वर्ष १९९६ मध्ये स्थापन झालेली इंडियामार्ट इंटरमेश ही देशातील पहिली आणि सर्वात मोठी बीटूबी डिजिटल मार्केटप्लेस असून, आज बीटूबी क्षेत्रातील मोठी कंपनी म्हणून ओळखली जाते. कंपनी लहान आणि मध्यम व्यवसायांना सहजतेने एकाच मंचावर एकत्रित आणते. इंडियामार्टमुळे भारतातील ऑनलाइन बाजारपेठ अधिक सुलभ, दृश्यमान आणि आकर्षक झाली आहे. कंपनीकडे ऑनलाइन बीटूबी बाजारात ६० टक्के बाजारहिस्सा असून आज इंडियामार्ट डिजिटल उद्योगातील सर्वात मोठी कंपनी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कंपनीचा पोर्टफोलिओ मोठा आणि वैविध्यपूर्ण असून त्यात सुमारे ८१ लाख पुरवठादार, दोन लाखांहून अधिक कंपनीची सेवा विकत घेऊन विक्री करणारे पुरवठादार, ११ कोटी उत्पादने, २.५० कोटी अनन्य व्यवसाय चौकशी आणि वापरकर्ते आणि ग्राहक यांची मोठी गर्दी (इंटरनेट ट्राफिक) आहे. कंपनीकडे २० कोटी नोंदणीकृत खरेदीदार आहेत, त्यातील जवळपास ३७ टक्के पुरवठादार हे खरेदीदार आहेत.इंडियामार्टच्या संकेतस्थळावर ५६ हून अधिक विविध उद्योगांची जवळपास ११ कोटी उत्पादनांची सूची आहे, ज्यामुळे इंडियामार्ट भारतातील सर्वात वैविध्यपूर्ण बाजारपेठांपैकी एक आहे. एकूण देय पुरवठादारांपैकी ८ टक्क्यांहून अधिक कोणत्याही एका उद्योगाचा वाटा नाही. बांधकाम आणि त्या क्षेत्रातील कच्चा माल ही बाजारपेठेतील सर्वात मोठी श्रेणी असून सुमारे ८ टक्के व्यवसाय व्यापते. देशातील हजारांहून अधिक शहरांत कंपनीचा व्यवसाय चालतो. कंपनीचा व्यवसाय मुख्यत्वे लघु आणि मध्यम उद्योग श्रेणीतून येतो. कंपनीने गेल्या पाच वर्षांत सरासरी ३० टक्के वापरकर्त्यांना खरेदीदार बनवले आहे.कंपनीचा विक्री आणि वितरण खर्च महसुलाच्या २० टक्के आहे. गेल्या वर्षी (आर्थिक वर्ष २०२३) कंपनीने आपला व्यवसाय वाढवण्यासाठी सुमारे ६५० कोटींची गुंतवणूक केली. कंपनीने इक्विटीमध्ये काही धोरणात्मक गुंतवणूक केली असून यात व्यापार (२७.५ टक्के), रिअल बुक्स (२६ टक्के), बिझी (१०० टक्के), लाइव्ह कीपिंगचा (६५.९७ टक्के) समावेश आहे.सप्टेंबर २०२४ अखेर सरलेल्या तिमाहीत कंपनीची उलाढाल १७.९७ टक्क्यांनी वधारून ३४७.७० कोटी रुपयांवर पोहोचली आहे तर नक्त नफ्यात गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत तो ९५ टक्के वाढ झाली आहे. तो आता १३५ कोटी रुपयांवर नेला आहे. कंपनीच्या वर्गणीदार सदस्यांकडून येणाऱ्या उत्पन्नात १४ टक्के वाढ झाली असून ते प्रतिसदस्य ६१,००० वर गेले आहे. एकूण वर्गणीतील ७५ टक्के वर्गणी गोल्ड आणि प्लॅटिनम सदस्यांची असून २५ टक्के वर्गणी सिल्व्हर सदस्यांची आहे.

हेही वाचा – कर्जवसुली ‘एजंट’ (उत्तरार्ध)

आर्थिक वर्ष २०२४ मध्ये कंपनीने व्यवसाय वृद्धीसाठी पुढील कंपन्यांत धोरणात्मक गुंतवणूक केली आहे. बिझोम (२५.१ टक्के), शिपवे (२६ टक्के), एअरचेन (२६.२ टक्के), इझीकॉम (२६ टक्के), सुपरप्रोक्योर (२७.४ टक्के), पीएम (१३ टक्के), उद्योग खरेदी (२६.६ टक्के), फ्लीट (१६.५ टक्के), एम१ (९.३ टक्के), झिमयो (१० टक्के). तसेच कंपनी आपल्या उत्पादन पोर्टफोलिओचा विस्तार करत आहे. आगामी कालावधीत कंपनीच्या उत्पादन आणि विक्रीत लक्षणीय वाढ अपेक्षित आहे. अनुभवी प्रवर्तक, लघू आणि मध्यम श्रेणीतील अर्थात एसएमई कंपन्यांचा वाढता सहभाग, विविध क्षेत्रांत गुंतवणूक असलेली आणि कुठलेही कर्ज नसलेली नव्या जमान्याची इंडियामार्ट गुंतवणूक योग्य वाटते.

शेअरबाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सध्याच्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्या टप्प्यात शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.

हेही वाचा – New Rule In 2025 : यूपीआय पेमेंट ते EPFO… एक जानेवारीपासून ‘या’ नियमांत होणार बदल

वेबसाइट: http://www.indiamart.com/

प्रवर्तक: श्री. दिनेश अगरवाल

बाजारभाव: रु. २२५६/-

प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: डिजिटल मार्केटिंग

भरणा झालेले भाग भांडवल: रु. ५९.९८ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक ४९.२१

परदेशी गुंतवणूकदार २३.८६

बँक्स/ म्यूचुअल फंड्स/ सरकार १२.१०

इतर/ जनता १४.८३

पुस्तकी मूल्य: रु. ३१३

दर्शनी मूल्य: रु. १० /-

लाभांश: २००%

प्रति समभाग उत्पन्न: रु. ७१.८

किंमत उत्पन्न गुणोत्तर: ३१.४

समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: ३४

डेट इक्विटी गुणोत्तर: ०.०१

इंटरेस्ट कवरेज गुणोत्तर: ७०.६

रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लोईड (आरओसीई): २३.९

बीटा : १

बाजार भांडवल: रु. १३५२९ कोटी (मिड कॅप)

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: ३१९९/२२२९

गुंतवणूक कालावधी : २४-३० महिने  

Stocksandwealth@gmail.com

• वरील लेख केवळ विश्लेषणात्मक संशोधन असून तो गुंतवणूक सल्ला नाही.

• प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या ०.१% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.

• लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.