मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड ही वर्ष १९८७ मध्ये मोतीलाल ओसवाल आणि रामदेव अगरवाल यांनी स्थापन केलेली एक वैविध्यपूर्ण वित्तीय सेवा कंपनी आहे. गेल्या ३७ वर्षांत कंपनीचे बाजारभांडवल ४८,००० हजार कोटी रुपयांवर गेले आहे, तर कंपनीच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता (एयूएम) १८,४०९ कोटींवरून तब्बल ५ लाख कोटींवर पोहोचली आहे. कंपनीचे जाळे देशभरात पसरलेले असून यात सहाशेहून अधिक शहरे आहेत ज्यात २,५०० हून अधिक व्यवसाय स्थाने आहेत. आज कंपनीचे सर्व व्यवसायातील मिळून सुमारे ७२ हजारांहून अधिक ग्राहक आहेत.

कंपनीचा वित्तीय व्यवसाय मुख्यत्वे पुढील पाच क्षेत्रांत विस्तारला आहे.

milind kale appointed as chairman of the board of management of cosmos bank
कॉसमॉस बँकेच्या व्यवस्थापन मंडळाच्या अध्यक्षपदी मिलिंद काळे
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
PepsiCo Eyes Stake in Haldiram Snacks
हल्दीराममधील हिस्सा खरेदीसाठी ‘बहुराष्ट्रीय’ चढाओढ; पेप्सिको, टेमासेक, ब्लॅकरॉकसारख्या कंपन्या आखाड्यात
Company DCX Systems Limited Overview in marathi
माझा पोर्टफोलिओ : देशाच्या संरक्षण सिद्धतेतील सच्चा भागीदार – डीसीएक्स सिस्टीम्स  
Investment opportunity in Adani company shares will be available at a discount
अदानींच्या कंपनीमध्ये गुंतवणुकीची संधी, सवलतीत मिळणार शेअर
massive dividend shareholders TCS IT company
मोठ्या आयटी कंपनीकडून भागधारकांना जबरदस्त ‘डिव्हीडंड’; अजूनही समभाग खरेदीची संधी
Torres Jewelry House scam investment a new pattern of fraud foreign company
टोरेस ज्वेलरी हाऊस घोटाळा… परदेशी कंपनीकडून फसवणुकीचा नवा पॅटर्न! सव्वा लाख गुंतवणूकदारांवर पस्तावण्याची वेळ का आली?
New Ipo In share market : Standard Glass Lining IPO
Standard Glass Lining IPO : दमदार कमाई करून देणार हा आयपीओ, गुंतवणूकदार होऊ शकतात मालामाल, जाणून घ्या, कशी करावी नोंदणी?

१. भांडवली बाजार: यामध्ये समभाग खरेदी-विक्री (ब्रोकिंग) आणि वितरण, संस्थात्मक इक्विटी आणि गुंतवणूक बँकिंग या सेवांचा समावेश आहे.

२. मालमत्ता आणि संपत्ती व्यवस्थापन: यामध्ये मालमत्ता व्यवस्थापन कंपनीच्या सेवांचा समावेश आहे.

३. खासगी इक्विटी आणि गृह निर्माण आणि संपत्ती व्यवस्थापन.

४. गृहनिर्माण वित्त: ब्रोकिंग आणि वितरण आणि संस्थात्मक इक्विटी सेवांमध्ये आहे

५. ट्रेजरी गुंतवणूक

हेही वाचा : Money Mantra:एनपीएस वात्सल्य योजना काय आहे आणि त्याचा फायदा कुणाला मिळू शकतो?

महसूल विभाजन कसे?

भांडवली बाजार – दलाली (ब्रोकरेज) : ४९.४३ टक्के

संपत्ती व्यवस्थापन: ३४.९० टक्के

नक्त व्याज उत्पन्न आणि इतर: १५.६७ टक्के

कंपनीने बदलत्या काळानुसार ब्रोकिंग आणि डिस्ट्रिब्युशन व्यवसायातून संपत्ती व्यवस्थापनाकडे वळवण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये ग्राहकांशी (क्लायंट) दृढ करणे, एक विश्वासार्ह सल्लागार म्हणून स्थान देणारे सखोल आणि अधिक अर्थपूर्ण नाते तयार करणे, ब्रोकिंगच्या पलीकडे विस्तारणारे आणि संपत्ती निर्मितीसाठी ग्राहकांच्या आकांक्षेशी जुळणारे सर्वसमावेशक आर्थिक सल्ला देणे ही धोरणात्मक उद्दिष्टे आहेत. भारतीय शेअर बाजाराची वाढता आवाका पाहता मोठे गुंतवणूकदार आता दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांचा विचार करतात आणि वैयक्तिक गुंतवणूक सल्ल्याची मागणी करतात. गुंतवणूकदार आणि ग्राहकांच्या वर्तणुकीतील हा बदल आर्थिक नियोजनात कंपनीचा सहभाग दर्शवतो, ज्यामध्ये विविध मालमत्ता वर्ग आणि प्रभावी जोखीम व्यवस्थापन समाविष्ट आहे.

कंपनीचे यंदाच्या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीचे निकाल अपेक्षेनुसार उत्तम आहेत. गत वर्षातील पहिल्या तिमाहीच्या तुलनेत कंपनीच्या उलाढालीत ४८ टक्क्यांनी वाढ होऊन ती २,३१८ कोटींवर पोहोचली आहे, तर नक्त नफा ६७ टक्क्यांनी वाढून ८८२ कोटींवर गेला आहे. काही महिन्यांपूर्वी प्रत्येक शेअरमागे तीन समभाग बक्षीस (बोनस शेअर) देणाऱ्या मोतीलाल ओसवालने भागधारकांना कायम खूश ठेवले आहे. अनुभवी प्रवर्तक, देशभरातील मोठे विस्तारलेले जाळे तसेच वित्तीय क्षेत्रात जवळपास सगळ्याच विभागातील उपस्थिती याचा फायदा आगामी काळात अपेक्षित आहे.

हेही वाचा : माझा पोर्टफोलियो – उज्ज्वल भवितव्य, अंगभूत मूल्य : पीएनसी इन्फ्राटेक लिमिटेड

शेअर बाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सध्याच्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.

मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड

(बीएसई कोड ५३२८९२)

संकेतस्थळ: http://www.motilaloswalgroup.com/

प्रवर्तक: रामदेव आगरवाल

बाजारभाव: ८०९ /-

प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: एनबीएफसी

भरणा झालेले भाग भांडवल: रु. ५९.७० कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक ६९.०४

परदेशी गुंतवणूकदार ६.४६

बँक/ म्युच्युअल फंड/ सरकार ६.०६

इतर/ जनता १८.४४

पुस्तकी मूल्य: रु. १४७

दर्शनी मूल्य: रु. १/-

लाभांश: १७०० %

प्रति समभाग उत्पन्न: रु. ४६.८

किंमत उत्पन्न गुणोत्तर:१७.३

समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: २०.३

हेही वाचा : आपले बचत खाते भाड्याने देणे

डेट इक्विटी गुणोत्तर: १.५८

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर: ४.१०

रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लोइड (आरओसीई): २०.७

बीटा : १.६

बाजार भांडवल: रु. ४८,३६६ कोटी (लार्ज कॅप)

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: ८२९/२२६

गुंतवणूक कालावधी : ३६ महिने

अजय वाळिंबे

Stocksandwealth@gmail.com

  • वरील लेख केवळ विश्लेषणात्मक संशोधन असून तो गुंतवणूक सल्ला नाही.
  • प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या ०.१% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेट वस्तू घेतलेली नाही.
  • लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

Story img Loader