अजॅक्स इंजिनीअरिंग लिमिटेड (बीएसई कोड ५४४३५६)

प्रवर्तक: कृष्णस्वामी विजय

वेबसाइट: www.ajax-engg.com

बाजारभाव: रु. ५९०/-

प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: इंजिनीअरिंग/ काँक्रीट मिक्सर

भरणा झालेले भागभांडवल: रु. ११.४४ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)प्रवर्तक ८०.००

परदेशी गुंतवणूकदार ५.०२

बँक/ म्युच्युअल फंड/ सरकार ६.१३

इतर/ जनता ८.८५

पुस्तकी मूल्य: रु. १५०

दर्शनी मूल्य: रु.१/-

लाभांश:— %

प्रति समभाग उत्पन्न: रु. १९.६८

किंमत उत्पन्न गुणोत्तर: ३०

समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: ३१.५

डेट इक्विटी गुणोत्तर: ००

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर: १५०

रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लोईड (आरओसीई): ३६.९%

बीटा : ०.४५

बाजार भांडवल: रु. ६,७३१ कोटी (स्मॉल कॅप)

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: ६२९/५६६

गुंतवणूक कालावधी: २४ महिने

जुलै १९९२ मध्ये स्थापन झालेली, अजॅक्स इंजिनीअरिंग लिमिटेड विस्तृत श्रेणीतील काँक्रीट उपकरणांची निर्मिती करते, तसेच मूल्यवर्धित सेवा पुरवते. कंपनी भारतातील आघाडीची काँक्रीट उपकरणे उत्पादक असून, तिची सुमारे ११० हून अधिक उपकरणे आहेत. गेल्या १० वर्षांत अजॅक्स इंजिनीअरिंगने भारतात २७,८०० हून अधिक उत्पादने विकली आहेत. कंपनी मुख्यत्वे सेल्फ-लोडिंग काँक्रीट मिक्सरमध्ये बाजारपेठेतील आघाडीची कंपनी आहे. गेल्या आर्थिक वर्षांत कंपनीचा भारतातील बाजारपेठेत ७५ टक्के बाजारहिस्सा आहे.

प्रमुख उत्पादने आणि त्यांचा वापर :

कंपनी पुढील पिढीतील ३६० अंशातील काँक्रीटिंग सेवा प्रदाता म्हणून उदयास आली आहे, जी उत्पादनांची संपूर्ण श्रेणी देते ज्यामध्ये सेल्फ-लोडिंग काँक्रीट मिक्सर, काँक्रीट बॅचिंग प्रकल्प, ट्रान्झिट मिक्सर, स्टेशनरी पंप, बूम पंप, सेल्फ-प्रोपेल्ड बूम पंप आणि स्लीप-फॉर्म पेव्हर यांचा समावेश आहे. जे उत्पादन, वाहतूक, प्लेसमेंट आणि पेव्हमेंटचा समावेश असलेले एंड-टू-एंड सोल्यूशन्स देतात. कंपनीचे मुख्यालय बंगळूरु येथे आहे आणि बंगळूरुच्या बाहेरील भागात दोड्डाबल्लापूर आणि गौरीबिदानूर येथे अत्याधुनिक उत्पादन सुविधा आहेत.

विक्रीपश्चात सेवा:

कंपनी तिच्या वितरक आणि आपल्या सेवा कर्मचाऱ्यांद्वारे सुटे भाग आणि देखभाल सेवा प्रदान करते, तिच्या समकक्षांमध्ये सर्वात मोठे डीलर आणि सेवा जाळे उभारले आहे. देशभरात कंपनीची २०,००० हून अधिक उपकरणे समाधानकारकपणे काम करत आहेत आणि विविध अनुप्रयोगांमध्ये त्यांचा व्यवसाय क्षेत्रातील विस्तृत अनुभव आहे. सीसी रोडवेज – राष्ट्रीय/राज्य महामार्ग, ड्राइव्ह वे, रस्ते/रेल्वे-ओव्हर ब्रिज, सिंचन कालवे/धरण, बोगदे/भूमिगत मार्ग, रेल्वे, विमानतळ पायाभूत सुविधा, वीज ट्रान्समिशन प्रकल्प, इमारती आणि कारखाने, औद्योगिक पायाभूत सुविधा, नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प – पवन/सौर वीज पार्क, शहरी पायाभूत सुविधाविकास – स्कायवॉक, मेट्रो रेल/फ्लाय-ओव्हर इ.

कंपनीचे वितरक नेपाळ आणि भूतानसह देशभर पसरलेले आहे, अजॅक्सचा देशभरात तीसहून अधिक वितरकांसह विस्तृत भौगोलिक विस्तार आहे आणि १०० हून अधिक टच पॉइंट्स त्यांच्या ग्राहकांना विक्री आणि विक्रीनंतरच्या समर्थनाची सेवा देतात. कंपनीने आंतरराष्ट्रीय व्यवसायाच्या क्षेत्रात प्रवेश केला असून बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार, मोझांबिक, फिलीपिन्स, केनिया, ट्युनिशिया, संयुक्त अरब अमिराती (यूएई), व्हिएतनाम, कंबोडिया, ओमान, युगांडा आणि इजिप्तमध्ये त्यांच्या वितरण सेवांचा विस्तार केला आहे.

कंपनीची भारतात २३ राज्यांमध्ये मजबूत उपस्थिती आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर, ती ४० देशांमध्ये कार्यरत आहे, दक्षिण आणि आग्नेय आशिया, मध्य पूर्व आणि आफ्रिका यासह २५ राष्ट्रांना निर्यात करते. कंपनीच्या महसुलात सेल्फ-लोडिंग काँक्रीट मिक्सरचा सर्वात मोठा म्हणजे सुमारे ८५ टक्के वाटा आहे.

कंपनीने डिसेंबर २०२४ अखेर सरलेल्या तिमाहीत उलाढालीत ३७ टक्के वाढ साध्य करून ती ५४८ कोटी रुपयांवर नेली आहे तर नक्त नफ्यात २६.३ टक्के वाढ झाली आहे. तो आता ६८ कोटींवर पोहोचला आहे. तर नऊ महिन्यांच्या कालावधीत कंपनीने १,३१८ कोटी रुपयांच्या उलाढालीवर १६९ कोटींचा नक्त नफा कमवला आहे. गेल्या वर्षीच्या नऊमाहीच्या तुलनेत तो २६.३ टक्क्यांनी अधिक आहे. कंपनीने गेल्याच महिन्यात प्रारंभिक समभाग विक्रीच्या माध्यमातून (आयपीओ) प्रति समभाग ६२८ रुपयाने विक्री करून १,२६९ कोटी रुपये उभारले होते. प्रवर्तकांनी त्यांच्याकडील समभाग विक्रीकरून निधी उभारणी केली आहे. सध्या अजॅक्स इंजिनीअरिंगचा शेअर आयपीओपेक्षा कमी किमतीत, ५९० रुपयांच्या आसपास उपलब्ध आहे.

शेअर बाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सुचविलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्या टप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.

stocksandwealth@gmail.com

हा लेख एक अभ्यासपूर्ण विवेचन असून गुंतवणूक सल्ला नव्हेप्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.