निफ्टी निर्देशांकांत १६ डिसेंबर २०२४ ला २४,७८१ वरून, २७ जानेवारी २०२५ ला २२,७८६ अशी ‘दोन हजार अंशांची’ छातीत धडकी भरवणारी घसरण झाली आहे. या घसरणीने, निफ्टीने जानेवारीच्या मंदीत ‘मी तेव्हा तशी’ दाखवून दिलं, तर अवघ्या आठ कामकाज दिवसांत २७ जानेवारी ते ५ फेब्रुवारीच्या कालावधीत हजार अंशांची तेजी / आपल्यात सुधारणा करत, मंदीने कोमेजलेल्या गुंतवणूकदारांच्या मनावर हळुवार फुंकर घालत ‘या तेजीत मी ही अशी’ हे देखील निफ्टीने दाखवून दिलं.
फेब्रुवारी महिन्याच्या पूर्वार्धात आर्थिक जगतातील दोन महत्त्वाच्या घटना म्हणजे – अर्थसंकल्प आणि रिझर्व्ह बँकेचे पतधोरण. आर्थिक जगतातील या दोन महत्त्वाच्या घटनांचा ल.सा.वि. काढता… सरलेल्या सप्ताहातील रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणात कर्जावरील ‘व्याज दर’ ०.२५ टक्क्यांनी कमी केल्याने, तर अर्थसंकल्पात पगारदार वर्गाला प्राप्तिकर कायद्यातील ८७ ए कलमाद्वारे करात जी सूट (रिबेट) मिळते त्याची मर्यादा १२ लाखांपर्यंत वाढवल्याने ‘अर्थव्यवस्थेचा कणा’ समजल्या जाणाऱ्या मध्यमवर्गाला त्याच्या उत्पनावरील करात व कर्जावरील व्याजात पैशाची मोठी बचत साधता येणार आहे. त्या पैशांनी मनी बाळगलेली स्वप्नं, ‘बँकांच्या अर्थसहाय्याने’ प्रत्यक्षात येण्याची शक्यता निर्माण झाल्याने ‘बँकिंग क्षेत्र’ व त्यातील समभाग हे आपले ‘बातमीतील समभाग’ असणार आहेत.
● एचडीएफसी बँक:
७ फेब्रुवारीचा बंद भाव- १,७३२.७५ रुपये
● महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर- १,७५० रुपये
● उत्साहवर्धक बातमीचा परिणाम: समभागाने १,७५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,८०० रुपये, द्वितीय लक्ष्य १,८५० रुपये.
● बातमीचा उदासीन परिणाम: १,७५० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १,६७० रुपयांपर्यंत घसरण
● स्टेट बँक:
● ७ फेब्रुवारीचा बंद भाव- ७३७.२० रुपये
● महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर- ७५० रुपये
● उत्साहवर्धक बातमीचा परिणाम: ७५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ७७५ रुपये, द्वितीय लक्ष्य ८०० रुपये.
● बातमीचा उदासीन परिणाम: ७५० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ७२५ रुपयांपर्यंत घसरण
● सरते शेवटी निफ्टी निर्देशांक व बँक निफ्टीचा आढावा:
● ७ फेब्रुवारीचा बंद भाव – निफ्टी: २३,५५९.९५ / बँक निफ्टी: ५०,१५८.८५
● महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर- निफ्टी: २३,४००/ बँक निफ्टी: ५०,०००
● उत्साहवर्धक बातमीचा परिणाम: २३,४०० / ५०,००० चा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर राखत, या निर्देशांकांचे प्रथम वरचे लक्ष्य अनुक्रमे २३,७००/ ५०,८५० ते ५१,००० आणि द्वितीय लक्ष्य २४,०००/ ५१,४५० असे असेल.
● बातमीचा उदासीन परिणाम: या निर्देशांकांत २३,४०० / ५०,००० चा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर तोडत २३,०००/ ४८,९०० स्तरापर्यंत घसरण शक्य.
लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.
ashishthakur1966 @gmail. com
अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित लक्ष्य या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.