रुईया समूहाची फिनिक्स मिल्स लिमिटेड ही खरे तर पूर्वीची कापड गिरण. मात्र बदलत्या काळानुसार आपल्या जागेचे व्यवस्थापन करताना कंपनी आज गृहनिर्माण क्षेत्रातील आघाडीची (रिअल इस्टेट कंपनी) कंपनी बनली आहे. फिनिक्स मिल्स मुख्यत्वे मॉलचे व्यवस्थापन, निवासी मालमत्तेचे बांधकाम तसेच हॉटेल व्यवसायात कार्यरत आहे. फिनिक्स समूहाची मुंबई, बेंगळूरु, चेन्नई, पुणे, रायपूर, आग्रा, इंदूर, लखनऊ, बरेली आणि अहमदाबाद येथे स्थावर मालमत्ता आहे. फिनिक्स ही भारतातील आठ शहरांमधील १३ मॉलमध्ये पसरलेल्या ८.८२ दशलक्ष चौरस मीटर रिटेल क्षेत्रासह, आघाडीची रिटेल मॉल विकसक आणि चालक कंपनी आहे. कंपनीचे मॉल्स मुंबई, लखनऊ, पुणे, इंदूर, बरेली, चेन्नई आणि अहमदाबादमध्ये पसरलेले आहेत. कंपनीने गेल्याच वर्षी पॅलेडियम या लक्झरी मॉलचे अहमदाबाद येथे अनावरण केले. ज्यामध्ये २५० हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय रिटेल नाममुद्रा आणि मायकेल कॉर्स, केट स्पेड, कोच, इत्यादीसारख्या ३५ पेक्षा जास्त लक्झरी ब्रँड्स आहेत. तसेच फिनिक्स सिटॅडेल, इंदूर, फिनिक्स मॉल ऑफ द मिलेनियम, पुणे आणि एशिया मॉल, बंगळूरु हे मोठे मॉल्स गेल्या वर्षी सुरू करण्यात आले. सध्या कंपनी ४.३० दशलक्ष चौरस मीटरपेक्षा जास्त जागा रिटेल व्यवसायासाठी विकसित करत आहे. यामध्ये चंडीगढ, पंचकुला, झिरकपूर, मोहाली या शहरांचा समावेश आहे.

फिनिक्सकडे सात वाणिज्य मालमत्ता असून सुमारे ३.२४ दशलक्ष चौरस मीटर विकासयोग्य क्षेत्रफळ आहे. मुंबई, बंगळूरु आणि पुणे येथे कंपनी सुमारे ०.१२ दशलक्ष चौरस मीटर व्यावसायिक जागा भाडेतत्त्वावर चालवते. कंपनी सध्या सहा वाणिज्य मालमत्ता विकसित करत आहे. तसेच कंपनीकडे चार मोठ्या निवासी मालमत्ता असून त्यापैकी तीन बंगळूरु येथे तर एक चेन्नईला आहे. फिनिक्सचा सुमारे ८१ टक्के महसूल हा मालमत्ता आणि संबंधित सेवेतून येत असून सुमारे १९ टक्के महसूल हॉस्पिटॅलिटी व्यवसायातून आहे. कंपनीच्या हॉस्पिटॅलिटी व्यवसायात मुंबईतील सेंट रेजिस तसेच, कोर्टयार्ड मॅरियट, आग्रा यांचा समावेश आहे.

fake branch of state bank open in Chhattisgarh
आमची कुठेही शाखा नाही!
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
market leading stock for 50 years was Tata Deferred
बाजारातली माणसं- बाजाराला तालावर नाचवणारा समभाग : टाटा डिफर्ड
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
India is emerging as worlds third largest power generation and power consumption country
क्षेत्र अभ्यास – ‘पॉवर मोड ऑन’!
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

आणखी वाचा-शेअर बाजारात तेजीला पूर्णविराम की स्वल्पविराम?

कंपनीने सप्टेंबर २०२४ अखेर सरलेल्या तिमाहीचे निकाल नुकतेच जाहीर केले आहेत. गेल्या आर्थिक वर्षातील सहामाहीच्या तुलनेत कंपनीने उलाढालीत ८ टक्के वाढ साध्य करून ती १,८२२ कोटींवर गेली आहे तर नक्त नफ्यात ९ टक्के घट होऊन तो ४५ कोटींवर आला आहे. भारतात ‘फिनिक्स’ हा प्रीमियम मॉल ब्रॅण्ड असून कंपनी आपला इतर क्षेत्रातही उद्योग विस्तारत आहे. सध्या कंपनीचे अलीपूर, कोलकाता, लोअर परेल, मुंबई, पॅलेडियम कार्यालये, चेन्नई तसेच मिलेनियम टॉवर्स, पुणे असे नवीन प्रकल्प विकसित होत असून ते लवकरच कार्यान्वित होतील. फिनिक्सकडून सुरत हे गुजरातचे दुसरे आधुनिक रिटेल मॉलचे केंद्र बनविले जाणार आहे . त्या करता कंपनीने ५०० कोटी रुपये खर्चून ७ एकर जमीन संपादित केली असून तिचे बांधकाम सुरू आहे. कंपनीने हिडको, अलीपूर येथे सुमारे ४१४ कोटी रुपयांना निवासी जागा लिलावातून हस्तगत केली असून सोहना, एनसीआरमध्ये ३३ एकर जमीन गोदामांसाठी घेतली आहे. बांधकाम उद्योगातील विविध क्षेत्रात कंपनीने अल्पावधीत उत्तम कामगिरी करून नाव कमावले आहे. सध्या १,५०० रुपयांच्या आसपास उपलब्ध असणाऱ्या फिनिक्स मिल्सने आपल्या भागधारकांना नुकतेच १:१ प्रमाणात बक्षीस (बोनस) समभाग वाटप केले आहे.

सध्याची शेअर बाजारातील अनिश्चितता पाहता सुचवलेले समभाग कमी बाजार भावात मिळू शकतात, त्यामुळे प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.

आणखी वाचा-बाजारातली माणसं – पोलाद घडवणारे धारदार व्यक्तित्व : रुसी मोदी

फिनिक्स मिल्स लिमिटेड

(बीएसई कोड: ५०३१००)

संकेतस्थळ: http://www.thephoenixmills.com
प्रवर्तक: अतुल रुईया, रुईया समूह

बाजारभाव: रु. १,५१०/-

प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: रिअल इस्टेट / हॉस्पिटॅलिटी

भरणा झालेले भागभांडवल: रु. ७१.५० कोटी
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक ४७.२६

परदेशी गुंतवणूकदार ३५.५०
बँक/ म्युच्युअल फंड/ सरकार १३.१७

इतर/ जनता ४.०७
पुस्तकी मूल्य: रु. २७९

दर्शनी मूल्य: रु. २/-

गतवर्षीचा लाभांश: २५०%

प्रति समभाग उत्पन्न: रु. २९.५७

किंमत उत्पन्न गुणोत्तर: ५१

समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: २८.७

डेट इक्विटी गुणोत्तर: ०.४७
इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर: ५.०७

रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लोइड (आरओसीई): १२.४%
बीटा : ०.७

बाजार भांडवल: रु. ५४,०११ कोटी (लार्ज कॅप)
वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: २,०६८/८८४
गुंतवणूक कालावधी : २४ महिने

stocksandwealth@gmail.com

प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भागभांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.

हा गुंतवणूक सल्ला नाही. लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.