एनआरबी बेअरिंग्स लिमिटेड (बीएसई कोड: ५३०३६७)

वेबसाइट: http://www.nrbbearings.com/
प्रवर्तक: श्रीमती. हर्षबीना झवेरी

Market study of year 2024
बाजार रंग : सरत्या वर्षाचा बाजार अभ्यास
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Dhananjay munde
Dhananjay Munde : खातेवाटप जाहीर झाल्यानंतर धनंजय मुंडे यांची पोस्ट चर्चेत; म्हणाले,”मी…”
Gen Beta
Gen Beta (2025-2039):आजपासून दहा दिवसांनी होणार ‘Gen Beta’ चा जन्म; पिढ्यांचे वर्गीकरण कोणी आणि का केले?
Girish Mahajan Radhakrishna Vikhe-Patil Dhananjay Munde Dada Bhuse have less important cabinet post
ज्येष्ठ मंत्र्यांना धक्का! महाजन, विखे-पाटील, मुंडे यांचे पंख छाटले
pickup truck pakistan
पाकिस्तानमध्ये ब्रँडेड कार नव्हे तर पिकअप ट्रक चर्चेत; राजकारण्यांपासून उद्योगपतींपर्यंत वाढली मागणी, कारण काय?
Image of Ajit Pawar
Ajit Pawar : “अरे गप्प बसा ना बाबा”, खाते वाटपाबाबत प्रश्न विचारताच अजित पवार संतापले
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

बाजारभाव: रु. २८२/-

प्रमुख उत्पादन/ व्यवसाय : बेअरिंग्स

भरणा झालेले भाग भांडवल: रु. १९.३८ कोटी
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक ५१.१६

परदेशी गुंतवणूकदार १३.७४
बँक्स्/ म्युच्युअल फंड्स/ सरकार १७.०८

इतर/ जनता १८.०२
पुस्तकी मूल्य: रु. ९६.१

दर्शनी मूल्य: रु. २/-
गतवर्षीचा लाभांश: २०५%

प्रति समभाग उत्पन्न: रु. ११.३
किंमत उत्पन्न गुणोत्तर: २५.७

समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: ३०.५
डेट इक्विटी गुणोत्तर: ०.१६

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर: १०
रिटर्न ऑन कॅपिटल एम्पॉईड (ROCE): १४.६%

बीटा : ०.८

बाजार भांडवल: रु. २८३० कोटी (स्मॉल कॅप)

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: ४०१ / २४३

गुंतवणूक कालावधी : ३६ महिने

साठ वर्षांपूर्वी म्हणजे १९६५ मध्ये स्थापन झालेली, एनआरबी बेअरिंग्स ही भारतातील नीडल रोलर बेअरिंग्ज तयार करणारी पहिली कंपनी होती. गेल्या ४० वर्षांहून अधिक काळ एनआरबीने बेअरिंग तंत्रज्ञानात आघाडी घेतली आहे. ही कंपनी आज नीडल रोलर बेअरिंग्ज, पारंपरिक दंडगोलाकार रोलर बेअरिंगमध्ये एक अग्रणी म्हणून मान्यताप्राप्त असून भारतीय रस्त्यांवरील ९० टक्क्यांपेक्षा जास्त वाहने एनआरबीच्या बेअरिंग्जवर चालतात. कंपनीच्या स्थापनेपासून, एनआरबीने केवळ ऑटोमोटिव्ह क्षेत्रातच नव्हे तर सर्व मोबिलिटी ॲप्लिकेशन्समध्ये हाय प्रिसिशन फ्रिक्शन सोल्यूशन्सची विस्तृत श्रेणी प्रस्तुत केली असून, बेअरिंग्सखेरीज इतर उत्पादनातही वाढ केली आहे. कंपनी ऑटोमोटिव्ह क्षेत्रात तसेच सर्व मोबिलिटी ॲप्लिकेशन्समध्ये बॉल आणि रोलर बेअरिंग्जच्या निर्मितीच्या व्यवसायात आघाडीवर असून कंपनीचा बाजार हिस्सा ५० टक्क्यांहून अधिक आहे.

आणखी वाचा-मार्ग सुबत्तेचा : कर वाचवणारी गुंतवणूक किती उपयुक्त?

कंपनीची उत्पादने टू व्हीलर्स, व्यावसायिक वाहने, प्रवासी कार, उपयुक्तता वाहने, शेती उपकरणे आणि ट्रॅक्टर, महामार्गावरील वाहने, रेल्वे इत्यादीमध्ये वापरली जातात. कंपनीचे सहा उत्पादन प्रकल्प असून त्यापैकी चार महाराष्ट्रात तर दोन उत्तराखंडमध्ये आहेत. त्यात झारखंडमधील रांची आणि थायलंडमधील रेयॉन्ग येथेही उपकंपन्यांमार्फत सुविधा आहेत. कंपनीचे महाराष्ट्रातील तुर्भे येथे उत्पादन अभियांत्रिकी केंद्र आणि वाळूज येथे प्रक्रिया आणि प्रगत साहित्य अभियांत्रिकी केंद्र आहे. कंपनीचे तांत्रिक कौशल्य तीन हजारहून अधिक डिझाइन्सच्या पोर्टफोलिओसह, संकल्पना, सिम्युलेशन, चाचणी, प्रमाणीकरण आणि उत्पादनासह बेअरिंग डिझाइनच्या सर्व पैलूंचा समावेश आहे. एनआरबी एकूण उत्पन्नाच्या सुमारे २ टक्के रक्कम संशोधन व विकासावर खर्च करते.

सप्टेंबर २०२४ अखेर संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीने ३०२ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ३५.२६ कोटी रूपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत तो ४७ टक्क्यांनी अधिक आहे. कंपनीच्या एकूण उलाढालीपैकी सुमारे २०-२५ टक्के उत्पन्न निर्यातीतून येते. गेल्या वर्षी कंपनीने आपली ठाण्यातील जमीन आणि इमारत विकून आलेल्या रकमेतून कर्जभार कमी केला आहे. इलेक्ट्रिक हायब्रिड उत्पादने करण्यासाठी कंपनी आपल्या उत्पादन पोर्टफोलिओचा विस्तार करत आहे. आगामी कालावधीत कंपनीच्या उत्पादन आणि विक्रीत लक्षणीय वाढ अपेक्षित आहे. सध्या २८० रुपयांना उपलब्ध असलेला हा शेअर गुंतवणूकयोग्य वाटतो.

आणखी वाचा-बाजारातील माणसं – पैशाची गुलामी झुगारणारा गुंतवणूकपंथ : वाहेई टाकाडा

सध्याची शेअर बाजारातील अनिश्चितता पाहता सुचवलेले समभाग कमी बाजार भावात मिळू शकतात, त्यामुळे प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.

अजय वाळिंबे

stocksandwealth@gmail.com

  • प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या १ टक्क्यापेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.
  • हा गुंतवणूक सल्ला नाही
  • लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

Story img Loader