वसंत माधव कुळकर्णी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
म्युच्युअल फंड विश्लेषक फंडाच्या गुंतवणुकीच्या गुणवत्तेबद्दल खात्री पटल्यानंतर रेटिंग अर्थात मानांकनाचे पुनरावलोकन केले जाते. मॉर्निंगस्टारच्या फेब्रुवारी २०२४ च्या अहवालात, एडलवाइस मिडकॅप फंडाच्या ‘डिरेक्ट प्लान’ला ‘गोल्ड’ तर ‘रेग्युलर प्लान’ला ‘सिल्व्हर’ हे रेटिंग बहाल केले आहे. मागील सोमवारी फ्रँकलिन इंडिया प्रायमा या मिडकॅप फंडाबद्दल जाणून घेतल्यानंतर अशाच एका आश्वासक मिडकॅप फंडाची आज ओळख करून घेऊ.
एडलवाइज मिडकॅप फंडाला मॉर्निंगस्टारने ‘सिल्व्हर’ मानांकन दिले. स्टार रेटिंग हे गत कामगिरीवर असते तर ‘ॲनॅलिस्ट रेटिंग’ हे भविष्यातील कामगिरीचा अंदाज असतो. ‘ॲनॅलिस्ट रेटिंग’ ही मॉर्निंगस्टारची भविष्यवेधी विश्लेषक-चालित मानांकन प्रणाली आहे. या प्रणालीअंतर्गत फंडांचे ‘गोल्ड’, ‘सिल्व्हर’, ‘ब्रांझ’, तटस्थ (न्युट्रल) आणि नकारात्मक (निगेटीव्ह) असे फंडांचे वर्गीकरण केले जाते.
‘ॲनॅलिस्ट रेटिंग’मधील अग्रगण्य घटक म्हणजे त्या फंड घराण्याची दीर्घकालीन जोखीम-समायोजित कामगिरी. एडलवाइज फंड घराण्याने गुंतवणुकीसाठी FAIR तत्त्वज्ञान विकसित केले आहे. ‘F’ म्हणजे फॉरेन्सिक ऑडिट, ‘A’ म्हणजे ॲक्सेटेबल प्राईस, ‘I’ म्हणजे ESG आणि ‘R’ रोबस्टनेस. फॉरेन्सिक ऑडिट- जेव्हा आपण बाजारात गुंतवणूक करतो तेव्हा त्या गुंतवणुकीशी संबंधित सर्व जोखीम काय आहेत हे आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. गुंतवणूकीतील हा धोका समजून घेण्यासाठी कंपनीची व्यवस्थापन गुणवत्ता, कंपनीचा पूर्वीचा इतिहास, फसवणुक आणि वृद्धीदराबाबत बांधलेले अंदाज चुकण्याची शक्यता यांचा सखोल अभ्यास महत्त्वाचा आहे. तसेच विश्लेषणापश्चात कंपनीचा ताळेबंद, कॉर्पोरेट गव्हर्नन्स याचे विश्लेषण करण्याची पद्धत विकसित केली आहे. साहजिकच या फंड घराण्याला १० वर्षाच्या कामगिरीवर मॉर्निंगस्टार ३.५ तारांकित हे मानांकन निश्चित केले आहे. एडलवाइजचे पाच वर्षांचे जोखीम-समायोजित गुणोत्तर ८२ टक्के असून संबंधित फंड गटातील स्पर्धक फंडांपेक्षा अधिक सरस आहे. प्रभावी जोखीम-समायोजित गुणोत्तर असे सूचित करते की, फंड गुंतवणूकदारांसाठी चांगली कामगिरी करत असून आणि या फंडाला उज्वल भविष्यकाळ आहे. त्याचा गुंतवणूकदारांना फायदा होऊ शकतो. उत्कृष्ट जोखीम-समायोजित परताव्यासोबत निर्देशांकाच्या सापेक्ष फंडाची पाच वर्षाची कामगिरी चांगली असल्याचे दिसून आले आहे. निधी व्यवस्थापकांनी गुंतवणुकीतील जोखमीचे व्यवस्थापन कौशल्याने केल्याचे दिसते.
हेही वाचा >>>Money Mantra: टीडीएस कुणी कापावा? कुणी कापू नये? त्याचा परतावा कसा मिळवाल?
फंड घराण्याची ही रणनीती मिड-कॅप फंड गटात स्पर्धक फंडांच्या तुलनेत यशस्वी ठरली आहे. गुंतवणुकीवर प्रभाव पाडणाऱ्या अन्य बाबींचे घटकांचे विश्लेषण करताना, गेल्या पाच वर्षांमध्ये एडलवाइज मिडकॅप फंडाच्या रणनीतीमध्ये सातत्याने उच्च वृद्धीदर असलेल्या कंपन्यांनी त्यांची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्याचे दिसते. एडलवाइज म्युच्युअल फंडाचे मुख्य गुंतवणूक अधिकारी (समभाग) त्रिदीप भट्टाचार्य, हे सप्टेंबर २०२१ मध्ये एडलवाइज म्युच्युअल फंडात ॲक्सिस म्युच्युअल फंडातून दाखल झाले. १ ऑक्टोबर २०२१ रोजी त्यांची मिडकॅप फंडाचे निधी व्यवस्थापक म्हणून नेमणूक झाली. ते मागील ३१ महिने फंडाच्या निधी व्यवस्थापनाची धुरा यशस्वीपणे सांभाळत आहेत. मागील सहा तिमाहीत फंडाने अव्वल प्रदर्शन केले आहे. व्यवस्थापकांनी अलीकडील तिमाहीत मिडकॅप गटातील अन्य फंडाच्या तुलनेत निर्देशांकात कमी प्रभाव असलेल्या (इंडेक्स वेट) परंतु सरासरीपेक्षा अधिक वृद्धीदर असलेल्या कंपन्यांचा समावेश केला आहे. कंपन्यांच्या उत्पन्नात (अर्निंग) वाढ नोंदविलेल्या कंपन्यांची मात्रा वाढविल्याने अलीकडे त्यांनी ‘ग्रोथ स्टॉक्स’चा पोर्टफोलिओत समावेश करून अतिरिक्त जोखीम स्वीकारत परतावा मिळविल्याचे दिसते. अलीकडे त्यांनी तंत्रज्ञान कंपन्यांतील गुंतवणुकीत मोठी वाढ केली असून वित्तीय सेवाक्षेत्रातील गुंतवणूक कमी केली आहे. निर्देशांकाच्या तुलनेत दळणवळण सेवा आणि ऊर्जा क्षेत्रात कमी गुंतवणूक आहे. फंडाच्या पोर्टफोलिओमध्ये ६७ कंपन्या असून आघाडीच्या १० कंपन्यांमध्ये ३२ टक्के गुंतवणूक आहे. अलीकडे फंडाने इंडियन हॉटेल्स, अशोक लेलँड, भारत फोर्ज, कमिन्स इंडिया, बालकृष्ण इंडस्ट्रीज, जेबी केमिकल्स, व्होल्टास या कंपन्यांना गुंतवणुकीतून वगळले आहे. फंडाचा पोर्टफोलिओ टर्नओव्हर रेशो ४३ टक्के असून अन्य मिडकॅप फंड गटाच्या तुलनेत सरासरीपेक्षा कमी आहे.
हेही वाचा >>>Money Mantra : महिला दिनानिमित्त गुंतवणुकीचा ‘वूमन्स प्लॅन’
एडलवाइज मिडकॅप फंड पोर्टफोलिओचे फार मंथन (पोर्टफ़ोलिओ चर्नींग) करत नाही. या फंडाचा समावेश कमी पोर्टफोलिओ टर्नओव्हर असलेल्या फंडात होतो. एडलवाइज मिडकॅप फंडाची पोर्टफोलिओ रोकड सुलभता वाजवी आहे. संपूर्ण पोर्टफोलिओ खाली करण्यासाठी सरासरी वेळ ३० दिवसांपेक्षा कमी आहे.
निधी व्यवस्थापक ‘बाय ॲण्ड होल्ड’ रणनीतीचे अनुसरण करतात. दीर्घकालीन पोर्टफोलिओसाठी ही रणनीती हा एक चांगला पर्याय आहे.
फंडाच्या रणनीती आणि कामगिरीच्या तपशिलांची ओळख करून घेतल्या नंतर हे जाणून घेणे उचित ठरेल की, एडलवाइज मिडकॅप फंड केवळ उच्च जोखीम घेणाऱ्यांसाठी आहे. परंपरा पाळणाऱ्या पुराणमतवादी गुंतवणूकदारांनी फ्रँकलिन प्राइमासारख्या कमी अस्थिर पर्यायांचा विचार करावा किंवा लार्ज ॲण्ड मिडकॅप फंडांची निवड करू शकतात. एडलवाइज मिडकॅप फंड हा किमान ५ ते ७ वर्षे किंवा त्याहून अधिक काळ असलेल्या गुंतवणुकीसाठी असून या फंडात केवळ एसआयपी पद्धतीने गुंतवणूक करण्याची शिफारस आहे. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये या फंडाला अस्थिरतेमुळे ३० टक्यांपेक्षा अधिक स्थान देऊ नये. या फंडाच्या प्रत्येक कालावधीतील फंड परतावा फंड गटाच्या सरासरीसापेक्ष अधिक असल्याचे कारण स्मॉल-कॅपच्या सरासरीपेक्षा अधिक प्रमाण हे आहे. गेल्या कॅलेंडर वर्षात फ्रँकलिन इंडिया प्राइमा, एचडीएफसी मिड-कॅप अपॉर्च्युनिटीज, डीएसपी मिडकॅप आणि ॲक्सिस मिडकॅपसारख्या फंडांची स्मॉल-कॅप गुंतवणूक ३ ते १४ टक्क्यांदरम्यान असताना एडलवाइज मिड-कॅप फंडाची स्मॉलकॅपमधील गुंतवणूक २० टक्क्यांपर्यंत वाढविली होती. जानेवारी २०२४ मध्ये फंडाच्या गुंतवणुकीत २२ टक्के कंपन्या १५,००० कोटीपेक्षा कमी बाजारभांडवल असलेल्या होत्या. साहजिकच फंडाची अस्थिरता अधिक आहे. परंतु अस्थिरता व्यवस्थित व्यवस्थापित केल्याने फंडाच्या ‘सिल्व्हर रेटिंग’वर दुसऱ्यांदा शिक्कामोर्तब केले. डाउनसाइड कॅप्चर रेशोचा विचार केल्यास एडलवाइज मिडकॅप फंड मागील पाच वर्षांत बाजार घसरणीच्या काळात ‘निफ्टी मिडकॅप १५० टीआरआय’ सापेक्ष खूपच कमी मुद्दल गमावले आहे. एडलवाइज मिडकॅप फंडात डाउनसाइड्स आणि अपसाइड्सचा योग्य दुर्मीळ समतोल साधलेला दिसतो. मॉर्निंगस्टारच्या या आश्वासक रेटिंग पुनर्निश्चितीनंतर या फंडाच्या रूपाने गुंतवणूकदारांना दीर्घकालीन एसआयपी पर्याय उपलब्ध झाल्याचे दिसत आहे.
shreeyachebaba@gmail.com