रुईया समूहाची फिनिक्स मिल्स लिमिटेड ही खरे तर पूर्वीची कापड गिरण. मात्र बदलत्या काळानुसार आपल्या जागेचे व्यवस्थापन करताना कंपनी आज गृहनिर्माण क्षेत्रातील आघाडीची (रिअल इस्टेट कंपनी) कंपनी बनली आहे. फिनिक्स मिल्स मुख्यत्वे मॉलचे व्यवस्थापन, निवासी मालमत्तेचे बांधकाम तसेच हॉटेल व्यवसायात कार्यरत आहे. फिनिक्स समूहाची मुंबई, बेंगळूरु, चेन्नई, पुणे, रायपूर, आग्रा, इंदूर, लखनऊ, बरेली आणि अहमदाबाद येथे स्थावर मालमत्ता आहे. फिनिक्स ही भारतातील आठ शहरांमधील १३ मॉलमध्ये पसरलेल्या ८.८२ दशलक्ष चौरस मीटर रिटेल क्षेत्रासह, आघाडीची रिटेल मॉल विकसक आणि चालक कंपनी आहे. कंपनीचे मॉल्स मुंबई, लखनऊ, पुणे, इंदूर, बरेली, चेन्नई आणि अहमदाबादमध्ये पसरलेले आहेत. कंपनीने गेल्याच वर्षी पॅलेडियम या लक्झरी मॉलचे अहमदाबाद येथे अनावरण केले. ज्यामध्ये २५० हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय रिटेल नाममुद्रा आणि मायकेल कॉर्स, केट स्पेड, कोच, इत्यादीसारख्या ३५ पेक्षा जास्त लक्झरी ब्रँड्स आहेत. तसेच फिनिक्स सिटॅडेल, इंदूर, फिनिक्स मॉल ऑफ द मिलेनियम, पुणे आणि एशिया मॉल, बंगळूरु हे मोठे मॉल्स गेल्या वर्षी सुरू करण्यात आले. सध्या कंपनी ४.३० दशलक्ष चौरस मीटरपेक्षा जास्त जागा रिटेल व्यवसायासाठी विकसित करत आहे. यामध्ये चंडीगढ, पंचकुला, झिरकपूर, मोहाली या शहरांचा समावेश आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा