म्युच्युअल फंड अभ्यासक या नात्याने समभाग, रोखे आणि हायब्रीड म्युच्युअल फंडाच्या विविध फंड गटांतील निवडक तीन फंड निवडण्यासाठी विविध शैलींमध्ये आणि विविध फंड गटांतील हजारो फंडांच्या एका वर्षाच्या चलत परताव्यानुसार (वन ईयर रोलिंग रिटर्न) आणि जोखीम समायोजित परताव्याच्या कामगिरीनुसार तसेच गुणात्मक आणि संख्यात्मक निकषांच्या आधारे यादी बनवून फंडांची शिफारस केली जाते. आवश्यकतेनुसार निधी व्यवस्थापकांशी देखील चर्चा केली जाते. या यादीवर ९० टक्के संख्यात्मक आणि १० टक्के गुणात्मक निकषांचा प्रभाव आहे. फंड वगळण्याच्या पहिल्या टप्प्यात फंडांनी १, ५, आणि ७ वर्षे कालावधीत दिलेल्या परताव्याच्या आधारे फंड निश्चित केले जातात. या निवडलेल्या फंडांनी परतावा मिळविण्यासाठी उचललेली जोखीम (अस्थिरता) तपासून कमी जोखीम आणि जास्त परतावा देणारे फंड निवडले जातात. पुढच्या टप्प्यात गुणात्मक विश्लेषणाच्या आधारे अंतिम यादी निश्चित केली जाते. ऑक्टोबर डिसेंबर कालावधीतील कामगिरीच्या आधारे या त्रैमासिक आढाव्यात कोणतेही बदल झालेले नाहीत.

हेही वाचा – Money Mantra : बाजारातली माणसं : विपरीत फेरा…

true friend in volatile market conditions Multi-asset funds
अस्थिर बाजार परिस्थितीतील खरा मित्र – मल्टी ॲसेट फंड
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Axis Focused Fund performance
ॲक्सिस फोकस्ड फंडाची कामगिरी कशी?
A budget that makes you aware of your limitations
वित्त: मर्यादांची जाणीव करून देणारा अर्थसंकल्प
dsp mutual funds
फंडांचा फंडा: डीएसपी मिड कॅप फंड
TReDS, features , uses , TReDS news,
Money Mantra : TReDSची उपयुक्तता आणि वैशिष्ट्यं काय?
forest lands latest news in marathi
वनहक्क जमिनी दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्याने धनदांडग्यांच्या घशात
JNPA Workshop on Green Port Initiative
जेएनपीएची हरित बंदराकडे वाटचाल; बंदर परिसरातील प्रदूषण कमी करण्यासाठी विविध उपक्रम

मागील १० वर्षातील ४० तिमाहींचा अभ्यास केला असता गत कॅलेंडर वर्षातील शेवटची तिमाही सर्वाधिक वृद्धी नोंदविणारी दुसऱ्या क्रमांकाची तिमाही ठरली. आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाच्या वाढत्या किमती आणि इस्रायल-हमास संघर्षाकडे दुर्लक्ष करून, चार राज्यांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ता राखता येण्याचे लागलेले वेध या वाढीस कारण ठरले. सरलेल्या ऑक्टोबर-डिसेंबर या कालावधीत मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांची अनुक्रमे १२ आणि १४ टक्के घसरण झाली. बाजारातील व्यापक तेजीमुळे लार्जकॅप आणि लार्जकॅप केंद्रित फंड (फोकस्ड इक्विटी आणि लार्ज ॲण्ड मिडकॅप) यांच्या कामगिरीत मोठी सुधारणा झाली. दुसरीकडे, सरलेल्या तिमाहीत मिडकॅप आणि स्मॉलकॅप गटातील फंडांच्या परताव्यात घसरण झाली. ही घसरण जानेवारी मार्च तिमाहीत अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. लार्जकॅप, मिड आणि स्मॉलकॅप फंडातील परताव्याची दरी वाढत जाईल (लार्जकॅप अधिक सरस कामगिरी करतील). गुंतवणूकदारांनी मिडकॅप आणि स्मॉलकॅप फंडातून नफा काढून घ्यायला हवा. बाजारातील सध्याचा उन्माद फंडांच्या कामगिरीचे मूल्यमापन अधिक कठोरपणे करण्याचे संकेत देत आहे. विशेषतः निवडणुकीची घोषणा आणि प्रत्यक्ष निवडणुका होईपर्यंतच्या काळात बाजाराच्या अस्थिरतेत वाढ संभवते.

फंड गटमालमत्ता
(कोटी )
१ वर्षे ३ वर्षे  ५ वर्षे  १० वर्षे
लार्जकॅप 
निप्पॉन इंडिया लार्जकॅप  २०२१७.६४  ३२.७८ २३.१२१७.३४  १७.४३
एचडीएफसी टॉप १०० ३०२६१.७२ ३०.०८२०.७३ १६.२११५.७१
लार्ज ॲण्ड मिडकॅप
बंधन कोअर इक्विटी   ३४८३.९१ ४०.२१२४.४८१९.२२  १६.३५
एचडीएफसी लार्ज ॲण्ड मिडकॅप१५०२१.९४ ४०.२१ २७.०८ २०.८४ १५.१५

मल्टीकॅप
निप्पॉन इंडिया मल्टीकॅप  २४५९०.१७ ४०.०८३१.५६ १९.७११७.०८
आयसीआयसीआय पृ. मल्टीकॅप१०३४१.५४३८.२८  २३.०८  १८.१७ १७.६४

फ्लेक्झीकॅप
पराग पारीख फ्लेक्झीकॅप     ५२००७.०२ ३६.७४   २२.२१             २२.९६             १९.७५
फ्रँकलीन इंडिया फ्लेझीकॅप १३७९१.५२३३.३४             २२.१४१८.७१             १७.७२

हेही वाचा – Money Mantra : केतन पारेख घोटाळा (भाग १)

मिडकॅप
निप्पॉन इंडिया ग्रोथ २३४९३.६५    ४९.४३             २९.९८             २४.८३             २०.९४
फ्रँकलीन इंडिया प्रायमा  ९८६७.५५    ३९.७४             २१.५३             १८.१३             १९.९१

स्मॉलकॅप
निप्पॉन इंडिया स्मॉलकॅप ४३८१५.६१   ५१.३५३९.६८             २९.०१             
फ्रँकलीन इंडिया स्मॉलर कंपनीज११३९७.८३    ५६.८७             ३४.५१             २३.०२             २२.९६

ईएलएसएस
बँक ऑफ इंडिया ईएलएसएस १०४०.०१३७.९५२२.९७             २३.९७             १८.६०
एसबीआय लॉंगटर्म इक्विटी१८७१४.५८    ४३.२८             २४.४०             १९.९०             १६.९८

व्हॅल्यू
निप्पॉन इंडिया व्हॅल्यू६७८५.७४ ४३.०५             २६.२७             १६.५६             १९.२७
बंधन स्टर्लिंग व्हॅल्यू  ७७७३.७७  ३४.९६             ३०.१५             २०.७९             १९.४६

फोकस्ड इक्विटी
बंधन फोकस्ड इक्विटी  १४८७.९२    ३४.५३             १४.३२             १५.६५             १५.२२
निप्पॉन इंडिया फोकस्ड   ७८१८.४२    २७.२२             २०.६२             १८.३४             १९.२७

*१९ जानेवारी २०२३ च्या रेग्युलर ग्रोथ एनएव्हीनुसार

Story img Loader