प्राप्तिकर भरताना, प्राप्तिकर चलानमध्ये सर्व माहिती बरोबर व परिपूर्ण असावी लागते. त्यात मूल्यांकन वर्ष, पॅन, करदात्याचे नाव, पत्ता, चलन क्रमांक, मेजर व मायनर कोड इ. माहिती योग्यरित्या भरली आहे की नाही याची खात्री करणे आवश्यक आहे. तथापि चलान भरताना काही हमखास चुका होताना दिसतात. जरी सदर काम तज्ञ कर सल्लागारांकडे दिलेले असले तरी प्रत्यक्षात कर सल्लागार ते काम करीत नाहीत तर त्यांचे शिकाऊ मदतनीस हे काम करतात. त्यामुळे चुका होण्याची शक्यता जास्त असते. त्यात ‘आर्थिक वर्ष’ व ‘आकारणी वर्ष’ यांची गल्लत झाल्याने बऱ्याचशा चुका झाल्याचे निदर्शनास आले आहे.

‘मेजर’ म्हणजे काय हे न समजल्याने अनेक चुका झाल्याचे आढळते तर ‘मायनर कोडमध्ये’ प्राप्तिकर हा आगाऊ कर म्हणून भरला जात आहे कि स्वयं निर्धारण कर आहे की करनिर्धारण झाल्यावर भरण्यात येणारा कर आहे हे माहित नसल्याने चुका होतात. अपील दाखल करायची फी वा इतर विलंब शुल्क वा उपकर नीट लक्षात न आल्याने अशा व्यवहारी चुका होतात. प्राप्तीकर विभागाने देखील अशा चुका होतीलच असे गृहीत धरून त्या सुधारण्यासाठी तजवीज देखील केली होती.

stock market fraud loksatta
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ८७ लाखांची फसवणूक
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Jeevan pramaan online process
Money Mantra: हयातीचा दाखला ऑनलाईन मिळवण्यासाठी जीवन प्रमाण सुविधा काय आहे?
Vodafone Idea reduces data benefits in 23 rupees prepaid plan
Vodafone Idea Prepaid Plan: वोडाफोन आयडियाच्या २३ रुपयांच्या प्लॅनमध्ये झाला बदल; आता मिळेल ‘इतका’ डेटा; घ्या जाणून
Use UPI without Bank account NPCI launches new feature UPI Circle for family members and friends
आता बँक खाते नसलेला व्यक्ती करू शकतो UPIचा वापर; NPCIने कुटुंबातील सदस्यांसाठी सुरू केलं UPI Circle, जाणून घ्या नव्या फीचरबद्दल…
Stock market investment bait, fraud, Pune,
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने २६ लाखांची फसवणूक
RBI announces changes to KYC rules! How it will impact you
KYC : RBI ने केली KYC नियम बदलण्याची घोषणा, आपल्यावर नेमका कसा परिणाम होणार?
IDBI Bank Recruitment 2024: Registration Underway For 1000 Vacancies; Apply By November 16
युवकांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची मोठी संधी; आयडीबीआय बँकेत भरती; जाणून घ्या अर्ज कसा करायचा?

हेही वाचा… Money Mantra: स्टार्टअप बिझनेस मॉडेलचे प्रकार

आता कॉम्प्युटर्सच्या जमान्यात सर्व घरी बसून करता येणे शक्य असल्याने चलानाची दुरुस्ती मात्र प्राप्तीकर विभागात जाऊनच करावी लागत होती. आता १८ ऑगस्ट २०२३ रोजी केंद्रीय प्रत्यक्ष कर समितीने (CBDT) द्वारे प्राप्तिकर पोर्टलवर एक नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून करदात्यांना आता त्यांचे चुका झालेले जुने प्राप्तिकर चलान ‘ऑनलाइन’ दुरुस्त करता येउ शकणार आहे. सध्या, आर्थिक वर्ष २०१९-२० म्हणजेच आकारणी वर्ष २०२०-२१ आणि त्यापुढील वर्षातील चलान दुरुस्त करण्याची संधी प्राप्तिकर विभागाच्या पोर्टलवर उपलब्ध करण्यात आली आहे.

हेही वाचा… Money Mantra: निकाल वार्ता: दुसऱ्या तिमाहीत टायटनच्या व्यवसायात २० टक्के वाढ

आता करदात्यांना प्राप्तिकर अधिकाऱ्याकडे न जाता पूर्वी चुकून झालेल्या चुका व चलान तपशील ‘ऑनलाइन’ दुरुस्त करता येणे शक्य होणार आहे. यापूर्वी अशा चुका/त्रुटी दुरुस्त करण्यासाठी प्राप्तिकर अधिकाऱ्याकडे खेटे मारावे लागत होते. याव्यतिरिक्त बँकेत भरलेल्या चलानातील झालेल्या चुकांच्या दुरुस्तीसाठी वेगळी ‘ऑफलाईन चलान दुरुस्ती योजना’ देखील घोषित केली आहे. तथापि सदर सुविधा प्राप्तिकर भरल्यापासून फक्त सात दिवसांच्या आत करदाता याचा वापरू शकतो. सात दिवसांनंतर चूक सुधारायची असल्यास जुनी प्रक्रिया (ऑफलाइन पद्धत) अवलंबावी लागेल असे स्पष्ट करण्यात आले आहे.

काय आहे नवीन सुविधा?

ऑनलाइन चलन दुरुस्ती आता आर्थिक वर्ष २०१९-२० म्हणजेच आकारणी वर्ष २०२०-२१ आणि त्यानंतरच्या चलानच्या संदर्भात झालेल्या चुका दुरुस्त करण्याच्या संदर्भात लागू आहे. याचा अर्थ असा की जर एखादी व्यक्ती आकारणी वर्ष २०२०-२१ किंवा त्यानंतरच्या कोणत्याही वर्षाशी संबंधित कर भरत असेल आणि त्यात चूक झाली असेल. अशा परिस्थितीत, प्राप्तिकर कार्यालयात जाण्याऐवजी विशिष्ट कालावधीत विशिष्ट सुधारणा ऑनलाइन केल्या जाऊ शकतात.

कोणती माहिती दुरुस्त करता येईल?

नवीन ऑनलाइन सुविधा करदात्यांना प्राप्तिकर चलानमधील फक्त तीन तपशील दुरुस्त करण्याची परवानगी देते.

१. एखादी व्यक्ती त्यांच्या कर भरणा चलानमध्ये मूल्यांकन वर्ष लिहिण्यास चुकल्यास, २. प्रमुख हेड (कंपन्यांव्यतिरिक्त इतरांसाठी प्राप्तिकरासाठी कोड 0021) निवडताना चूक झाल्यास आणि ३. किरकोळ हेडमध्ये चुकीचा पर्याय निवडल्यास (जसे की आगाऊ कर, स्वयं निर्धारण कर इ. सारखे) तपशील दुरुस्त करण्यासाठी ‘चलान सुधारणा’ पर्याय वापरू शकते.

प्राप्तिकर ई-फायलिंग संकेतस्थळानुसार, “चलान सुधारणा विनंत्या फक्त सध्या ‘किरकोळ हेडसाठी’ दाखल केल्या जाऊ शकत आहेत.: १०० (आगाऊ कर), ३०० (स्व-मूल्यांकन कर) आणि ४०० (नियमित मूल्यांकन कर म्हणून मागणी पेमेंट) आणि त्याबरहुकूम त्या संबंधित ‘मेजर हेडसाठी’ ई-फायलिंग पोर्टलच्या माध्यमातून चुकीची दुरुस्ती करता येईल .”

कोणती माहिती दुरुस्त करता येणार नाही?

१. आर्थिक वर्ष २०१९-२० म्हणजेच आकारणी वर्ष २०२०-२१ आणि त्यापुढील वर्षातील चलान दुरुस्त करण्याची संधी प्राप्तिकर विभागाच्या पोर्टलवर उपलब्ध करण्यात आली आहे. याचा अर्थ आर्थिक वर्ष २०१९-२० अगोदर झालेल्या चलानातील चुका ‘ऑनलाइन’दुरुस्त करता येणार नाहीत त्या साठीच पुन्हा प्राप्तीकर अधिकाऱ्याकडे जावे लागणार आहे.

२. पॅन, करदात्याचे नाव बदलता येणार नाही

३. या दुरुस्ती करदात्याने ‘ऑनलाइन’ पेमेंट करताना केलेल्या चुका दुरुस्त होतील परंतु करदात्याने बँकेमार्फत प्राप्तिकराचे पेमेंट केले असेल व त्यात चुका झाल्या असतील तर त्यासाठी ही सुविधा उपलब्ध असणार नाही. त्यासाठी सदर बँकेकडे व नंतर प्राप्तीकर विभागाकडे खेटे मारावे लागतील

एकाच चलानमध्ये अनेक दुरुस्त्या करता येतील का?

“करदात्याला दुरूस्ती वेबपृष्ठावर अस्तित्वात असलेले तीनही पर्याय निवडून एकाच चलनात अनेक सुधारणा विनंत्या दाखल करणे शक्य आहे, म्हणजे, आकारणी वर्ष , कर गटवारी (मुख्य शीर्ष) आणि देयकाचा प्रकार (लहान शीर्ष),”

आयटीआर फाइलिंग पोर्टलवर चलन सुधारणा वैशिष्ट्य कशी वापरावी?

चलन दुरुस्ती ऑनलाइन सुविधा वापरण्यापूर्वी, करदात्याने खालील पूर्वतयारी जाणून घेतल्या पाहिजेत

१. करदात्याने ई-फायलिंग प्राप्तिकर विभागाच्या पोर्टलवर नोंदणी केली पाहिजे

२. प्राप्तीकर विवरणपत्र दाखल करताना ज्या चलनात सुधारणा करणे आवश्यक आहे त्याची माहिती सदर विवरण पत्रात भरलेली नसावी. याचा अर्थ करदात्याने दाखल केलेल्या प्राप्तीकर विवरणपत्रात चुकीच्या चलान तपशीलांचा वापर केलेला नसावा

३. चलन सुधारणा करण्या संदर्भातील विनंती/विनंत्या बँका इत्यादी वा इतर कोणत्याही प्राधिकरणाकडे प्रलंबित नसाव्यात

चलन दुरुस्ती विनंती ऑनलाइन कशी भरावी

पायरी १: अ. आयटीआर फाइलिंग (https://www.incometax.gov.in/iec/foportal/) वेबसाइटला क्लिक करा

ब. खात्यात लॉग इन करा

क. ‘सेवा’ स्तंभाखाली, ‘चलान सुधारणा’ पर्याय निवडा

पायरी २: एक नवीन वेबपृष्ठ उघडेल. येथे ‘चलन दुरुस्ती विनंती तयार करा’ निवडा

पायरी ३: अ. आता एक नवीन वेबपृष्ठ उघडेल. प्राप्तिकर पोर्टल तुम्हाला योग्य पर्याय निवडण्यास सांगेल

ब. ज्यामध्ये सुधारणा आवश्यक आहे तो पर्याय करदाता निवडू शकतो -अ) मूल्यांकन वर्षातील बदल, ब)

लागू करात बदल (मुख्य शीर्ष) आणि क) देयकाच्या प्रकारात बदल (लहान शीर्ष). एकदा निवडल्यानंतर, सुरू ठेवा वर क्लिक करा

पायरी ४: पुढील पायरी करदात्याला प्राप्तिकर चलनाचे तपशील प्रदान करण्यास सांगेल ज्यात सुधारणा आवश्यक आहे. येथे व्यक्तीला एकतर मूल्यांकन वर्ष किंवा चलन ओळख क्रमांक (CIN) नमूद करावा लागेल. यानंतर सुरू ठेवा क्लिक करा

पायरी ५: निवडलेल्या पर्यायावर अवलंबून, एक नवीन वेबपृष्ठ उघडेल. जर एखाद्या व्यक्तीने सीआयएन क्रमांक दिला असेल, तर संबंधित चलान तपशील दर्शवेल. अन्यथा, जर मूल्यांकन वर्ष निवडले गेले असेल, तर त्या आकारणी वर्षाशी संबंधित सर्व चलन सूची म्हणून दाखवले जातील. एखाद्याने संबंधित चलान निवडणे आवश्यक आहे जे दुरुस्त करणे आवश्यक आहे. एकदा निवड पूर्ण झाल्यावर सुरु ठेवा वर क्लिक करा.

पायरी ६: आता एखाद्या व्यक्तीने आधी निवडलेल्या पर्यायाचा योग्य तपशील प्रविष्ट करणे आवश्यक आहे. सुरू ठेवा वर क्लिक करा.

पायरी ७: एकदा योग्य तपशील प्रविष्ट केल्यानंतर, एखाद्या व्यक्तीला कर चलानमधील सुधारणा सत्यापित करणे आवश्यक असेल. पडताळणी आधार ओटीपी, डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र (DSC) किंवा नेट-बँकिंग, डीमॅट आणि बँक खात्याद्वारे इलेक्ट्रॉनिक सत्यापन कोड (EVC) वापरून केली जाऊ शकते. सत्यापन पर्याय निवडल्यानंतर सुरू ठेवा क्लिक करा.

पायरी ८: एकदा सुधारणा यशस्वीरित्या ई-सत्यापित झाल्यानंतर, प्राप्तिकर ई-फायलिंग वेबसाइट व्यवहार आयडीसह यशस्वी संदेश दर्शवेल. दाखल केलेल्या दुरुस्ती विनंतीच्या स्थितीचा मागोवा घेण्यासाठी हा व्यवहार आयडी हातात ठेवा.

चलान दुरुस्तीची स्थिती कशी ट्रॅक करावी?

कर चलान दुरुस्तीची स्थिती पाहण्यासाठी, करदात्याने त्यांची ओळखपत्रे वापरून आयटीआर पोर्टलवर लॉग इन करणे आवश्यक आहे आणि सेवा टॅब अंतर्गत ‘चलान सुधारणा’ पर्याय निवडा. क्लिक केल्यावर हे वेबपृष्ठ चलन दुरुस्तीची स्थिती दर्शवेल.

चलान दुरुस्त करण्यासाठी किती कालमर्यादा आहे?

“प्राप्तिकर विभागाने अद्याप हे निर्दिष्ट केलेले नाही की मूल्यांकन अधिकारी चलन दुरुस्त करण्यासाठी किती वेळ घेतील. तथापि माझ्या अनुभवानुसार साधारणपणे सुधारणा विनंती पंधरा दिवसांत केली जाईल. जर दुरुस्तीची विनंती दाखल केल्यापासून बराच कालावधी गेला असेल, तर करदाते तक्रार नोंदवू शकतात किंवा सीपीसी हेल्पलाइनवर कॉल करू शकतात, किंवा सीपीग्राम वर ग्रीव्हंस नोंदवू शकता”