तृप्ती राणे

कवी चंद्रशेखर गोखले यांच्या एका चारोळीतील ओळींचा वापर करून या दोन वाक्यांनी आजच्या लेखाची सुरुवात करते आहे. नफा हा शब्द जरी उच्चारला तरी गुंतवणूकदार खूश होतो. मुळात नफा मिळावा यासाठीच तर आपण गुंतवणूक करत असतो. कोणताही नवीन गुंतवणूक पर्याय कुणी सुचवला तर पहिला अपेक्षित प्रश्न असतो तो फायदा किती होणार याबाबत आणि मग रक्कम किती लागणार आणि जोखीम किती असणार (या प्रश्नापर्यंत येईपर्यंत बरेच जण फक्त संभाव्य नफा पाहून इतके हुरळून जातात की, त्यात नेमकी जोखीम किती आहे? याचे भान राहत नाही)? ज्या गुंतवणूकदारांनी नफा उपभोगलेला असतो, त्यांनाच त्याची खरी मजा कळते. नफा मिळवणे, कमावणे आणि उपभोगणे या तीन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.

Tharla Tar Mag Maha Episode Promo sayali confess love
“तुमच्यावर खूप प्रेम…”, अखेर सायलीने दिली प्रेमाची कबुली! ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा ट्विस्ट, नेमकं काय घडलं? पाहा प्रोमो
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”
Devendra Fadnavis talk about his political career in BJP and about RSS
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कबुली, म्हणाले, “संघ स्वंयसेवकाला आदेश पाळायचा असतो, तेच मी केले म्हणून भाजपमध्ये…”
Devendra Fadnavis and Divija Fadnavis
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांकडून लेक दिविजाचं तोंडभरून कौतुक; हुशारीचं वर्णन करताना म्हणाले, “तिच्यातील प्रगल्भता…”
Important tips to help prevent car theft
‘या’ छोट्या टिप्स फॉलो केल्यास चोर तुमची कार कधीही चोरणार नाही
What Suresh Dhas Said About Munni?
Suresh Dhas : सुरेश धस यांचं वक्तव्य; “मुन्नी म्हणजे राष्ट्रवादीतला एक पुरुष, त्या मुन्नीने कुठेही चर्चेला यावं, मी…”

कधी कधी काहीही न करता नफा मिळतो (कदाचित त्या गुंतवणूकदाराच्या भाग्यात तो नफा असावा!). तर काही गुंतवणूकदार त्यांच्या पोर्टफोलिओच्या योग्य व्यवस्थापनेतून नफा कमावतात. या प्रकारातील गुंतवणूकदार प्रश्न विचारतात, अभ्यास करतात, जोखमीकडे लक्ष ठेवतात आणि वेळोवेळी पोर्टफोलिओची मशागत करतात. आता नफा उपभोगणे म्हणजे काय हे समजून घेऊ या. वाढलेल्या बाजारभावामुळे आपली गुंतवणूक जेव्हा वाढत असते तेव्हा त्या वाढीला कागदी नफा (पेपर प्रॉफिट) म्हणतात. म्हणजेच जोवर आपण ती गुंतवणूक विकत नाही तोवर हा नफा आभासी असतो. या नफ्याचा खरा उपभोग आपण तेव्हाच करून घेतो जेव्हा आपण तो आपल्या खात्यात घेऊन, त्यावर लागलेला कर भरून एक तर त्यातून आर्थिक उद्धिष्ट साध्य करतो किंवा पुन्हा तो नफा पुढच्या गुंतवणुकीसाठी वापरतो.

हेही वाचा >>> दुहेरी किंमत प्रणाली : साखरेच्या महागाईवर उतारा

एका उदाहरणातून आपण हे समजून घेऊ या. एक राघव नावाच्या माणसाने ५०० रुपयांना लॉटरीचे तिकीट विकत घेतले आणि त्याला एक लाख रुपयांची लॉटरी लागली. इथे राघवला रु. ९९,५०० रुपयांचा नफा मिळाला. दुसरीकडे याच राघवने आर्थिक उद्धिष्टानुसार आणि जोखीम क्षमतेनुसार गुंतवणूक केली आहे. दरमहा तो मासिक गुंतवणूक करतो. निरनिराळे लेख वाचून आणि मित्रांशी चर्चा करून तो त्याची गुंतवणूक स्वतःच करतो आणि नियमित आढावा घेतो. त्याच्या या मेहनतीमुळे आणि बाजारातील तेजीमुळे त्याची गुंतवणूक ५० टक्क्यांहून अधिक वाढ दाखवत आहे. हे बघून राघव फार खूश आहे. मात्र बाजार हा नेहमीच गुंतवणूकदारांची परीक्षा घेत असतो. जर बाजार पडला, तर गुंतवणुकीवर मिळालेला परतावा देखील कमी होत असतो. परिणामी एकंदर पोर्टफोलिओमधील नफा कमी होतो. अशा वेळी पोर्टफोलिओमधील नफा काढला नाही किंवा अतिलोभापायी तो आणखी वाढेल या आशेने नजीकच्या काळातील आर्थिक ध्येयाकडे दुर्लक्ष केले जाते. यामुळे हाती आलेल्या कागदी नफ्याचे रूपांतर प्रत्यक्ष नफ्यात करून घेता न आल्याने राघव पुढचे दिवस खंत करतो.

हेही वाचा >>> Gold-Silver Price on 16 October 2023: ऐन नवरात्रोत्सवात बाजारात सोन्याची मोठी उसळी, पाहा किती रुपयांनी वाढले भाव

मागील साडेतीन वर्षांपासून भांडवली बाजाराने अनेक गुंतवणूकदारांना चांगली कमाई करून दिली आहे. ज्यांनी हिम्मत दाखवून माफक जोखीम घेऊन वर्ष २०२० मध्ये गुंतवणूक केली आहे त्यांना तर नक्कीच चांगला फायदा झाला आहे. मात्र ज्यांनी फार अभ्यास न करता दुसरा गुंतवणूकदार ज्याप्रमाणे गुंतवणूक करतो तशी गुंतवणूक केली त्यांनी देखील बराच नफा मिळवला असेल. आपल्यातील काही लोकांना नेहमीच सगळीकडे उशिरा जाण्याची सवय असते. बाजारात देखील असे गुंतवणूकदार असतात, जे बाजार तेजीच्या दिशेने गेल्यावर गुंतवणूक करतात. तसेच स्मॉल आणि मिडकॅप कंपन्यांचे शेअर धावायला लागले किंवा त्यांच्या किमती वरच्या पातळीवर पोहोचल्यावर ते त्यात गुंतवणूक करतात. कारण अशा अनेक गुंतवणूकदारांना या प्रकारची गुंतवणूक स्वस्त वाटते आणि मग जोवर बाजार झपाट्याने वर जातो तोवर असे गुंतवणूकदार तेजीचा उत्सव साजरा करतात. मात्र यातले सगळेच गुंतवणूदार ‘स्मार्ट’ नसतात. कारण बाजारात पडझड झाली तरी तो पुन्हा तेजीच्या दिशेने झेपावेल आणि आपली गुंतवणूक वाढेल अशी आशा लावून बसतात. कारण त्यांनी नजीकच्या काळात फक्त तेजीच्या दिशेने जाणाराच बाजार अनुभवलेला असतो. जे स्मार्ट गुंतवणूक करतात ते मिळालेला नफा पदरी पाडून घेतात किंवा बाजारात घसरण सुरू होण्याच्या योग्य वेळीच बाहेर पडतात.

हेही वाचा >>> वित्तरंजन : भारताचे पोलाद पुरुष – टी. टी. कृष्णमचारी

करोनाच्या महासाथीनंतर रशिया-युक्रेन युद्ध आणि त्यापरिणामी विस्कटलेली पुरवठा साखळी, वाढलेली महागाई, वाढते व्याजदर आणि आता नव्याने सुरू झालेले इस्राईल-हमासमधील युद्ध या सर्व घटनांमुळे बाजारात मोठ्या हालचाली झाल्या आहेत. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारात ओतलेला निधी आणि देशांतर्गत आघाडीवर किरकोळ गुंतवणूकदारांनी ‘एसआयपी’च्या माध्यमातून गुंतवणूक वाढवल्याने निर्देशांकांनी नवीन उच्चांकी पातळी गाठली. मात्र नफावसुलीमुळे पुन्हा बाजारात घसरण झाली. स्मॉल आणि मिडकॅप कंपन्यांच्या समभागांमध्ये गेल्या काही महिन्यात फार झपाट्याने वाढ झाली आहे. येत्या काळात बाजारात पडझड होण्याची दाट शक्यता असल्याने गुंतवणूकदारांनी मिळालेला नफा काही प्रमाणात काढून त्याचा अनुभव घेणे अधिक योग्य होईल.

वाचकांना पुढील काही गोष्टी पोर्टफोलिओतून नफा काढायला मदत करतील

१. जी गुंतवणूक गेल्या ३-४ महिन्यांत झपाट्याने वाढली असेल त्यातील २० ते २५ टक्के गुंतवणूक काढून घ्या. उदा. स्मॉल व मिडकॅप कंपन्यांचे शेअर किंवा म्युच्युअल फंड.

२. चांगल्या कंपन्यांचे शेअर विकण्याआधी त्यांचा जुलै-सप्टेंबरचा निकाल पाहून मग समभाग विक्रीचा निर्णय घ्या.

३. ज्या कंपन्यांवरील कर्ज वाढले असेल आणि कार्यकारी नफा कमी असेल, अशा कंपन्यांना येता काळ जास्त आव्हानात्मक असेल. अशा कंपन्यांचे आपल्या पोर्टफोलिओमधील १५ ते २० टक्के शेअर विकून पुढे त्यांच्या कामगिरीवर नीट लक्ष ठेवा. जर कामगिरी असमाधानकारक असेल तर पुन्हा किमान ५० ते ६० टक्के शेअर विक्री करून पोर्टफोलिओमधील त्याचे प्रमाण कमी करा.

४. आपल्या पोर्टफोलिओमध्ये सर्वात जास्त प्रमाणात जो शेअर किंवा म्युच्युअल फंड असेल तर त्याची जोखीम जाणून घ्या. त्याची कामगिरी असमाधानकारक असून देखील कोणत्याही कारणाशिवाय तो वाढत असेल तर त्याचे पोर्टफोलिओमधील प्रमाण कमी करा.

५. मागील परतावे बघून किंवा एखाद्या गुंतवणुकीच्या प्रेमात पडून ती न विकण्याचा हट्ट धरू नका.

६. पोर्टफोलिओमधील दुप्पट-तिप्पट झालेल्या गुंतवणुकीचा देखील अभ्यास करा. जर अशी गुंतवणूक कमी प्रमाणात असेल तर नफा पदरी पाडून बाजार खाली आल्यावर पुन्हा तो समभाग खरेदी करा.

७. नवीन गुंतवणुकीसाठी जर हाताशी पैसे नसतील तर वरीलप्रमाणे नफा काढून निधी उभारावा. हे पैसे बँकेतील अल्प मुदतीच्या ठेवीत, लिक्विड फंडात किंवा आर्बिट्राज फंडमध्ये गुंतवावे. इथे जास्त परतावा मिळत नसला तरी आपल्याला जेव्हा बाजारात गुंतवणुकीची संधी मिळेल त्यावेळी हा निधी उपलब्ध होतो.

८. मोठ्या पोर्टफोलिओचे नुकसान टक्केवारीने जरी कमी असले तरी निव्वळ रुपयांमध्ये त्याचे प्रमाण जास्त असते. उदा. ५ कोटींच्या पोर्टफोलिओमध्ये १० टक्के नुकसान झाल्यास ते रुपयांच्या स्वरूपात ५० लाख इतके मोठे असते. म्हणून अशा पोर्टफोलिओची अधिक काळजी घ्यावी लागते. योग्य वेळी नफा काढला नाही आणि खाली आलेल्या बाजारात पुन्हा गुंतवणूक केली नाही तर पुन्हा तो पोर्टफोलिओ वर यायला खूप वेळ लागू शकतो.

जागतिक घडामोडींमुळे किंवा कोणत्याही नकारात्मक कारणांमुळे बाजार झपाट्याने खाली येतो. विशेषतः यावेळी गुंतवणूकदारांना स्मॉल-मिडकॅप कंपन्यांचे शेअर विकताना लोअर सर्किटचा खूप त्रास होऊ शकतो. म्हणून अशा कंपन्यांच्या शेअरच्या बाबतीत तर जास्त खबरदारी घ्यावी लागते. स्मॉल-मिडकॅप म्युच्युअल फंड योजनांमधील गुंतवणूक जरी काढायला सोपी असली तरी तिची एनएव्ही झपाट्याने खाली येते. मग जितका जास्त उशीर, तितते नुकसान वाढते किंवा गुंतवणुकीवरील परतावा कमी होतो.

बाजारात निधी ओतताना मोठ्या गुंतवणूकदारांकडून सुरुवातीला लार्ज कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाते आणि मग पुढे ते मिड आणि स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. पुढे ‘स्मार्ट गुंतवणूकदार’ स्मॉल आणि मिड कॅप कंपन्यांचे शेअर पहिले विकतात आणि शेवटी लार्जकॅपकडे वळतात. तेव्हा हे गुंतवणुकीचे चक्र समजून गुंतवणुकीतून नफा वेळीच काढून घ्यावा. अजून गुंतवणुकीवरील परतावा ५ ते १० टक्क्यांनी वाढेल या आशेने स्वतःच्या पोर्टफोलिओची जोखीम वाढवण्यात हुशारी नाही तर ते अतिलोभाचे लक्षण आहे. तेव्हा गुंतवणूदारांनो सावध व्हा!

तृप्ती राणे

trupti_vrane@yahoo.com

प्रकटीकरण: हा लेख फक्त मार्गदर्शनपर आहे. इथे लेखिका कोणतीही जाहिरात करत नाही.

Story img Loader