“हा, अरे भाई, ये ये!”
संदीपने मिलिंदभाईला आत घेतले.
संध्याकाळची वेळ होती. घरातली मंडळी डायनिंग टेबलभोवती चहाची मस्त तल्लफ भागवत होती. आणि सोबत मस्त गरमागरम ‘खेकडा-भजी.’ (मंडळी, खेकड्याची भजी नव्हे तर एका विशिष्ठ प्रकारे चिरलेल्या कांद्याची भजी)
लगोलग भाईलासुद्धा चहाचा कप आला. संदीपची आई, ‘लीलाकाकू’ वय वर्षे ६५. शाळेतून निवृत्त झालेल्या त्यांच्यासाठी काही गुंतवणुकीचे पर्याय सुचवण्यासाठी ‘मिलिंदभाई’ चे आगमन झाले होते.
आता लीलाकाकू पेन्शनधारक होत्या, दोन्ही मुले कर्ती-सवरती झाली होती त्यामुळे ‘गुंतवणुकीच्या फ्रंटवर’ त्या निवांत होत्या. असणारी पेन्शन देखील त्यांना वापरायची गरज पडत नव्हती. येत असलेली काही पेन्शन सरळ बँकेत रिकरिंग खात्यात व काही मुलांच्या आग्रहाखातर म्युच्युअल फंडात, SIP मध्ये जात होती. मोठ्या मुलाच्या ऑफिसमधील मेडिक्लेम पॅालीसीत त्यांचे नाव होते.
थोडक्यात मंडळी, लिलाकाकू चांगला बँकबॅलन्स ठेवून होत्या आणि मस्त आनंदाने दिवस जगत होत्या, ढकलत नव्हत्या.
तर राव, असे सगळे असतांना आता ‘लीलाकाकूंना’ आपले ‘मिलिंदभाई’ कोणता प्लॅन सुचवणार?
झालं असं की, लिलाकाकूंच्या यजमानांनाही पेन्शन होती आणि योगायोगाची गोष्ट लिलाकाकूची आई कोर्टातून निवृत्त होऊन, पेन्शनधारक होत्या.
हेही वाचा… Money Mantra: गुंतवणूक करण्याआधी हे वाचाच
आत्ताच ३ वर्षांपूर्वी त्या गेल्या.
आता, त्या गेल्या हे नव्हतं मला सांगायचं पण आपल्या मुलांना पेन्शन नाही ही चुटपुट लिलाकाकूंना होती, हे महत्वाचे!
“अग, आई जरा इथे ये!” संदीपने फर्मान सोडले.
“हा, बोल भाई!” संदीपने भाईला बोलते केले.
“तर, आजपासून तीन वर्षांनी काकूंना ८ टक्क्याने आजीवन वार्षिकी मिळेल….. “
पुढे?
मंडळी, सांगतो, सांगतो!
तर, तो प्लॅन असा होता, काकूंना आजपासून ३ वर्षांनी ८ टक्क्याने आजीवन वार्षिकी (Annuity) मिळणार, पुढे संदीपला त्याच्या आयुष्यभर ८ टक्क्यानेच आणि तेही पूर्ण रक्कमेकरता उत्पन्न चालू आणि आजीच्या नातवंडाना गुंतवलेली मूळ रक्कम अधिक ५ टक्के मिळतील.
तर, मंडळी यातून काय साध्य होईल?
एकतर लिलाकाकूंना घरबसल्या उर्वरित आयुष्यासाठी एका ठराविक परताव्याची सोय झाली. आणि मुख्य म्हणजे लिलाकाकूंना मुलांकरता आजीवन पेन्शनची सोय करता येणार होती.
आं! काय म्हणालात?
“बँकेतील मुदत ठेवीवरसुद्धा घरबसल्याच व्याज मिळत होतं की!”
“एकदम बरोबर!”
“पण, आता मला सांगा सहकारी बँकेतील ठेवी २-४ वर्षांनी पुनर्जिवित (Renew) करायच्या, त्यांच्या ‘KYC’ च्या गोष्टींची पूर्तता करायची हे ठराविक एका वयानंतर त्यांना शक्य नाही. त्याकरिता त्यांना कोणावर तरी अवलंबून राहण्याशिवाय पर्याय नाही.” आणि आयुष्यभरासाठी एकाच रक्कमेची, व्याजाची खात्री बँक देऊ शकत नाही ना राव! असं काय करता!
हेही वाचा… Money Mantra: आयटी क्षेत्रात अनिश्चितता कायम
अहो, मिलिंदभाई, तुम्ही ३ वर्षांनी पैसे द्यायला सुरवात करताय? त्याचे काय?
अहो, जर लिलाकाकूंना मुलांनाकरिता पेन्शनचीच सोय करायची आहे म्हटल्यावर वार्षिकीचीच (Annuity) योजना हवी की!
उगीचच ताकाला जाऊन भांडं कशाला लपवायचं!
आता ताकाचाच विषय निघालाय तर, तहान लागल्यावर पाणी घ्याल की ताक?
काय बरोबर ना?
आता अगदीच खोलात शिरायचं म्हटलं तर, तीन वर्षांनी उत्पन्न सुरु होणार म्हणजे तुमचे पैसे ३ वर्ष वापरले, बरोबर!
आता त्यावरचे व्याज?
काय, एकदम मनातलं बोललो ना?
अहो, तुमचं एकदम बरोबर आहे
तसा विचार केलात तर परताव्याचा दर ६ ते ६.५० टक्के येईल.
हो, पण राव हा दर तुम्हाला पुढे तुमच्या प्रियजनांना आयुष्यभर कायम रहातोय त्याचे काय?
आणि हो मुद्दल अधिक ५ टक्के परतावा तुमच्या नातवंडांना हि आहेच की!
काय बरोबर ना?
काही राहून गेले असेल तर जरूर कळवा!
मंडळी ही भा.आ.म.मं (LIC) ची ‘नवीन जीवन शांती’ योजना आहे. ही योजना सख्खे भाऊ, बहीण देखील एकत्रित घेऊ शकतात.
बाकी भेटीअंती सविस्तर बोलूच!