आज बाजार बंद होताना मेटल, ऊर्जा निर्मिती उद्योगातील शेअर्सनी खरेदीचा जोर कायम ठेवला तर ऑटोमोबाईल, आयटी, ऑइल अँड गॅस या क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स घसरले. शुक्रवारी बाजार बंद होताना निफ्टी-५० निर्देशांक ०.१५ टक्क्यांनी वाढून १९४२५ ला बंद झाला तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा सेन्सेक्स ६४,९०४ वर स्थिरावला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकानी तेजी कायम ठेवली.

या आठवड्यात सर्वाधिक वाढलेला दिसला तो म्हणजे बँक निफ्टी इंडेक्स; यामध्ये ०.३१% एवढी वाढ दिसून आली. एनटीपीसी, ओएनजीसी, टाटा कन्स्युमर प्रॉडक्ट, टेक महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट या कंपन्यांचे शेअर्स जोरदार खरेदी झाल्यामुळे वाढलेले दिसले तर हिरो मोटोकॉर्प, महिंद्रा अँड महिंद्रा, एचसीएल टेक्नॉलॉजी, टायटन कंपनी आणि हिंडाल्को या समभागांमध्ये घसरण झालेली दिसली.

11 December Latest Petrol Diesel Price
Daily Petrol Diesel Price :तुमच्या शहरांत पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? एक लिटर इंधनासाठी किती रुपये मोजावे लागणार?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?
loksatta money motra article Growth and Value strategy
तुमची रणनीती काय? ‘ग्रोथ की व्हॅल्यू’
Gold crown stolen from Pune, Zaveri Bazar, Pune,
पुण्यातून चोरलेल्या सोन्याच्या मुकुटाची मुंबईतील झवेरी बाजारात विक्री
Petrol Diesel Price Changes On 5 December
Petrol And Diesel Price today : महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त? एका SMS वर चेक करा तुमच्या शहरांतील नवे दर
how to tackle food inflation causes of food inflation measures to control food inflation
अन्नधान्याची महागाई रोखणार कशी?
sensex jump 110 points to settle at 80956 nifty gained 10 points to end at 24467
खासगी बँकांतील तेजीने ‘सेन्सेक्स’ची शतकी कमाई

हिंडाल्को कंपनीने दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केल्यानंतर कंपनीचा सहभाग घसरला. हिंडाल्कोला मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या तिमाहीत अपेक्षित नफ्याचे लक्ष गाठता आले नाही, त्यामुळे शेअरमध्ये घसरण दिसून आली.

हेही वाचा : Money Mantra: अशी सोने खरेदी तुम्ही केलेय का?

टेक्निकल दृष्टीने विचार करायचा झाल्यास १९४५० ते १९३५० या दरम्यान निफ्टीची पातळी टिकणे आवश्यक आहे. येत्या आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी असाच उत्साह दाखवला तर बाजारात पुन्हा एकदा तेजी परत येऊ शकते व निफ्टी १९७००, १९८५० ही पातळी गाठू शकतो.

महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे आकडे समाधानकारक ठरले. कंपनीचा एकूण व्यवसाय या तिमाहीत १८४०५ कोटी रुपये एवढा झाला व यामध्ये वार्षिक २२ टक्के वाढ नोंदवण्यात आली. महिंद्रा अँड महिंद्रा कायमच ट्रॅक्टर व्यवसायासाठी नावाजलेली कंपनी ठरलेली असली तरीही स्पोर्ट्स युटीलिटी व्हेईकल्स अर्थात एसयूव्ही श्रेणीतील वाहनांमध्ये या कंपनीने मुसंडी मारल्याचे स्पष्ट झाले आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात कंपनीच्या प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार अडीच लाखापेक्षा जास्त स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल्सची नोंदणी कंपनीकडे झालेली आहे.

मुथूट फायनान्स या सोनेतारण कर्जासाठी प्रसिद्ध असलेल्या कंपनीचे आकडे बाजाराच्या दृष्टीने निराशाजनक ठरले. सोनेतारण कर्जामध्ये अवघी दोन टक्के वाढ झाल्यामुळे कंपनीला अपेक्षित नफ्याचे ध्येय साध्य करता आले नाही; परिणामी शेअरमध्ये घसरण दिसून आली.

पेज इंडस्ट्रीज या कंपनीने ७५ रुपये प्रति शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला, त्यामुळे शेअर मध्ये दोन टक्क्याची वाढ झालेली दिसली. झी इंडस्ट्रीज च्या शेअर्समध्ये ५% ची घट झाली, यामागील प्रमुख कारण कंपनीचे निराशाजनक निकाल हे आहे. मद्य आणि मद्यार्क निर्मितीमध्ये आघाडीवर असलेल्या युनायटेड स्पिरिट्सचा शेअर जवळपास पाच टक्क्याने घसरला. सप्टेंबर अखेरीच्या तिमाहीमध्ये कंपनीने सकारात्मक व्यवसाय न केल्याचा हा परिणाम आहे.

हेही वाचा : Money Mantra : धनत्रयोदशीला सोने खरेदी करत असाल तर ‘या’ पाच गोष्टींची काळजी घ्या अन्यथा…

रॅमको सिमेंट्सचा शेअर मागील तीन महिन्यापासून सतत वाढत होता व तो अलीकडेच ५२ आठवड्यातील सर्वोच्च पातळीवर (१०४० रुपये) पोहोचला. त्यानंतर त्यामध्ये खरेदीचा जोर दिसून आला. भारत अर्थमुव्हर्स लिमिटेड (BEML) या संरक्षण क्षेत्रातील उत्पादने बनवणाऱ्या कंपनीचा शेअर साडेतीन टक्क्याने वाढलेला दिसला, व्यवसाय आणि नफ्यातील भरघोस वाढीचा हा परिणाम आहे असे मानले जाते.

रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी महागाई नियंत्रणाचे रिझर्व बँकेचे प्रयत्न यशस्वी ठरत असल्याचा सकारात्मक संकेत दिला आहे. जपान मधील एका कार्यक्रमांमध्ये बोलताना येत्या वर्षभराच्या काळात विकासदर साडेसहा टक्के राहील आणि महागाईचा दर ५% च्या आसपास स्थिर असेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा : Money Mantra : यंदाच्या धनत्रयोदशी किंवा दिवाळीला सोन्यात पैसे गुंतवणे ठरणार फायदेशीर, गणित समजून घ्या

घसरणाऱ्या बाजाराला देशातील एक सशक्त पर्याय म्हणून म्युच्युअल फंडातील एसआयपी समोर येताना दिसत आहेत. ऑक्टोबर महिन्यात एस.आय.पी. या माध्यमातून म्युच्युअल फंडामध्ये १६,९२८ कोटी रुपये गुंतवले गेले. सलग ३२ महिन्यांमध्ये इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूकदारांनी सढळ हस्ते गुंतवणूक करायला सुरुवात केली व यामध्ये स्मॉल कॅप आणि मिडकॅप फंडांमध्ये होणारी गुंतवणूक वाढताना दिसत आहे.

Story img Loader