(बीएसई कोड ५४३९८०)

वेबसाइट: http://www.jupiterhospital.com/

Amit Shah On Eknath Shinde
Amit Shah : एकनाथ शिंदे यांच्या नाराजीबाबत मंत्रिमंडळ विस्ताराआधी अमित शाह यांचं मोठं विधान
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
mishtann foods, mishtann foods Sebi,
मिष्टान्न! (उत्तरार्ध)
Atul Subhash suicide case wife arrested
Atul Subhash suicide case: अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणी त्यांची पत्नी, सासू आणि मेहुण्याला अटक
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
AI lawyer responds to CJI Chandrachud's question
CJI DY Chandrachud to AI Lawyer: “भारतात फाशीची शिक्षा…”, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा AI वकिलाला प्रश्न; उत्तराने झाले सर्वच अवाक
mutual fund, future of children, mutual fund children,
मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी कोणता म्युच्युअल फंड घ्याल?
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…

प्रवर्तक: डॉ. अजय ठक्कर

बाजारभाव: रु. १,५२२/-

प्रमुख उत्पादन/ व्यवसाय : आरोग्यनिगा

भरणा झालेले भाग भांडवल: रु. ६५.२७ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक ४०.९१

परदेशी गुंतवणूकदार ८.८४

बँकस्/ म्यु. फंड/ सरकार १३.४६
इतर/ जनता ३६.७९

पुस्तकी मूल्य: रु. २०३

दर्शनी मूल्य: रु. १०/-

लाभांश: १०%

प्रति समभाग उत्पन्न: रु. २६.९०

किंमत उत्पन्न गुणोत्तर: ५७.२

समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: ६०.९

डेट इक्विटी गुणोत्तर: ००

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर: ६१.५

रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड (ROCE): २२.३%

बीटा: ०.५

बाजार भांडवल: रु. १०,००४ कोटी (स्मॉल कॅप)

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: १,६५४ / १,०३७

गुंतवणूक कालावधी : २४-३० महिने

ज्युपिटर लाइफलाइन हॉस्पिटल्स लिमिटेड ही मुंबई महानगर क्षेत्र (एमएमआर) आणि भारताच्या पश्चिम भागात एक मल्टी-स्पेशलिटी रुग्णालय / आरोग्य सेवा पुरवणारी शृंखला आहे. महाराष्ट्रातील ठाणे येथून २००७ मध्ये सुरुवात केलेल्या ज्युपिटर हॉस्पिटलने नंतर १० वर्षांत पुणे आणि २०२० पासून इंदूर येथेदेखील आरोग्यसेवा सुरू केली आहे. ज्युपिटर हॉस्पिटलला ‘नॅशनल ॲक्रिडेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अँड हेल्थकेअर प्रोव्हायडर्स’ अर्थात एनएबीएच हे भारतीय गुणवत्ता परिषदेचे मानांकन मिळाले आहे. ज्युपिटरची तिन्ही रुग्णालये पूर्ण-सेवा रुग्णालये आहेत, जी ‘ऑल-हब-नो-स्पोक’ मॉडेलवर कार्यरत आहेत. अर्थात प्रत्येक रुग्णालय स्वतंत्र आणि कुशल आरोग्यसेवा व्यावसायिक आणि आवश्यक पायाभूत सुविधांनी सुसज्ज आहे.

हेही वाचा – मिष्टान्न! (उत्तरार्ध)

गेल्याच वर्षी कंपनीने ‘आयपीओ’द्वारे, प्रति शेअर ७२५ रुपये अधिमूल्याने ८६९ कोटी रुपये जमा केले होते. ‘आयपीओ’च्या उद्देशाप्रमाणे कंपनीने संपूर्ण कर्ज फेडून टाकले असून आता नियोजित विस्तारीकरण योजना राबवत आहे.

हॉस्पिटल्स आणि विस्तार

  • ठाणे: २००७ पासून कार्यान्वित, क्षमता ३७७ बेड, ७२ टक्के सरासरी ऑक्युपन्सी आणि प्रति व्याप्त बेड सरासरी महसूल ६६,७००/- रु.
  • पुणे: २०१७ पासून कार्यान्वित, क्षमता ३७५ बेड, ६७ टक्के सरासरी ऑक्युपन्सी आणि प्रति व्याप्त बेड सरासरी महसूल ५५,०००/- रु.
  • इंदूर: २०२० पासून कार्यरत, क्षमता २३१ बेड, ५९ टक्के सरासरी ऑक्युपन्सी आणि प्रति व्याप्त बेड सरासरी महसूल ४४,७००/- रु.
    विस्तार आणि भांडवली खर्च
  • यंदाची दुसऱ्या तिमाहीत पुण्यात २२ बेड जोडले.
  • यंदा वर्षअखेरपर्यंत इंदूर रुग्णालयात ७५ अतिरिक्त खाटा विकसित होत आहेत.
  • डोंबिवली रुग्णालयाचे बांधकाम रुळावर असून, पुण्यातील दुसऱ्या युनिटसाठी नियामक मंजुरी अंतिम टप्प्यात आहे. या विस्तारामुळे एकूण बेड क्षमता २५०० बेडपर्यंत वाढेल.

कंपनीचे सप्टेंबर २०२४ साठी संपलेल्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर झाले असून ते अपेक्षेप्रमाणे उत्तम आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपनीच्या उलाढालीत २४ टक्के वाढ झाली असून ती ३२३ कोटींवर गेली आहे, तर नक्त नफ्यात ५० टक्के वाढ होऊन ५२ कोटींवर गेला आहे. मोठ्या शहरातून तसेच द्वितीय श्रेणी शहरात शासकीय इस्पितळे अपुरी पडत असल्याने खासगी आणि आधुनिक रुग्णालये आवश्यक आहेत. तसेच भारताची लोकसंख्या आणि वाढते शहरीकरण पाहता ज्युपिटरसारख्या अत्याधुनिक आणि मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल्सची गरज मोठी आहे. कुठलेही कर्ज नसलेल्या ज्युपिटर हॉस्पिटलचे शेअर्स सध्या १,५०० रुपयांच्या आसपास उपलब्ध आहेत.

हेही वाचा – मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी कोणता म्युच्युअल फंड घ्याल?

शेअर बाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सुचवलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.

अजय वाळिंबे

Stocksandwealth@gmail.com

हा लेख गुंतवणूक सल्ला नव्हे तर अभ्यासपूर्ण विवेचन आहे.

प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.

* लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

Story img Loader