Aadhaar-Pan Linking Penalty : पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक न करणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे. ज्यांनी ३० जून २०२३ पर्यंत आपले पॅन आधारशी लिंक केले नाही, त्यांचे पॅनकार्ड १ जुलै २०२३ पासून कार्यरत राहणार नाही, असंही प्राप्तिकर विभागाने सांगितले आहे. ज्या करदात्यांनी पॅन आधारशी अद्याप लिंक केलेले नाही ते १५ प्रकारची कामे करू शकणार नाहीत. विशेष म्हणजे प्राप्तिकर विभागाने या कामांची यादी आपल्या वेबसाइटवर प्रसिद्ध केली आहे. परंतु याचा सर्वात मोठा दुष्परिणाम म्हणजे ज्यांनी अद्यापही आधार आणि पॅन कार्ड लिंक केलेले नाही, ते करदाते ३१ जुलै २०२३ पूर्वी त्यांचे प्राप्तिकर रिटर्न (ITR) भरू शकणार नाहीत. कारण आता ITR ची मुदत संपायला अवघ्या महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. आयटीआर भरण्यासाठी पॅनकार्ड असणे अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय तुम्ही रिटर्न फाइल करू शकत नाही. निष्क्रिय पॅन पुन्हा सक्रिय केल्यास त्याला जास्तीत जास्त ३० दिवस लागतील. त्यामुळे आयटीआर भरण्याची मुदतही संपणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा