जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड (बीएसई कोड: ५४३९४०)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
वेबसाइट: http://www.jfs.in
प्रवर्तक: रिलायन्स समूह
बाजारभाव: रु. २४२ /-
प्रमुख उत्पादन/ व्यवसाय : बॅंकेतर वित्तीय कंपनी (एनबीएफसी)
भरणा झालेले भाग भांडवल: रु. ६३५३.२८ कोटी
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक ४७.१२
परदेशी गुंतवणूकदार १५.६२
बँक/ म्युच्युअल फंड/ सरकार १२.६३
इतर/ जनता २४.६३
पुस्तकी मूल्य: रु. २१६
दर्शनी मूल्य: रु. १०/-
गतवर्षीचा लाभांश: ००
प्रति समभाग उत्पन्न: रु. २.५३
किंमत उत्पन्न गुणोत्तर: ९६.६
समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: २१.३
डेट इक्विटी गुणोत्तर: ००
रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड (आरओसीई): १.५५ %
बीटा : १.१
बाजार भांडवल: रु. १५५१८५ कोटी (लार्ज कॅप)
वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: ३९५/२३७
गुंतवणूक कालावधी : ३६-४८ महिने
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड म्हणजे २५ वर्षांपूर्वी स्थापन झालेली ‘रिलायन्स स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड’. जुलै २३ मध्ये जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडची (जेएफएसएल) स्थापना झाली. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा वित्तीय सेवा व्यवसाय ‘जेएफएसएल’मध्ये विलिन झाला. जुलै २४ मध्ये, कंपनीला रिझर्व्ह बँकेकडून एक ‘कोअर इन्व्हेस्टमेंट कंपनी – नॉन-डिपॉझिट टेकिंग – सिस्टिमॅटिकली इम्पॉर्टंट’ कंपनी बनण्यासाठी अंतिम मंजुरी मिळाली. रिलायन्स समूहाची ही कंपनी एक प्रमुख कंपनी असून तिच्या अनेक उपकंपन्या आहेत. यात जिओ फायनान्स लिमिटेड, जिओ इन्शुरन्स ब्रोकिंग लिमिटेड), आणि जिओ पेमेंट सोल्युशन्स लिमिटेड तसेच संयुक्त उपक्रमाद्वारे वित्तीय सेवा व्यवसाय चालवणारी जिओ पेमेंट बँक लिमिटेड यांचा समावेश होतो.
सेवा पोर्टफोलिओ
१) कर्ज देणे आणि लीज: कंपनी, जिओ फायनान्स लिमिटेड आणि जिओ लीजिंग सर्व्हिसेस लिमिटेडच्या माध्यमातून डिजिटल कर्ज देणे तसेच ‘ऑपरेटिंग लीज सोल्युशन्स’ प्रदान केले जाते. ‘जेएफएल’ प्रामुख्याने ग्राहक कर्ज, कॉर्पोरेट तसेच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग अर्थात ‘एमएसएमई’ कर्ज वितरण व्यवसाय करते, तसेच इतर वित्तपुरवठा, खेळते भांडवल, मुदत कर्जे, गृहकर्ज, मालमत्तेवरील कर्जे, म्युच्युअल फंडवरील कर्जे वितरणाचे कार्य करते. विद्यमान आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या ‘जेएफएल’च्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता (ॲसेट अंडर मॅनेजमेंट) १,२०६ कोटींवरून ४,१९९ कोटींवर पोहोचली आहे. ‘जेएफएल’ची सात शहरांमध्ये नऊ कार्यालये आहेत. ‘जेएलएसएल, डिव्हाइस-ॲज-अ-सर्व्हिस’ या आधुनिक प्रारूपाद्वारे ग्राहक आणि व्यवसायांना ‘ऑपरेटिंग लीज सोल्युशन्स’ सेवा देते. जहाज भाडेपट्टा व्यवसाय करण्यासाठी त्यांनी रिलायन्स स्ट्रॅटेजिक बिझनेस व्हेंचर्स लिमिटेडसह ५०:५० संयुक्त उपक्रम राबवला असून रिलायन्स इंटरनॅशनल लीजिंग लिमिटेडची स्थापनादेखील केली आहे. या संयुक्त उपक्रमाने आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या तिमाहीत जहाज भाडेपट्टा करण्याचे काम सुरू केले आहे.
२) जून २०२४ मध्ये कंपनीचे एअरफायबर उपकरणांचे भाडेपट्टे सुरू झाले आहे आणि लवकरच सोलर पॅनेल आणि आयटी उपकरणे भाडेपट्टे सुरू करण्याची योजना आहे.
३) कंपनी, जिओ पेमेंट सोल्युशन्स लिमिटेड आणि जिओ पेमेंट्स बँक लिमिटेडद्वारे ‘व्यवहार सोल्युशन्स’ ऑफर करते, ज्यामध्ये अकाउंट्स, डेबिट आणि क्रेडिट कार्ड आणि पेमेंट ॲग्रीगेटर्स आणि पेमेंट गेटवे मार्गांद्वारे पेमेंट सोल्युशन्स इ. सेवा समाविष्ट आहेत. जिओ पेमेंट्स बँक यूपीआय, ऑनलाइन बिल पे, मनी ट्रान्सफर आणि अकाउंट मॅनेजमेंटसारखी वैशिष्ट्यपूर्ण सेवा देते. त्यांनी बिझनेस करस्पॉन्डंट्स नेटवर्क ७३०० पर्यंत वाढवले असून १६,००० आउटलेट स्थापित करण्यासाठी मान्यता मिळाली आहे. कंपनीचे १.९ दशलक्षाहून अधिक ग्राहक आहेत.
४) जिओ इन्शुरन्स ब्रोकिंग लिमिटेडच्या माध्यमातून कंपनी जनरल, लाइफ, हेल्थ, ऑटो, होम आणि एक्सटेंडेड वॉरंटीसारख्या ग्राहकोपयोगी ५४ विमा योजनांची विस्तृत श्रेणी प्रदान करते. कंपनीने ३१ विमा कंपन्यांसोबत भागीदारी केली असून जिओ ॲपवर डिजिटल ऑटो आणि टू-व्हीलर विमा, दुकानदार विमासाठी मेट्रो कॅश अँड कॅरी इत्यादी नवीन उत्पादनेदेखील सादर केली आहेत.
५) गुंतवणूक: कंपनीच्या गुंतवणूक सेवांमध्ये स्पर्धात्मक व्याजदरांसह बचत आणि ठेव खाती असून कंपनी ब्लॅकरॉक इंक. सोबत संयुक्त उपक्रम राबवत आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये संपत्ती व्यवस्थापन सेवा देण्यासाठी जिओ ब्लॅकरॉक इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेडचा समावेश केला असून कंपनीने जिओ ब्लॅकरॉक ॲसेट मॅनेजमेंट कंपनी स्थापन केली आहे. भांडवली बाजार नियामक ‘सेबी’कडून लवकरच मान्यता अपेक्षित आहे.
कंपनीचे डिसेंबर २०२४ साठी तिसऱ्या तिमाहीचे तसेच नऊमाहीचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून ते गेल्या वर्षीच्या तुलनेत फारसा फरक दाखवत नाहीत. या नऊ महिन्यांच्या कालावधीत कंपनीने ६६५ कोटींच्या उत्पन्नावर ४५२ कोटींचा नफा कमावला आहे, तर तिमाहीच्या कालावधीत १३४ कोटी रुपयांच्या उत्पन्नावर ७१ कोटींचा नक्त नफा कमवला आहे. कंपनी कृत्रिम प्रज्ञा (एआय) सारख्या तंत्रज्ञानात गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे. वित्तीय क्षेत्रातील तांत्रिक प्रगतीसाठी फिनटेक स्टार्टअप्ससोबत भागीदारीदेखील शोधत आहे. कंपनीच्या इतरही वित्तीय सेवा लवकरच सुरू होण्याची श्क्यता आहे. उत्तम अनुभवी प्रवर्तक आणि कुठलाही कर्जभार नसलेली या मोठ्या वित्तीय कंपनीचा शेअर सध्या तिच्या नीचांकाच्या जवळपास आहे. एक दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून जिओ फायनान्सचा जरूर विचार करा.
सध्याची शेअरबाजारातील अनिश्चितता पाहता सुचवलेले समभाग कमी बाजारभावात मिळू शकतात, त्यामुळे प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.
अजय वाळिंबे
stocksandwealth@gmail.com
- प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्स मध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.
- हा गुंतवणूक सल्ला नाही
- लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.