ऑइल इंडिया लिमिटेड ही केंद्र सरकारची महारत्न दर्जा प्राप्त असलेली कंपनी आहे. कंपनी खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे अन्वेषण, विकास आणि उत्पादन करते तसेच खनिज तेलाची वाहतूक आणि एलपीजी उत्पादनात कार्यरत आहे. इंडियन ऑइल तेल ब्लॉक्ससाठी विविध एक्स्प्लोरेशन आणि प्रॉडक्शन (ईअँडपी) संबंधित सेवादेखील प्रदान करते. कंपनीचा सुमारे ६२ टक्के महसूल रिफायनरीचा असून सुमारे ३५ टक्के महसूल खनिज तेलाच्या उत्पादनातून आहे, तर उर्वरित महसूल नैसर्गिक वायू आणि पाइपलाइन वाहतुकीतून येतो. कंपनीकडे तेल आणि वायूचे मोठे साठे असून त्यात क्रूड ऑइल आणि नैसर्गिक वायूचे घरगुती साठे अनुक्रमे ७०.५६ दशलक्ष मेट्रिक टन आणि १३८.५१ अब्ज क्युबिक मीटर आहेत. तसेच भारतातील ६२ ऑपरेटिंग ब्लॉक्सवर अन्वेषण अधिकार आहेत.

ऑइल इंडियाचे कार्यक्षेत्र अनेक राज्यांत पसरले असून त्यात आसाम, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, त्रिपुरा, नागालँड, ओडिशा, आंध्र प्रदेश आणि राजस्थान यांचा समावेश आहे. तसेच अंदमान, केरळ-कोकण आणि केजी बेसिनच्या उथळ पाण्यातील ऑफशोअर भागात पसरलेले आहे. कंपनी सध्या ऑफशोअर भागात ओपन एकरेज लायसन्सिंग पॉलिसी (ओएएलपी) ब्लॉक्समध्ये शोध उपक्रम राबवत आहे. कंपनीने नुकताच आसाम शेल्फ बेसिनमधील सेसाबिल भागात नवीन हायड्रोकार्बनचा शोध लावला आहे.

silver truck mankhurd
मुंबई: मानखुर्द येथे चांदीचा ट्रक अडवला, ८० कोटींची आठ हजार ४७६ किलो वजनाची चांदी जप्त
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
gold etfs witness record rs 1961 cr inflow in october
‘गोल्ड ईटीएफ’ना चमक; ऑक्टोबरमध्ये विक्रमी १,९६१ कोटींची गुंतवणूक
indian rupee falls to all time low against us dollar
अग्रलेख : काका… मला वाचवा!
the survey team of the administration seized gold worth 35 lakhs In Ratnagiri
रत्नागिरीत प्रशासनाच्या सर्वेक्षण पथकाने ३५ लाखांचे सोने पकडले
इक्विटी म्युच्युअल फंडात ऑक्टोबरमध्ये विक्रमी ४१,८८७ कोटींचा ओघ
Eurasian Water Cat Pune District, Indapur,
पुणे जिल्ह्यात प्रथमच दुर्मीळ ‘युरेशियन पाणमांजरा’चा शोध, इंदापूरमधील विहिरीमध्ये पडलेल्या पाणमांजराची सुटका
Dnyanradha Multi State Co Operative Credit Society, fraud case, ED
ईडीकडून ३३३ कोटींच्या मालमत्तेवर टाच

हेही वाचा >>> दुरावलेला खरेदी उत्साह बाजारात परत दिसेल?

पाइपलाइन ऑपरेशन्स

नाहरकतिया बरौनी दरम्यान ११५७ किमी लांबीची पूर्णपणे स्वयंचलित क्रूड ऑइल ट्रंक पाइपलाइन ऑइल इंडियाची आहे. ही पाइपलाइन आसाम, पश्चिम बंगाल आणि बिहार या राज्यांमधून जाते. पश्चिम बंगालमधील नुमालीगढ रिफायनरी ते सिलीगुडी टर्मिनलपर्यंत तयार उत्पादने बाहेर काढण्यासाठी ६५४ किमी लांबीची पाइपलाइनदेखील कार्यरत आहे.

क्षमता विस्तार

नुमालीगढ रिफायनरी (एनआरएल) या इंडियन ऑइलच्या उपकंपनीने तिची वार्षिक क्षमता ३ एमएमटीवरून ९ एमएमटीपर्यंत वाढवण्यासाठी एका मोठ्या एकात्मिक रिफायनरी विस्तार प्रकल्पाची सुरुवात केली आहे. ते पारादीप नुमालीगढ क्रूड ऑइल पाइपलाइन आणि पारादीप येथे क्रूड ऑइल इम्पोर्ट टर्मिनल, तसेच इथेनॉनचे उत्पादन करण्यासाठी नुमालीगढ, आसाम येथे नवीन बायो-रिफायनरीची स्थापना यासारखे प्रकल्पदेखील राबवत आहे. हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पुढील पाच वर्षांत एनआरएल सुमारे ३५ हजार कोटी रुपये गुंतवण्याची योजना आखत आहे. एनआरएलने गेल्याच वर्षात पश्चिम बंगालमधील सिलीगुडी ते बांगलादेशातील पार्वतीपूरपर्यंत १३० किमी लांबीची आणि वार्षिक एक दशलक्ष मेट्रिक टन क्षमतेची उत्पादन पाइपलाइन सुरू केली आहे.

हेही वाचा >>> जीएम सोयाबीन विना तेलबिया मिशन संकटात

इतर प्रकल्प

१. आसाम सरकारच्या सहकार्याने कंपनीला आसाममध्ये ६२० मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी मान्यता मिळाली.

२. हायड्रोजन फ्युएल सेल ई-बसची चाचणी चालवण्याची योजना आहे. पाइप नैसर्गिक वायू नेटवर्कमध्ये नैसर्गिक वायूसह हायड्रोजनचे मिश्रण करण्यासाठी तांत्रिक बदल केले जात आहेत.

३. अनेक राज्यांमध्ये सुमारे २५ कॉम्प्रेस्ड बायोगॅस (सीबीजी) प्रकल्पाची स्थापना करण्याच्या संधींचे मूल्यांकन करत आहे.

४. गेल्याच आठवड्यात झालेल्या लिलावात, अरुणाचल प्रदेशमधील फॉस्फरस ग्राफइट आणि वांनाडियम या खाणी मिळवण्यात ऑइल इंडिया यशस्वी ठरली आहे. ही दोन्ही खनिजे हरित ऊर्जेला आवश्यक आणि आयातीला पर्याय आहेत.

गेल्याच वर्षात १:२ प्रमाणात बक्षीस समभाग (बोनस शेअर) देणाऱ्या ऑइल इंडियाचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर झाले आहेत. सप्टेंबर २०२४ साथी संपलेल्या तिमाहीमध्ये कंपनीने ७,२४७ कोटी रुपयांच्या उलाढालीवर २,०६९ कोटींचा नक्त नफा कमावला आहे. दीर्घ कालावधीत ही नवरत्न कंपनी आपल्या पोर्टफोलियोची शान ठरेल यात शंका नाही.

शेअरबाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सध्याच्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.

 ऑइल इंडिया लिमिटेड

(बीएसई कोड ५३३१०६)

संकेतस्थळ: www.oil-india.com

प्रवर्तक: भारत सरकार

बाजारभाव: रु. ५०८ /-

प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: तेल आणि गॅस

भरणा झालेले भाग भांडवल: रु. १६२६.६१ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक ५६.६६

परदेशी गुंतवणूकदार १०.५८

बँक/ म्युच्युअल फंड/ सरकार २६.३०

इतर/ जनता ६.४६

पुस्तकी मूल्य: ३२४

दर्शनी मूल्य: रु. १०/- लाभांश: १४५%

प्रति समभाग उत्पन्न: रु. ५१.५८

किंमत उत्पन्न गुणोत्तर: ९.८८ समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: २३

डेट इक्विटी गुणोत्तर: ०.५३

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर: १२.७

रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लोइड (आरओसीई): १७.७

बीटा : १.३

बाजार भांडवल: रु. ८२,८५४ कोटी (लार्ज कॅप)

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: ७६८/१९५

गुंतवणूक कालावधी : २४ महिने

Stocksandwealth@gmail.com