जो स्वतः हॉटेलच्या रिसेप्शनवर वर्षानुवर्षे काम करतो अन् तोच मग एके दिवशी स्वतःचे हॉटेल उघडतो, तुम्ही म्हणाल असं कसं शक्य आहे. पण हे खरं आहे. आपल्या मेहनतीने आणि समर्पणाने एका व्यक्तीनं देशभरात ५ स्टार हॉटेल्सची संपूर्ण साखळी उभी केली आणि आज तो १२,७०० कोटी रुपयांचा हॉटेल समूह चालवत आहे. प्रथमदर्शनी तुम्हालाही ही एखाद्या चित्रपटाची स्क्रिप्ट आहे ,असे वाटले. पण ही फक्त गोष्ट नसून संघर्ष आणि यशाचं जिवंत उदाहरण आहे. या हॉटेलच्या पायाची प्रत्येक वीट मेहनतीच्या घामाने उभी केलेली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खरं तर आम्ही ओबेरॉय ग्रुप ऑफ हॉटेल्सचे मालक मोहन सिंग ओबेरॉयबद्दल बोलत आहोत. त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात सिमला येथील सेसिल हॉटेलमधून केली, जिथे त्यांनी डेस्क क्लर्क म्हणून काम केले. भारताच्या फाळणीपूर्वी झेलम जिल्ह्यात (आता पाकिस्तानात) त्यांचा जन्म झाला. वडिलांच्या अकाली निधनामुळे कौटुंबिक जबाबदाऱ्यांचा भार त्यांच्यावर पडला.

बुटांच्या कारखान्यात काम केले

कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मोहन ओबेरॉय आपल्या मामाच्या बुटांच्या कारखान्यात काम करू लागले. काही दिवसांनी भारत-पाक फाळणीच्या काळात झालेल्या दंगलीमुळे कारखाना बंद पडला. त्यानंतर तो शिमल्यात आला आणि येथील सेसिल हॉटेलमध्ये कारकून म्हणून काम करू लागले. त्यांच्या कौशल्यानेच ते एक दिवस देशातील सर्वात यशस्वी हॉटेल चेन तयार करतील, असा त्यांना विश्वास होता.

पुन्हा एक मोठा डाव खेळला

मोहन सिंग ओबेरॉय यांनी सेसिल हॉटेलमधून पैसा आणि प्रतिभा दोन्ही कमावले आणि १९३४ मध्ये ‘द क्लार्क्स हॉटेल’ म्हणून त्यांची पहिली मालमत्ता बांधली. ही जागा खरेदी करून तिथे मालमत्ता बांधण्यासाठी त्यांनी पत्नीच्या दागिन्यांसह सर्व मालमत्ता गहाण ठेवल्या. त्यांच्या मेहनतीचे परिणाम लवकरच दिसू लागले. हॉटेलमधून कमाई करून अवघ्या पाच वर्षांत त्यांनी संपूर्ण कर्ज फेडले.

हेही वाचाः २००० ची नोट मागे घेणे हा चलन व्यवस्थापन करण्याचा एक मार्ग; RBIची दिल्ली उच्च न्यायालयात माहिती

अन् ते कोलकात्यातील ग्रँड हॉटेलच्या खरेदीकडे वळले

आतापर्यंत मोहनसिंग ओबेरॉय यांना कळले होते की, त्यांच्या नशिबाने त्यांना योग्य ठिकाणी आणले आहे. यानंतर ते कोलकात्यातील ग्रँड हॉटेलच्या खरेदीकडे वळले. त्या काळात कोलकात्यात कॉलराची साथ पसरली असतानाही मोहन सिंग यांनी हा करार पूर्ण केला आणि शेवटी त्यांचे नाव दूरदर्शी हॉटेल व्यावसायिक म्हणून प्रसिद्ध झाले.

हेही वाचाः मुकेश अंबानींनी विकत घेतली आणखी एक मोठी कंपनी, चॉकलेट बनवणाऱ्या ‘या’ कंपनीचं केलं अधिग्रहण

साम्राज्य पुन्हा उभे केले

यानंतर जणू ओबेरॉय यांच्या दृष्टीला नवे पंखच मिळाले. त्यांनी भारतासह जगातील अनेक देशांमध्ये एकामागून एक हॉटेल्स खरेदी करण्यास सुरुवात केली. सध्या ओबेरॉय ग्रुपची एकूण ३१ लक्झरी हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स आहेत. हे सर्व जागतिक दर्जाच्या सुविधा आणि सेवा प्रदान करतात. भारतीय हॉटेल उद्योगातील त्यांचे योगदान लक्षात घेऊन भारत सरकारने २००१ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. त्यांना भारतीय हॉटेल उद्योगाचे जनक म्हटले जाते. सध्या ओबेरॉय ग्रुपचे बाजारमूल्य १२७०० कोटी रुपये आहे. भारताव्यतिरिक्त या ग्रुपची हॉटेल्स चीन, UAE, UK, दक्षिण आफ्रिका आणि इतर अनेक देशांमध्ये पसरलेली आहेत.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Once a hotel receptionist and also worked in a shoe factory today a hotel business worth 12700 crores who is mohan singh oberoi vrd