म्युच्युअल फंड अभ्यासक या नात्याने समभाग, रोखे आणि हायब्रीड म्युच्युअल फंडाच्या विविध फंड गटांतील निवडक तीन फंड निवडण्यासाठी विविध शैलींमध्ये आणि विविध फंड गटांतील हजारो फंडांच्या एका वर्षाच्या चलत परताव्यानुसार (वन ईयर रोलिंग रिटर्न) आणि जोखीम समायोजित परताव्याच्या कामगिरीनुसार तसेच गुणात्मक आणि संख्यात्मक निकषांच्या आधारे यादी बनवून फंडांची शिफारस केली जाते. आवश्यकतेनुसार निधी व्यवस्थापकांशी देखील चर्चा केली जाते. या यादीवर ९० टक्के संख्यात्मक आणि १० टक्के गुणात्मक निकषांचा प्रभाव आहे. फंड वगळण्याच्या पहिल्या टप्प्यात फंडांनी १, ५, आणि ७ वर्षे कालावधीत दिलेल्या परताव्याच्या आधारे फंड निश्चित केले जातात. या निवडलेल्या फंडांनी परतावा मिळविण्यासाठी उचललेली जोखीम (अस्थिरता) तपासून कमी जोखीम आणि जास्त परतावा देणारे फंड निवडले जातात. पुढच्या टप्प्यात गुणात्मक विश्लेषणाच्या आधारे अंतिम यादी निश्चित केली जाते. ऑक्टोबर डिसेंबर कालावधीतील कामगिरीच्या आधारे या त्रैमासिक आढाव्यात कोणतेही बदल झालेले नाहीत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा