माझ्याकडे येणाऱ्या अनेक पालकांची त्यांच्या पाल्यांबद्दल एक तक्रार नेहमीच असते, ती म्हणजे आमची मुलं भरपूर कमावतात पण पैसे वाया घालवतात. गरज नसताना खर्च करतात, ते भविष्याचा विचार करत नाहीत. आम्ही जेवढं सांगतो तेवढंच काय ते बाजूला ठेवतात आणि बाकी पैशांचं काय करतात देव जाणे. एका आईने तर सरळ सांगितलं की, माझ्या मुलाला त्याच्या पगाराएवढी गुंतवणूक करायला लावा. त्याला खर्चाला मी पैसे देत जाईन आणि मजा म्हणजे हे काही विशीतील मुलांबद्दलच नाही तर अगदी ४०-५० च्या जोडप्यांच्या बाबतीतसुद्धा त्यांचे पालक सांगतात. प्रत्येक आदल्या पिढीला पुढच्या पिढीबद्दल हेच वाटतं. परंतु एक गोष्ट इथे नक्कीच दखल घेण्याजोगी आहे की, आताच्या पिढीच्या हातात पैसे जास्त आहेत आणि आधीच्या पिढीपेक्षा जबाबदाऱ्या कमी. शिवाय समाजमाध्यमाच्या (सोशल मीडिया) प्रभुत्वाखाली जगणाऱ्या आजच्या पिढीला ‘YOLO – You Only Live Once’ हेच बोधवाक्य ठाऊक असल्याने खर्चावर बंधन घालून गुंतवणूक करणं काहीसं जड जातं. आता ही गोष्टसुद्धा तितकीच खरी आहे की, परिस्थितीतून गेल्यावर एखादा त्याबाबत जागरूक होतो. मात्र ज्याने विपरीत परिस्थिती काय असते हे पाहिलंच नसेल. त्याला भीतीचा बागुलबुवा किती दिवस दाखवणार! असो परंतु माझ्या आजवरच्या कारकीर्दीत अनेक जणांचे आर्थिक आराखडे आणि गुंतवणूक बघितल्यावर एक गोष्ट मात्र मी नक्की सांगू शकते की, ज्या कुटुंबांनी किंवा गुंतवणूकदारांनी अर्थसंकल्प ठरवून मग खर्च आणि शिस्तबद्ध गुंतवणूक केलेली आहे, त्यांची आर्थिक परिस्थिती आज इतरांपेक्षा चांगली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा