अल्प आणि दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्यावरील कराच्या आकारणीत आमूलाग्र बदल झाले आहेत. हे आपण मागील काही लेखांमधून समजून घेतले. संपत्ती अल्प किंवा दीर्घमुदतीची ही त्याच्या धारणकाळानुसार ठरते. हा धारणकाळ पूर्वी (म्हणजे २३ जुलै, २०२४ पूर्वी) ३६ महिन्यांचा होता, तो आता (२४ जुलै, २०२४ नंतर) २४ महिन्यांचा करण्यात आला. याला प्रामुख्याने दोन अपवाद होते. एक म्हणजे शेअरबाजारात सूचिबद्ध असलेल्या कंपन्यांचे समभाग, किंवा सूचिबद्ध सिक्युरिटीज, इक्विटी फंडातील युनिट यांच्यासाठी हा कालावधी १२ महिने आहे. स्थावर मालमत्ता आणि खासगी कंपन्यांचे समभाग यांच्यासाठी हा कालावधी पूर्वीच २४ महिने केला होता. आता या व्यतिरिक्त इतर सर्व भांडवली संपत्तीसाठीसुद्धा (सोने वगैरे) हा कालावधी २४ महिन्यांचा करण्यात आला आहे. यामुळे करदात्यांची भांडवली संपत्ती दीर्घमुदतीची होण्यासाठी खरेदी केल्या तारखेपासून ३६ महिने वाट न बघता ती २४ महिन्यातच दीर्घमुदतीची होणार. अशा दीर्घमुदतीच्या भांडवली संपत्तीच्या विक्रीवर होणाऱ्या भांडवली नफ्यासाठी करदात्याला कर वाचविण्यासाठी किंवा करदायित्व कमी करण्यासाठी गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत. या तरतुदीमुळे करदात्याला लाभच होणार आहे. या पर्यायांमध्ये एक लोकप्रिय पर्याय म्हणजे नवीन घरात गुंतवणूक करून कर वाचविणे किंवा कमी करणे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा