नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL) या भारतातील आकाराने सगळ्यात मोठ्या डिपॉझिटरीने आपला आयपीओ बाजारात आणला आहे. आयपीओ बाजारात आणण्यापूर्वी सेबीकडे दाखल केलेल्या ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस मध्ये दिलेल्या माहितीनुसार कंपनी आपल्या आयपीओतून पाच कोटी ७२ लाख ६० हजार शेअर्स विक्रीसाठी उपलब्ध करणार आहे. या आयपीओमधून कंपनीला साडेचार हजार कोटी इतक्या रकमेची (एवढ्या रुपयाचे भांडवल उभे राहण्याची) अपेक्षा आहे. सध्याच्या कंपनीच्या बाजारभावानुसार कंपनीचे मूल्य सुमारे पंधरा हजार ते सतरा हजार कोटी रुपये या दरम्यान आहे.

या आयपीओ म्हणजेच पब्लिक इश्यू मधून प्रामुख्याने आयडीबीआय बँक, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया या सध्याच्या गुंतवणूकदारांना आपला हिस्सा विकता येणार आहे. हा पब्लिक इश्यू ‘ऑफर फॉर सेल’ या प्रकारचा आहे. ‘ऑफर फॉर सेल’ या प्रक्रियेत ज्या कंपनीचा पब्लिक इश्यू बाजारात येणार असतो त्याचे सध्याचे गुंतवणूकदार आपल्या एकूण गुंतवणुकीतील काही टक्के हिस्सा खुल्या बाजारात विक्रीसाठी आणतात व त्यातून कंपनीला जादाचे भांडवल उपलब्ध होते. याच पब्लिक इश्यू मध्ये कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी काही शेअर्स राखीव ठेवण्यात येणार आहेत आणि पब्लिक इश्यूच्या किमतीमध्ये त्यांच्यासाठी थोडी सवलत सुद्धा असेल.

Indian rupee latest marathi news
रुपयाची प्रतिडॉलर ८५ च्या दिशेने वाटचाल
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Mahindra Thar Earth Edition With More Than 3 Lakh Rupees Discount, See Thar Other Variant Offers
महिंद्रा थारवर मिळतेय ३ लाखांपर्यंत सूट; थार प्रेमींनो आत्ताच उचला संधीची फायदा, जाणून घ्या ऑफर्स डिटेल्स
11 December Latest Petrol Diesel Price
Daily Petrol Diesel Price :तुमच्या शहरांत पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? एक लिटर इंधनासाठी किती रुपये मोजावे लागणार?
public sector banks npa marathi news
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे ‘एनपीए’ ३.१६ लाख कोटींवर
Indraprastha Gas Limited bonus shares
इंद्रप्रस्थ गॅसकडून बक्षीस समभाग
jan dhan account marathi news
अकरा कोटी निष्क्रिय जनधन खात्यांमध्ये १४,७५० कोटी पडून
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?

हेही वाचा… Money Mantra : टाटा समूहाच्या ५ सर्वोत्तम योजना; १ लाखाच्या बदल्यात ६.७ लाखांपर्यंत फायदा

भारतातील शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचा टक्का दिवसेंदिवस वाढताना दिसतो आहे. जेवढी जास्त डिमॅट अकाउंट्स भविष्यात सुरू होणार आहेत तेवढा कंपनीचा व्यवसाय वाढताना दिसतो आहे. भारतात शेअर बाजाराचे जुनाट मॉडेल बदलून जागतिकीकरणानंतर तंत्रज्ञानावर आधारित नवीन मॉडेल उदयास आले तेव्हा या कंपनीची स्थापना झाली होती. १९९६ मध्ये डिपॉझिटरी ॲक्ट आल्यानंतर नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिट लिमिटेड या कंपनीची स्थापना झाली. आयडीबीआय बँक २६ %, नॅशनल स्टॉक एक्सचेंज २४%, एचडीएफसी बँक ८.९५%, स्टेट बँक ऑफ इंडिया ५%, युनियन बँक ऑफ इंडिया २.८% आणि कॅनरा बँक २.३% हे कंपनीतील सर्वाधिक मोठे गुंतवणूकदार आहेत.

हेही वाचा… Money Mantra : दोन गृहकर्जांची चिंता आहे? अशा पद्धतीने एकात रूपांतर करता येणार, पैशांचीही बचत होणार

भारतीय बाजारांमध्ये दोन डिपॉझिटरी आहेत एक सी.डी.एस.एल. आणि दुसरी एन.एस.डी.एल. यापैकी डिमॅट अकाउंट्सची संख्या, शेअर्सची होणारी उलाढाल या दोन्हीचा विचार करता एन.एस.डी.एल. या कंपनीकडे बाजारात जास्त हिस्सा आहे. मार्च २०२३ अखेरीस कंपनीचा एकूण टर्नओव्हर रेव्हन्यू १०९९ कोटी इतका होता आणि निव्वळ नफा २३४ कोटी रुपये होता.

एनएसडीएलच्या या पब्लिक इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आयसीआयसीआय सिक्युरिटीज, ॲक्सिस कॅपिटल, एचएसबीसी सिक्युरिटी, आयडीबीआय कॅपिटल मार्केट अँड सिक्युरिटी, मोतीलाल ओसवाल इन्वेस्टमेंट आणि एसबीआय कॅपिटल मार्केट्स हे आहेत. आयपीओची निश्चित तारीख लवकरच जाहीर होईल अशी अपेक्षा आहे.

Story img Loader