प्रत्येक नवीन वर्ष सुरू होताना मागील वर्षाचा आढावा घेणं हे काही नवीन नाही. आपण काय मिळवलं आणि काय गमावलं, याचा हिशोब करत नवीन वर्षात कोणत्या अपेक्षा ठेवू शकतो आणि कोणते नवीन चंग बांधू शकतो हे ठरवणं जणू आपसूक होत राहतं. नवीन धोरणं, बऱ्याचदा आठवड्यापलीकडे पाळली जरी गेली नाहीत तरी उत्साहाने आखली मात्र जातात. तर मग पुन्हा एकदा आपल्या पोर्टफोलिओसाठी आपण या नवीन वर्षात कोणती नवीन धोरणे आखू शकतो या विषयावर मी २०२४ वर्षाच्या शेवटच्या लेखातून आपल्या सर्वांशी संवाद साधू इच्छिते.

शेअर बाजार

वर्ष २०२४ च्या पहिल्या ९ महिन्यांमध्ये नवीन उच्चांक गाठून दोन्ही निर्देशांक मागील शुक्रवारपर्यंत खाली आलेले आहेत. गेल्या २७ सप्टेंबरपासून निफ्टी आणि सेन्सेक्स साधारणपणे ९ टक्के खाली आहेत, तर निफ्टी स्मॉलकॅप १०० ने नुकताच १२ डिसेंबरला नवीन उच्चांक गाठला आहे. सर्वात जास्त जोखीम असलेल्या लहान कंपन्या येत्या तिमाहीत जे निकाल दाखवतील, त्यावर हा उच्चांक इथून पुढे आणखी वाढेल की खाली येईल हे ठरेल.

Vijay Wadettiwar big claim over walmik Karad
Walmik Karad : “लहान आकाचा एन्काऊंटरही होऊ शकतो”, पोलीस कोठडीतील वाल्मिक कराडबाबत वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Maharashtra Mumbai News Today in Marathi
Maharashtra News Updates : परदेशातून येताच छगन भुजबळ सक्रिय; मंत्रिपदाबाबत म्हणाले…
Sada Sarvankar
Sada Sarvankar : “मला निवडणूक लढवावीच लागेल”, सदा सरवणकर हतबल; म्हणाले, “राज ठाकरेंनी माझी…”
sonali kulkarni bought new new mercedes benz car
सोनाली कुलकर्णीने खरेदी केली मर्सिडीज-बेंझ! अभिनेत्रीचं नव्या गाडीसह खास फोटोशूट, कारची किंमत किती?
Indian Maldives loksatta editorial
अग्रलेख : शेजारसौख्याची शालीनता
Rape in surat
शेअरचॅटवरील मित्राला मुंबईत भेटायला आली अन् नराधमानं गाठलं, पाच तासांत तीनवेळा बलात्कार; न्यायालयाने सुनावली कठोर शिक्षा
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 Updates in Marathi
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : ‘जे बाळासाहेबांचे झाले नाहीत, ते राज ठाकरेंचे काय होणार?’, राजू पाटलांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

हेही वाचा : कळा ज्या लागल्या जीवा

महागाईवर असलेले व्याजदर आणि मंदी अशा त्रिकोणी कचाटीत जेव्हा लहान उद्योग सापडतात, तेव्हा त्यातून पुन्हा सावरायला त्यांना अधिक वेळ लागतो आणि असं व्हायच्या आधी हा निर्देशांक खूप खाली येतो. जानेवारी २०१८ आणि त्याआधी जानेवारी २००८ मध्ये या निर्देशांकाने त्यावेळचा उच्चांक गाठून तिथून तो ६७ टक्के -७५ टक्के खाली आलेला आहे. तेव्हा पोर्टफोलिओमध्ये असलेल्या स्मॉलकॅप कंपन्यांवर आणि स्मॉलकॅप आधारित म्युच्युअल फंडांवर जास्त लक्ष ठेवणं आवश्यक आहे. हे पडायला लागले की, फटाफट पडतात आणि कमी कालावधीमध्ये त्यातून भरपूर नुकसान होतं. बाजाराचं जेव्हा एक पूर्ण चक्र संपत येतं, तेव्हा स्मॉल कॅप कंपन्याआधी उच्चांक गाठून खाली येतात, त्यानंतर मिडकॅप मग लार्जकॅप कंपन्या, निफ्टी आणि सेन्सेक्स.

येत्या काही आठवड्यांत पुन्हा एकदा बाजारात तेजी येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला थोडा जोर देण्याचा प्रयत्न रिझर्व्ह बँकेचे धोरण आणि अर्थसंकल्पातून होईल असं वाटतंय. मात्र हे किती महिने टिकेल हे काही सांगता येत नाही. तिकडे अमेरिकी बाजारामध्ये पडझड चालू झाली आहे. जानेवारीमध्ये जेव्हा डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून रुजू होतील, त्यानंतर जी काही धोरणे घोषित करतील आणि राबवतील त्यावर इतर देशांच्या अर्थव्यवस्थांची परिस्थिती ठरेल. चिनी सरकारनेदेखील त्यांच्या मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी भरपूर घोषणा केल्या आहेत. चीन आणि अमेरिकेसारखे बलाढ्य देश जेव्हा स्वतःच्या अर्थव्यवस्थेला वाचवायला जातात तेव्हा संरक्षणात्मक धोरणांना ऊत येतो आणि याचा आपल्यासारख्या देशांना खूप त्रास होतो. आपली निर्यात महाग होते आणि मग त्यासाठी मागणी खाली येते. याचा परिणाम आपल्या चलनावर होतो. रुपयाचे मूल्य घसरते आणि मग परकीय गुंतवणूक मिळवण्यासाठी व्याजदर वाढवले जातात. शिवाय महागाई वाढली तर विकासदर झपाट्याने खाली येऊ शकतो. हे सगळं होताना दिसत असेल तर शेअर बाजार वर कसा बरं राहील? तेव्हा पोर्टफोलिओमधील घटकांवर नीट नजर ठेवून वेळीच फायदा काढून घेणे योग्य होईल. जिथे नुकसान असेल तिथे आपल्या गुंतवणुकीची मूळ रक्कम मिळेपर्यंत विकणार नाही असा हट्ट सोडायला हवा. कारण किरकोळ तोटा सहन केल्यास ती रक्कम पुढील पर्यायात गुंतवण्यासाठी रक्कम मोकळी होते.

हेही वाचा : बाजारातली माणसं -भारतीय भांडवली बाजाराचा चेहरा:आनंद महिंद्र 

रोखे बाजार

महागाई, देशांतर्गत अर्थव्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय परिस्थिती – या तीनही गोष्टींवर रिझर्व्ह बँकेची येत्या वर्षातील धोरणे ठरतील. जर महागाई नियंत्रणात राहिली आणि जागतिक पातळीवर व्याजदर कमी झाले तर आपल्याकडेदेखील व्याजदर कमी होतील. याचा परिणाम रोखे बाजारावर होईल. शिवाय सरकारच्या येत्या काळातील मोठ्या खर्चांसाठी किती आणि कधी पैसे उभारले जाणार यावरसुद्धा येत्या काळात किती व्याजदर अपेक्षित असतील हे कळेल. महागाई वाढली आणि त्यापरिणामी व्याजदरदेखील जास्त राहिले तर कर्ज घेणं महाग होईल. परिणामी, विकास कार्यासाठी लागणारे पैसे उभे करताना त्रास होईल. सरत्या वर्षाने सरकारी तिजोरीवर बराच भार टाकला आहे. तेव्हा पुढील खर्चासाठी पैसे उभारताना व्याजदर खाली असले तरंच फायद्याचं ठरेल. एक गुंतवणूकदार म्हणून पोर्टफोलिओची जोखीम कमी करण्यासाठी रोखे संलग्न गुंतवणुकीत काही टक्के रक्कम गुंतवणं योग्य राहील. व्याजदर खाली यायच्या आधी चांगल्या कंपनी रोख्यांमध्ये केलेली ३ ते ५ वर्षांची गुंतवणूक सुरक्षित पण असेल आणि रास्त परतावादेखील मिळवून देईल.

सोने-चांदी

जागतिक अस्थिरता, मंदी, युद्धसदृश परिस्थिती हे सर्व सोन्या-चांदीसाठी पूरक वातावरण निर्माण करत असतात. व्याजदर कपात, महागाई, शेअर बाजारातील मंदी जशी वाढते, तशी सोन्याचांदीला अधिक झळाळी प्राप्त होते. आधी सांगितल्याप्रमाणे, जर रुपयाचे मूल्य आणखी कमी झाले तर अशावेळी इतर गुंतवणुकीपेक्षा या मौल्यवान धातूंमधील गुंतवणूक योग्य ठरेल. येत्या काळात सोने-चांदीमध्ये केलेली गुंतवणूक जोखीम व्यवस्थापन आणि पोर्टफोलिओची कामगिरी चांगली ठेवण्याकरिता मदत करेल. शक्यतो एक्स्चेंज ट्रेडेड फंड किंवा म्युच्युअल फंडाच्या मार्फत असं करावं. दाग-दागिन्यांवर मजुरी लागते आणि विकताना नक्की किती पैसे मिळणार याचीसुद्धा खात्री नसते. तेव्हा गुंतवणूक म्हणून दागिने घेऊ नका.

स्थावर मालमत्ता

मागील दोन वर्षांपासून स्थावर मालमत्तेच्या किमती वाढलेल्या लक्षात येत आहेत. खासकरून मोठ्या प्रकल्पांमधील घरे. त्यातही दिल्ली, हैदराबाद, बंगळूरुमध्ये मुंबई-पुण्यापेक्षा जलद गतीने किमती वाढल्या आहेत. येत्या वर्षांतसुद्धा या किमती थोड्या वाढण्याची शक्यता आहे. मात्र प्रत्येक जमीन, इमारत आणि प्रकल्पामध्ये फरक असतो. स्थानिक मागणी-पुरवठा समीकरण वेगळं असतं. एकीकडे प्रशस्त घरं महाग होत आहेत, तर दुसरीकडे छोट्या घरांच्या आणि जुन्या इमारतींच्या किमती खाली येत आहेत. गृहनिर्माण कंपन्यांचे तिमाही निकाल आणि पुढील अंदाज वाचून असं लक्षात येतं की, सरासरी घरांच्या किमतीमध्ये येत्या वर्षात ७ टक्के ते ९ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र सगळ्याच शहरांमध्ये हे होणार नाही. तेव्हा गुंतवणूक करते वेळी जरा जपून. गरजेसाठी घर घेत असाल तर ठीक आहे. मात्र कर्ज काढून अतिरिक्त गुंतवणूक करत असाल तर सगळे आकडे नीट तपासून अपेक्षित फायद्याची खातरजमा करून घ्या.

हेही वाचा : Money Mantra : कधी अप कधी डाऊन ! गुंतवणूकदारांनी करायचं तरी काय ?

आभासी चलन

बिटकॉइन, एथेरियम, डॉजकॉइन यांसारख्या अपारंपरिक आणि पर्यायी गुंतवणूक म्हणून प्रसिद्ध झालेल्या या गुंतवणुकीला जगभरातील गुंतवणूकदार आणि मध्यवर्ती बँका कसं व किती सावरणार किंवा मोडणार हे येत्या काळातच कळेल. मागील दोन वर्षांमध्ये या पर्यायांतून गुंतवणूकदारांनी चांगली कमाई केली आहे. परंतु येत्या काळात यांच्या किमती खूप खाली येतील, असे अंदाज वर्तवले जात आहेत. तेव्हा इथे असलेल्या गुंतवणुकीतून टप्याटप्प्याने मूळ गुंतवणूक आणि नफा काढून घेणे योग्य ठरेल.

वर्ष २०२५ मध्ये जास्त अस्थिरता अपेक्षित असल्याने पोर्टफोलिओची जोखीम सांभाळणं हे जास्त योग्य ठरेल. किरकोळ गुंतवणूकदारांनी अधिक परताव्यामागे न धावता, दमदार पोर्टफोलिओच्या निर्मितीकडे लक्ष देणं अधिक श्रेयस्कर ठरेल. हे वर्ष फक्त शेअर बाजारातून फायदा मिळवण्याचं नसून, रोखे, सोने-चांदी आणि ठरावीक स्थावर मालमत्तेच्या माध्यमातूनदेखील नफा पदरात पडून घेता येईल. मात्र हे सगळं करायला वेळ, हातात पैसे आणि संधीकडे लक्ष असायलाच हवं!

सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

तृप्ती राणे

trupti_vrane@yahoo.com

प्रकटीकरण: हा लेख फक्त मार्गदर्शनपर आहे. इथे लेखिका कोणतीही जाहिरात करत नाही.

Story img Loader