माझ्याकडे येणाऱ्या अनेक पालकांची त्यांच्या पाल्यांबद्दल एक तक्रार नेहमीच असते, ती म्हणजे आमची मुलं भरपूर कमावतात पण पैसे वाया घालवतात. गरज नसताना खर्च करतात, ते भविष्याचा विचार करत नाहीत. आम्ही जेवढं सांगतो तेवढंच काय ते बाजूला ठेवतात आणि बाकी पैशांचं काय करतात देव जाणे. एका आईने तर सरळ सांगितलं की, माझ्या मुलाला त्याच्या पगाराएवढी गुंतवणूक करायला लावा. त्याला खर्चाला मी पैसे देत जाईन आणि मजा म्हणजे हे काही विशीतील मुलांबद्दलच नाही तर अगदी ४०-५० च्या जोडप्यांच्या बाबतीतसुद्धा त्यांचे पालक सांगतात. प्रत्येक आदल्या पिढीला पुढच्या पिढीबद्दल हेच वाटतं. परंतु एक गोष्ट इथे नक्कीच दखल घेण्याजोगी आहे की, आताच्या पिढीच्या हातात पैसे जास्त आहेत आणि आधीच्या पिढीपेक्षा जबाबदाऱ्या कमी. शिवाय समाजमाध्यमाच्या (सोशल मीडिया) प्रभुत्वाखाली जगणाऱ्या आजच्या पिढीला ‘YOLO – You Only Live Once’ हेच बोधवाक्य ठाऊक असल्याने खर्चावर बंधन घालून गुंतवणूक करणं काहीसं जड जातं. आता ही गोष्टसुद्धा तितकीच खरी आहे की, परिस्थितीतून गेल्यावर एखादा त्याबाबत जागरूक होतो. मात्र ज्याने विपरीत परिस्थिती काय असते हे पाहिलंच नसेल. त्याला भीतीचा बागुलबुवा किती दिवस दाखवणार! असो परंतु माझ्या आजवरच्या कारकीर्दीत अनेक जणांचे आर्थिक आराखडे आणि गुंतवणूक बघितल्यावर एक गोष्ट मात्र मी नक्की सांगू शकते की, ज्या कुटुंबांनी किंवा गुंतवणूकदारांनी अर्थसंकल्प ठरवून मग खर्च आणि शिस्तबद्ध गुंतवणूक केलेली आहे, त्यांची आर्थिक परिस्थिती आज इतरांपेक्षा चांगली आहे.

मुळात आर्थिक परिस्थिती चांगली ठेवायला फक्त कमाई चांगली असून पुरत नाही. कारण कमाई वाढली आणि खर्चसुद्धा तसेच वाढले तर निव्वळ बचत तेवढीच राहते. काही बाबतीत खरंच जबाबदाऱ्या जास्त असल्याने खर्च वाढतात. उदाहरण म्हणजे घरात असलेली लहान मुलं, कुटुंबात कमावणारा एक आणि खाणारे भरपूर, आजारी कुटुंबीय, इतरांचं आर्थिक अवलंबत्व, इत्यादी. अशा वेळी मिळकत वाढवण्यापलीकडे फारसा काही पर्याय उपलब्ध नसतो. परंतु आपल्या आजूबाजूला असे अनेक जण दिसतील की, जे स्वतःच्या मनाप्रमाणे, हवे तितके, हवे तसे पैसे खर्च करतात. परंतु पुढची परिस्थिती किती गंभीर असू शकते ही जाणीव वेळीच झाली तर योग्य ती मौजमजा करून आपण पुढचं आयुष्यसुद्धा आर्थिकदृष्ट्या सुदृढ करू शकतो.

Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
Mission on Oilseeds in Crisis due to gm soybeans
जीएम सोयाबीन विना तेलबिया मिशन संकटात
maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर
Kharge slams Modi for ignoring dalit leaders in cabinet
मतांसाठीच दलित, आदिवासी हिताची भाषा ; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
narendra modi yogi adityanath campaign in maharashtra
लालकिल्ला : मोदी-योगींच्या प्रचाराने काय साधणार?

हेही वाचा…उच्च परतावा क्षमता राखणारा :‘बॅलन्स्ड अ‍ॅडव्हान्टेज फंड’

मुळात सुरुवात करताना ही गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे की, आपल्या देशात सगळ्यासाठी कर्ज मिळतं, परंतु निवृत्तीसाठी नाही. तेव्हा आपले पैसे खर्च करायच्या आधी स्वतःच्या निवृत्ती नियोजनाची तयारी आधी करावी. आपलं वैयक्तिक आर्थिक समीकरण बांधून, त्यानुसार काटेकोरपणे गुंतवणूक आणि खर्च दोन्ही केल्याने आपला फायदा नक्कीच होऊ शकतो. पहिला पगार मिळाला की, सर्वात पहिलं काम आपण काय करतो? पार्टी…. खर्च, मौज मज्जा. अनेक वर्षे आई वडिलांवर अवलंबून राहिल्यानंतर (खर्चाच्या बाबतीत भरपूर टोमणे ऐकल्यानंतर!) हे असं वाटणं स्वाभाविकच असतं. परंतु याला वेळीच नियोजनाखाली आणलं तर फायदा आपलाच. इथे मला एका मुलीची गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. तिला फिरायला फार आवडतं. त्यामुळे तिचा पगार आणि खासकरून बोनस झाला की, ती ठरवायची या वर्षी कुठे फिरायला जायचंय आणि मग त्यानुसार सगळी योजना आखून मस्त मजा करत तिचं आयुष्य चाललं होतं. घरची परिस्थिती चांगली असल्याने तिच्या पैशांवर कोणी अवलंबून नव्हतं. परंतु जेव्हा लग्नाचा विषय निघाला तेव्हा तिच्या लक्षात आलं की, तिने स्वतःहून काहीच सोय केली नव्हती आणि म्हणून खर्चाचा सर्व भार तिच्या वडिलांवर पडणार होता. वडिलांची तयारी व्यवस्थित होती, परंतु त्या मुलीला ते काही योग्य वाटत नव्हतं. शेवटी लग्न झाल्यानंतर तिने वडिलांचे पैसे हळूहळू परत दिले.

मासिक मिळकत आणि साजेसे राहणीमानाचे खर्च हे समीकरण लवकर बसवलं की गुंतवणूक चांगल्या पद्धतीने सुरू करता येते. वैयक्तिक अर्थसंकल्प म्हणजे वार्षिक मिळकत, गुंतवणूक आणि खर्चांचा ताळमेळ. आपण आर्थिक वर्षानुसार हे करू शकतो. गरजा आणि मौज मजेची मर्यादा ठरवली की, मग गुंतवणूक कधी, किती आणि कशामध्ये हे ठरवावं. एक ढोबळ अंदाज घेतला तर मासिक २५,००० मिळकत असणाऱ्या व्यक्तीचे जर गरजेचे खर्च १५,००० रुपयांचे असतील, तर ५,००० बँकेत रिकरिंग मुदत ठेवीमध्ये गोळा करावे आणि बाकी ५,००० म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत.

हेही वाचा…बदलत्या अर्थगतीचा लाभार्थी: टाटा बँकिंग ॲण्ड फायनान्शियल सर्व्हिसेस फंड

मोठ्या जबाबदाऱ्या (लग्न, मुलं) सुरू व्हायच्या आधी गुंतवणूक क्षमता जास्त असते. तेव्हा या काळामध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक करावी. जर घर घ्यायचं असेल, तर २५ टक्के पैसे कसे जमा होणार हे ठरवावं. मुंबईसारख्या शहरामध्ये किमान २५-३० लाख रुपये असल्याशिवाय घर घेणं पण शक्य होत नाही. तेव्हा आधी ५-६ वर्षे तरी चांगल्या प्रकारे गुंतवणूक करून मग घरासाठी कर्ज घ्यावं. काही पालक मुलांना जबरदस्ती घर घ्यायला लावतात की, त्या निमित्ताने तरी मुलं पैसे वाचवतील. परंतु एक लक्षात घ्या की, घरामध्ये केलेली गुंतवणूक ही खूप मोठ्या रकमेची असून, पुढे त्यातून नक्की किती फायदा होणार हे नीट पाहावं. त्याऐवजी निरनिराळ्या गुंतवणूक पर्यायांची सांगड करून आणि रोकड सुलभता सांभाळून एक चांगला पोर्टफोलिओ बनवला तर पुढे त्या मुला/मुलीला त्याचा जास्त फायदा होईल.

क्रेडिट कार्ड आणि ऑनलाइन खरेदी हे दोन राक्षस आपले पैसे कसे संपवतात कळतच नाही. ‘सेल’, ‘डिस्काउंट’, ‘फ्री’ या शब्दांचं जाळं प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीला अडकवण्यासाठी बनवलेलं असतं. आपल्याला एखाद्या गोष्टीची खरी गरज आहे की नाही हे न तपासता फक्त ती गोष्ट स्वस्त मिळतेय म्हणून घेण्यात कोणती हुशारी आहे? इथे खरा विचार करावा तो आपल्या खिशातून उगीच वेळेआधी पैसे जाण्याचा. परंतु आपण विचार करतो की, अरे माझा खर्च इतक्या पैशांनी कमी होतोय तर मग त्याने एक प्रकारे बचत झाली ना, मग इथे काय प्रॉब्लेम आहे? आपल्या नियोजित खर्चांच्या पलीकडे असणारी रक्कम ही आपल्या गुंतवणुकीला पोषक असते. असे खर्च जेव्हा आपण वेळेआधी करतो, तेव्हा गुंतवणुकीची रक्कम कमी होते आणि त्या गुंतवणुकीला मग वाढायला वेळ कमी मिळतो.

हेही वाचा…Money Mantra: आर्थिक व्यवहारात तोटा झाल्यास उत्पन्नातून कसा वजा करता येतो?

आपण ज्या काळात राहतोय त्यात नोकरीसंबंधी अनिश्चितता वाढतेय. तेव्हा पुढे मागे जर नोकरी गेली तर आपलं व आपल्या कुटुंबाचं कसं होणार या बाबत तर प्रत्येकाने जागरूक असायला हवं. किमान १२ महिन्यांचे खर्च भागवता येण्याजोगी गुंतवणूक आपल्याकड़े असावी. शिवाय आरोग्य विमा, आयुर्विमा, अपघात विमा तर हवेच हवे. ही शस्त्र हातात घेऊन त्यांचा योग्य वेळी वापर करणे आवश्यक आहे. पुढे कुटुंब आणि जबाबदारी वाढली की, या रकमेमध्ये गरजेनुसार वाढ करावी. महिन्याअखेर जर बँकेत पैसे जमा असतील, तर ते आठवणीने गुंतवावे. थेंबे थेंबे तळे साचे असं आपण म्हणतो ना. अगदी ५०० रुपये जरी अधिक गुंतवणूक केली तरीसुद्धा कालांतराने ती चांगल्या पद्धतीने वाढते. तेव्हा आपल्या मुलांना गुंतवणूक पर्याय नीट समजावून त्यातून त्यांना आर्थिक शिस्त लावता आली तर फायदा सर्वांचा होईल. बचत आणि गुंतवणुकीची सवय जितक्या लवकर मुलांना लावता येईल, तितकीच त्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुदृढ असेल.

trupti_vrane@yahoo.com

प्रकटीकरण: हा लेख फक्त मार्गदर्शनपर आहे. इथे लेखिका कोणतीही जाहिरात करत नाही.