मागच्या आठवड्यापासून बाजारात सुरू असलेली तेजीची लाट कायम ठेवत आज या आठवड्याच्या शेवटच्या सत्रात बाजाराने नवा उच्चांक प्रस्थापित केला. निफ्टीने १९००० ते २०००० हा टप्पा जलद गतीने ओलांडला पण तो तिथेच न थांबता २०२०० हा ऐतिहासिक उच्चांक सुद्धा निफ्टीने नोंदवला. शुक्रवारी बाजार बंद होताना सेन्सेक्स ३१९ अंशाने वाढून ६७,८३८ तर निफ्टी ८९ पॉईंट ने वाढून २०,१९२ ला बंद झाला. हा आठवडा भारतीय शेअर बाजारासाठी आणि आर्थिक घडामोडींसाठी महत्त्वाचा ठरला. यावर्षीचे G-२० परिषदेचे यजमानपद भारताकडे होते. याची दिमाखदार बैठक दिल्लीमध्ये पार पडली. यामध्ये युरोपीय युनियन, अमेरिका यासहित आफ्रिकेलाही भारताशी भविष्यकालीन व्यापार करण्यात स्वारस्य आहे असे स्पष्ट संकेत मिळाले. भारताच्या दृष्टीने एक भविष्यकालीन सकारात्मक संकेत ठरावा असा व्यापारी कॉरिडॉर अस्तित्वात येईल अशी घोषणा झाली. या आणि अशा अनेक परिषदांच्या बातम्या येतच असतात हे खरे असले तरीही प्रत्येक येणारी बातमी बाजार आपापल्या परीने जोखत असतो. या आठवड्याभराच्या काळात सेन्सेक्स आणि निफ्टी ५० दोन टक्क्यांनी वाढले. प्रामुख्याने वाहन उद्योग, माहिती तंत्रज्ञान उद्योग आणि बँकांचे स्टॉक्स उंचावलेले दिसले. मध्यंतरीच्या काळात मंदीवाल्यांनी ‘प्रॉफिट बुक’ करण्याचा प्रयत्न केला असला तरी बाजाराला फारशी हानी पोहोचली नाही.
Money Mantra: तेजीचा दुसरा आठवडा, निफ्टी २०२००!
Money Mantra: अमेरिकेत व्याजदर नेमके कसे राहतात यावर परदेशी संस्थात्मक वित्त संस्था (एफ आय आय) कशी खरेदी विक्री करतील हे अवलंबून आहे.
Written by कौस्तुभ जोशी
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 16-09-2023 at 15:59 IST
मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nifty crosses twenty thousand mark mmdc psp