचा वार्षिक आढावा घ्यायला हवाच.

आणखी वाचा- VPF मध्ये पीएफपेक्षा जास्त फायदा, मोठी रक्कम हातात येणार अन् कर सूटही मिळणार

मिरे ॲसेट लार्ज कॅप, एक लोकप्रिय फंड असला तरी जुलै २०२२ पासून फंडाची कामगिरी खालावलेली दिसत आहे. लार्ज कॅप फंड गटात ८० टक्के फंडांनी त्यांच्या मानदंडाच्या तुलनेत खराब कामगिरी केली. निर्देशांकाच्या तुलनेत बँकिंग आणि तंत्रज्ञान क्षेत्रात अधिक गुंतवणूक केल्याचा फटका या फंडाला बसला आहे. मागील दहा वर्षांत दुसऱ्यांदा या फंडाला ‘कर्त्यांच्या’ यादीतून या फंडाला वगळावे लागत आहे. प्रदीर्घ काळ कर्त्यांच्या यादीचा भाग असलेल्या कॅनरा रोबेको फ्लेक्झी कॅप फंडाची कामगिरी जुलै २०२२ पासून खालावलेली असली तरी एस ॲण्ड बीएसई ५००च्या ६ टक्के घसरणीच्या तुलनेत फंडाच्या एनएव्हीत ३.९ टक्केच घसरण झाली. तथापि फंडाच्या पोर्टफोलिओत दर्जेदार कंपन्यांचा समावेश असल्याने सर्वाधिक गुंतवणूक (एचडीएफसी बँक) असल्याने हा फंड मंदीचा अधिक चांगल्या प्रकारे सामना करू शकला. सर्वाधिक होल्डिंगसह स्टॉक असलेल्या फंडांनी बाजारातील घसरण चांगल्या प्रकारे सहन केली. हा फंडदेखील, घसरणीला सामोरे जाण्यात यशस्वी झाला. म्हणूनच तुलनेने खराब कामगिरी असूनही या फंडाला वगळण्यात आलेले नाही.

mutual funds 1

स्मॉल कॅप फंड गटात फ्रँकलीन इंडिया स्मॉलर कंपनीज फंडाचा पहिल्यांदा समावेश झाला आहे. नव्याने स्मॉल कॅपमध्ये गुंतवणूक करू इच्छिणारे गुंतवणूकदार या फंडात मर्यादित एकरकमी (पोर्टफोलिओ गुंतवणुकीच्या ५ टक्के) गुंतवणुकीचा विचार करू शकतात. वर्षभरापूर्वी या फंडांच्या यादीतील आणखी एक फंड ज्याने जुलै २०२२ पासून (समावेश झाल्यानंतर तीन महिन्यांनी) घसरण पाहिली तो म्हणजे महिंद्रा मॅन्युलाइफ मिड कॅप. हा फंड अजूनही रोलिंग वन ईयर रोलिंग रिटर्न परताव्याच्या आधारावर मानदंडापेक्षा खराब कामगिरी असूनदेखील मागील ३ महिन्यांतील परतावा लक्षणीयरीत्या सुधारला असल्याने या फंडाला वगळण्यात आलेले नाही. तरी या फंडाची कामगिरी डोळ्यात तेल घालून तपासली जाईल. सरलेल्या त्रैमासिक आढाव्यानंतर ३२ फंडांच्या यादीतील चार फंडांचा पहिल्यांदा समावेश झाला. याआधी यादीत असलेले मात्र वेळोवेळी वगळण्यात आलेले दोन फंडांचे पुरागमन झाले. तर तीन फंडांना वगळ्यात आले. म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी शुभेच्छा!

(shreeyachebaba@gmail.com)

Story img Loader