काही दिवसांनी नव्या वर्षाला सुरूवात होणार आहे. नव्या वर्षात कोणत्या नवी गुंतवणूक करायची, गुंतवणूकीचे कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत. याचे नियोजन सध्या सुरू आहे. पण त्या आधी १ जानेवारीपासून आर्थिक बाबींशी निगडित कोणत्या नियमांमध्ये बदल होणार आहे, त्या नियमांचा तुमच्या आर्थिक गणितावर काय परिणाम होणार आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. नवीन वर्षात कोणत्या नियमांमध्ये बदल होणार आहे जाणून घ्या.
१ जानेवारीपासून आर्थिक घटकांशी निगडित या नियमांमध्ये होणार बदल
इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करण्यासाठी केवायसी (KYC) आवश्यक
१ जानेवारी २०२३ किंवा त्यानंतर तुम्ही नवी इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करणार असाल तर त्यासाठी केवायसी (नो युअर कस्टमर) कागदपत्र सादर करणे बंधनकारक होणार आहेत. इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या सुचनेनुसार हा बदल करण्यात येणार आहे. नवीन वर्षात कोणतीही इन्शुरन्स पॉलिसी घेण्यापुर्वी कंपनीला ग्राहकांकडून ही कागदपत्र घेणे बंधनकारक असेल. हा नियम लाइफ इन्शुरन्स, मोटर इन्शुरन्स, ट्रॅव्हल इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स यांवर लागू होणार आहे.
‘एनपीएस’मधील आंशिक रक्कम काढण्याच्या नियमात होणार बदल
१ जानेवारीपासून ‘एनपीएस’मधील आंशिक रक्कम काढण्याच्या नियमात होणार आहे. १ जानेवारीपासून ‘एनपीएस’मधील आंशिक रक्कम ऑनलाईन काढता येणार नाही. केंद्र सरकार, राज्य सरकार, इतर सरकारी संस्था यांच्याअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना हा नियम लागू होणार आहे. पेन्शन फंड रेगुलॅरिटी अँड डेव्हलेपमेंट अथॉरिटीकडून ही सुविधा लॉकडाउन दरम्यान सुरू करण्यात आली होती, जी आता बंद करण्यात येणार आहे.
एसबीआय कार्ड्सवर मिळणाऱ्या रिवॉर्ड पॉईंट्स मध्ये बदल
१ जानेवारीपासून एसबीआय कार्ड्सवर मिळणाऱ्या रिवॉर्ड पॉईंट्समध्ये बदल करण्यात येणार आहे. कंपनीच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार १ जानेवारी २०२३ पासून ॲमेझॉनवर एसबीआय कार्डद्वारे खरेदी केल्यास १० टक्क्यांच्या जागी फक्त ५ टक्के रिवॉर्ड पॉईंट्स मिळतील. बुक माय शो, क्लीअर ट्रिप, इजीडायनर, लेंसकार्ट, नेटमेड्स यावर आधी प्रमाणे १० टक्क्यांचे रिवार्ड पॉईंट्स मिळतील.