मागच्या आठवड्यापासून बाजारात सुरू असलेली तेजीची लाट कायम ठेवत आज या आठवड्याच्या शेवटच्या सत्रात बाजाराने नवा उच्चांक प्रस्थापित केला. निफ्टीने १९००० ते २०००० हा टप्पा जलद गतीने ओलांडला पण तो तिथेच न थांबता २०२०० हा ऐतिहासिक उच्चांक सुद्धा निफ्टीने नोंदवला. शुक्रवारी बाजार बंद होताना सेन्सेक्स ३१९ अंशाने वाढून ६७,८३८ तर निफ्टी ८९ पॉईंट ने वाढून २०,१९२ ला बंद झाला. हा आठवडा भारतीय शेअर बाजारासाठी आणि आर्थिक घडामोडींसाठी महत्त्वाचा ठरला. यावर्षीचे G-२० परिषदेचे यजमानपद भारताकडे होते. याची दिमाखदार बैठक दिल्लीमध्ये पार पडली. यामध्ये युरोपीय युनियन, अमेरिका यासहित आफ्रिकेलाही भारताशी भविष्यकालीन व्यापार करण्यात स्वारस्य आहे असे स्पष्ट संकेत मिळाले. भारताच्या दृष्टीने एक भविष्यकालीन सकारात्मक संकेत ठरावा असा व्यापारी कॉरिडॉर अस्तित्वात येईल अशी घोषणा झाली. या आणि अशा अनेक परिषदांच्या बातम्या येतच असतात हे खरे असले तरीही प्रत्येक येणारी बातमी बाजार आपापल्या परीने जोखत असतो. या आठवड्याभराच्या काळात सेन्सेक्स आणि निफ्टी ५० दोन टक्क्यांनी वाढले. प्रामुख्याने वाहन उद्योग, माहिती तंत्रज्ञान उद्योग आणि बँकांचे स्टॉक्स उंचावलेले दिसले. मध्यंतरीच्या काळात मंदीवाल्यांनी ‘प्रॉफिट बुक’ करण्याचा प्रयत्न केला असला तरी बाजाराला फारशी हानी पोहोचली नाही.

आणखी वाचा: बाजाररंग: आयपीओमध्ये नशीब अजमावताय…?

Indian rupee latest marathi news
रुपयाची प्रतिडॉलर ८५ च्या दिशेने वाटचाल
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
public sector banks npa marathi news
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे ‘एनपीए’ ३.१६ लाख कोटींवर
jan dhan account marathi news
अकरा कोटी निष्क्रिय जनधन खात्यांमध्ये १४,७५० कोटी पडून
equity funds investment declined
इक्विटी फंडांतील ओघ ओसरला! नोव्हेंबरमध्ये १४ टक्क्यांनी घटून ३५,९४३ कोटींवर
Shani Nakshatra transformation 2024
२०२५ सुरू होण्याआधीच शनी देणार बक्कळ पैसा; नक्षत्र परिवर्तनाने मिळणार पैसा आणि प्रतिष्ठा
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?
high expectations from third quarter
तिसऱ्या तिमाहीकडून अपेक्षांचे ओझे !

बजाज ऑटो, ग्रासिंम, महिंद्रा अँड महिंद्रा, हिरो मोटो कॉर्प, भारती एअरटेल या कंपन्यांच्या भावामध्ये वाढ झालेली दिसली तर भारत पेट्रोलियम, एशियन पेंट्स, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, जिओ फायनान्शियल, टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट हे शेअर उतरलेले दिसले. निफ्टी आणि सेन्सेक्स मध्ये दमदार वाढ झालेली दिसली तरीही सर्व सेक्टर्स मध्ये ती परावर्तित झालेली दिसली नाही, एफएमसीजी (फास्ट मुव्हिंग कंझ्युमर गुड्स ) तेल आणि वायू, ऊर्जा निर्मिती, रियल इस्टेट यांचे सेक्टरल इंडेक्स उतरलेले दिसले तर वाहन निर्मिती, बँका, फार्मा कंपन्या, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यांचे इंडेक्स वाढलेले दिसले. मिडकॅप आणि स्मॉल कॅप मधील तेजीचा जोर ओसरला असला तरीही दोन्हीही इंडेक्स मागच्या आठवड्याच्या तुलनेत पडझड नोंदवताना दिसले नाही हे विशेष.

५२ आठवड्यातील सर्वाधिक भाव

बाजारामध्ये एकदा घोडदौड सुरू झाली की कंपन्यांचे भाव वरच्या दिशेला जातच राहतात. या आठवड्यामध्ये भारत फोर्ज, वोडाफोन आयडिया, एचसीएल टेक्नॉलॉजी, TVS मोटर, जिंदाल स्टील अँड पॉवर, युनियन बँक ऑफ इंडिया, बजाज ऑटो, महिंद्र अँड महिंद्र, टेक महिंद्रा, एन. एम. डी. सी. या कंपन्यांचे भाव ५२ आठवड्यातील सर्वाधिक पातळीवर जाऊन पोहोचले.

आणखी वाचा: शेअर बाजाराची रिस्क नाही आणि व्याजही जास्त देणाऱ्या या …

दुसरीकडे क्रूड ऑइल च्या भावातील अनिश्चिततेमुळे भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या पेट्रोलियम रिफायनरी कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झालेली दिसली. क्रूड ऑइल महत्त्वाचा कच्चा माल असलेल्या रंग आणि रसायने तयार करण्याच्या उद्योगांमध्ये आघाडीवर असलेल्या एशियन पेंटचा शेअर सुद्धा एक टक्क्यांनी कमी झालेला दिसला.

नुकत्याच जाहीर झालेल्या भारताच्या आयात निर्यातीचे आकडे जाहीर झाले त्यानुसार जुलै महिन्यामध्ये आयात निर्यातीची जी स्थिती होती. त्यापेक्षा ऑगस्ट महिन्यामध्ये परिस्थिती सुधारलेली दिसली. निर्यातीमध्ये किंचित घसरण झालेली असली तरी आयात कमी झाल्यामुळे भारताचे ट्रेड डेफिसिट (म्हणजे वस्तूंची आयात आणि निर्यात यातील तूट) समाधानकारक झालेले दिसले.

येत्या आठवड्यातील महत्त्वाच्या घटनांमध्ये युएस फेडरल रिझर्वच्या पॉलिसी मिटिंगचा समावेश आहे. अमेरिकेत व्याजदर नेमके कसे राहतात यावर परदेशी संस्थात्मक वित्त संस्था (एफ आय आय) कशी खरेदी विक्री करतील हे अवलंबून आहे. जर फेडरल रिझर्व्हने कोणतेही दरवाढीचे पाऊल उचलले नाही तर बाजार स्थिर राहतील किंबहुना निफ्टीसाठी वीस हजार तीनशे ही पातळी महत्त्वाची समजली जात आहे.

Story img Loader