सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भागभांडवलाच्या एक टक्क्यापेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या माहितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी. ३. वरील लेख केवळ विश्लेषणात्मक संशोधन असून तो गुंतवणूक सल्ला नाही.
वर्ष १९९२ मध्ये स्थापन झालेली डॅनलॉ टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड (डीटीआयएल) ही अभियांत्रकिी, सॉफ्टवेअर निर्माती कंपनी असून सल्लागार सेवा आणि औद्याोगिक इलेक्ट्रॉनिक्स व्यवसायात कार्यरत आहे. डीटीआयएल ही मुख्यत्वे ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक्ससाठी प्रसिद्ध असून वाहन क्षेत्रातील तंत्रज्ञानाची प्रमाणित विकासक आहे. डीटीआयएल आज जगातील सर्वात मोठ्या वाहन निर्मात्यांसाठी नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान तयार करत असून जगातील ‘कार कनेक्टेड गॅझेट्स’च्या सर्वात मोठ्या पुरवठादारांपैकी एक आहे.
प्रमुख उत्पादने
१. टेलिमॅटिक्स उत्पादने:
टेलिमॅटिक्स कंट्रोल युनिट (टीसीयू) – २जी हे ‘आयपी६७ इनग्रेस’ सरंक्षित यंत्र आहे, जे ईएमएस आणि एबीएससारख्या वाहनांमधील वेगवेगळ्या ‘ईसीयू’मधून कॅन डेटा (ओबीडी) गोळा करते. टेलिमॅटिक्स कंट्रोल युनिट (टीसीयू) – ४जी हे एआयएस-१४० प्रमाणित ४जी ट्रॅकिंग डिव्हाइस आहे. हा एक उच्च दर्जाचा ‘कॉम्पॅक्ट व्हेईकल ट्रॅकिंग/फ्लीट मॅनेजमेंट ब्लॅक बॉक्स’ आहे, ज्यामध्ये मजबूत आयपी६७ केसिंग आहे.
२. डेटा लॉगर: हे एक आयओटी गॅझेट आहे, जे सेल्युलर किंवा ‘ब्लूटूथ कनेक्शन’द्वारे वाहन आणि सेन्सर डेटा सुरक्षितपणे ग्राहकांना हव्या असलेल्या मंचावर आणून प्रसारित करते.
३. बॉडी कंट्रोल उत्पादने:
वाहनाच्या सुट्या भागातील विविध इलेक्ट्रॉनिक अॅक्सेसरीजचे निरीक्षण आणि नियंत्रण
४. चाचणी उत्पादने:
डायग्नोस्टिक टूल हे एक प्रगत पीसी अॅप्लिकेशन असून यूएसबी इंटरफेसद्वारे डायग्नोस्टिक आणि फ्लॅशिंगसाठी वापरले जाते.
कंपनीच्या एकूण महसुलापैकी सुमारे ९३ टक्के महसूल उत्पादन विक्रीतून असून सुमारे ७ टक्के महसूल सेवा पुरवण्याचा आहे. कंपनीचे डिसेंबर २०२४ साठी संपलेल्या तिमाहीचे निकाल जाहीर झाले असून या काळात कंपनीने ५५ कोटी रुपयांच्या उलाढालीवर (गेल्या वर्षी याच काळात ५३ कोटी) ४.४१ कोटी रुपयांचा नक्त नफा कामावला आहे. गेल्या वर्षीच्या याच काळातल्या नफ्यापेक्षा तो २७ टक्क्यांनी कमी आहे. मात्र आगामी काळात कंपनीकडून भरीव कामगिरीची अपेक्षा आहे. कनेक्टेड कार आणि ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक्समध्ये कंपनी जागतिक आघाडीवर असून कंपनीकडे ८०० कुशल कर्मचारी आणि तंत्रज्ञ आहेत. २० वर्षांपूर्वी डॅनलॉ समूहाला उच्च-कौशल्य वातावरणात जागतिक बाजारपेठेत स्थान निर्माण करण्यासाठी ऑफशोअर तंत्रज्ञान आणि उत्पादन विकास केंद्र म्हणून डॅनलॉ इंडियाची सुरुवात करण्यात आली होती. जगात वेगाने बदलणाऱ्या उद्याोगांच्या गरजांच्या पुढे राहण्यासाठी कंपनी संशोधनावर जास्त भर देते. डॅनलॉ ग्राऊंड ब्रेकिंग तंत्रज्ञान, कार्यक्षम विकास आणि डायनॅमिक वातावरणासाठी अनुकूल उपायांसाठी ओळखली जाते.
डॅनलॉं टेक्नॉलॉजीज इंडिया लि. (बीएसई कोड ५३२३२९)
संक्षिप्त विवरण
● शेअर गट : मायक्रो कॅप
● प्रवर्तक : डॅनलॉं सिस्टम्स इंडिया/ डॅनलॉं इंक
● व्यवसाय : इंडस्ट्रयिल इलेक्ट्रॉनिक्स
● पुस्तकी मूल्य : रु. १३५
● दर्शनी मूल्य : रु. १०/
● गतवर्षीचा लाभांश :
शुक्रवारचा बंद भाव : रु. १०४५/
वर्षभरातील उच्चांक/ नीचांक : रु. २२५९/९५०
बाजार भांडवल : रु. ५०० कोटी
शेअरबाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सुचवलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.
Stocksandwealth@gmail. com